मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३१ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३१

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३१

मागील भागात आपण बघीतलं की नेहा प्रेग्नंट असते. आपण आता काही वर्ष पुढे जाणार आहोत.

नेहाला मुलगा झाला. तो आता अडीच वर्षांचा आहे. प्रियंकाचं लग्न होऊन वर्ष झालं आहे. नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा झाला.

एके दिवशी रात्री सुधीर, नेहा आणि त्याचे आईबाबा सगळे जेवायला बसलेले असतात. ऋषी मधे मधे काहीतरी बोलत असतो. त्याचं बोबडं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप हसायला येतं असतं. असं सगळं आनंदी वातावरण असतं.

तेवढ्यात सुधीरचा फोन वाजतो. फोनच्या स्क्रीनवर निरंजनचं नाव बघून सुधीरला आश्चर्य वाटलं. एवढ्या रात्री दहा वाजता निरंजनने का फोन केला असावा हे कळलं नाही.

"कोणाचा फोन आहे?"
बाबांनी विचारलं.

"निरंजनचा."
सुधीर म्हणाला.

"एवढ्या रात्री?"

"तेच मला आश्चर्य वाटतंय."

"फोन घे आधी."

"हो घेतो. हॅलो. बोल निरंजन"

फोनवर निरंजनचं बोलणं ऐकता ऐकता सुधीरचा चेहरा विदीर्ण होतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. शेवटी त्याच्या हातातील फोन गळून पडतो आणि तो रडायला लागतो. बाकीच्यांना काहीच कळत नाही. नेहा पटकन सुधीरपाशी जाते त्याच्या पाठीवर थोपटत तिने विचारलं,

"काय झालं सुधीर सगळं ठीक आहे ना?"

सुधीर नकारार्थी मान हलवतो.

"काय झालं दोघांमध्ये वाद झाले का?"

पुन्हा नकारार्थी मान हलवतो.

"अरे मग सांग काय म्हणाला निरंजन?"

सुधीरच्या आईने विचारलं

बराच वेळाने दु:खाचा कढ ओसरल्यावर सुधीर जे बोलला ते ऐकून सुधीरची आईबाबा आणि नेहा स्तंभित झाले. त्यांचीही अवस्था सुधीरसारखीच झाली.

"आई अग आपल्या प्रियंकाला कानाचा कॅन्सर झाला आहे आणि तो शेवटच्या स्टेजला आहे."

हे ऐकल्यावर तिघांचीही अवस्था सुधीरसारखीच झाली. तिघही कपाळावर हात मारून बसले होते. एकदम काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून तिघांनी बघीतलं तर सुधीरची आई खुर्चीवरून खाली पडली होती आणि तिची शुद्ध हरपली होती.

"आई आई काय झालं"

सुधीरच्या ओरडण्यालाही त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा सुधीरचे बाबा म्हणाले

"अरे सुधीर ही बहुतेक बेशुद्ध झाली आहे. पटकन हिला उचलून पलंगावर झोपवू."

बाबांनी हे म्हणतच सुधीर आणि नेहाने चटकन त्यांना उचललं आणि पलंगावर झोपवले.

सुधीरच्या बाबांनी त्यांच्या डाॅक्टर मित्राला फोन केला.ते लगेच आले. डॉक्टर साने पेन्शनर कट्ट्याचे मित्र आहेत.

सान्यांनी सुधीरच्या आईला तपासले. बेशुद्ध होण्यामागचं कारण विचारलं. बाबांनी कारण सांगितल्यावर सानेही हबकले. त्यांनी काही औषधं लिहून दिली आणि म्हणाले,

"हा खूप मोठा धक्का आहे. त्यांची शुद्ध म्हणून हरपली. मी ज्या गोळ्या दिल्या आहेत त्यांनी त्या येतील शुद्धीवर. नंतर त्यांना खूप ताण येईल असं वातावरण नका ठेऊ घरात. एक दोन दिवसात त्या नाॅर्मल होतील."

डाॅक्टर साने जरावेळ बसले. सुधीरच्या बाबांना आलेला ताण घालवण्यासाठी हलक्या फुलक्या गप्पा मारत होते. पण सुधीरच्या बाबांचं लक्ष मात्र या गप्पांमध्ये रमत नव्हतं हे सान्यांच्या लक्षात आलं.ते सुधीरच्या बाबांच्या
जवळ जाऊन बसले आणि त्यांनी जसा त्यांचा हात हातात घेतला तसे सुधीरचे बाबां सान्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडायला लागले.

त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून सुधीर आणि नेहा धावत बाहेरच्या खोलीत आले.

"बाबा "
सुधीरने हाक मारली.

सान्यांनी हातानीच थांब असे सांगितलं.साने हळूवारपणे सुधीरच्या बाबांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले.

"मन मोकळं करा. आत्ता जर तुम्ही रडला नाही तर पुढे येणा-या कठीण काळाशी तुम्ही लढू शकणार नाही."

"माझ्या लेकीच्याच नशिबात का? साधं कान दुखतो म्हणाली त्यांचं एवढं मोठं दुखणं निघालं.जे कधीच बरं होऊ शकत नाही."

"नियतीच्या मनात काय आहे हे आपल्याला नाही कळत. हे असं का झालं याचं ऊत्तर शोधण्यापेक्षा आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी हिंमत गोळा करा"

साने म्हणाले.

"हो. तुम्हाला मी एवढ्या रात्री बोलवलं साॅरी."

"अरे साॅरी काय? मी डाॅक्टर आहे.मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा कधीही बोलावणं यायचं मला जावं लागायचं. मी नोकरी आणि प्रॅक्टिस दोन्ही करायचो तेव्हा मला दवाखान्यात असणाऱ्या पेशंटसाठी पण कधीही जावं लागायचं. रात्री झोपायचं असतं ही कल्पना सामान्य माणसासाठी असते डाॅक्टरांसाठी नाही. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असंच आम्हाला जगावं लागतं त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका."

"बाबा आपण आता निरंजनला आधार द्यायला हवा."
सुधीर म्हणाला.

"हो. तू म्हणतोस ते खरय.मी प्रियंकाला कसा सामोरा जाईन? तेवढी हिंमत माझ्यात नाही."

"तुम्ही बाप आहात म्हणून तुमची हिंमत होणार नाही हे मी जाणतो पण तरीही तुम्हाला मन घट्ट करून चेहरा सामान्य ठेऊन प्रियंकाला सामोरं गेलं पाहिजे."

"हं मला ऊभं राह्यलाच हवं बायकोसाठीतरी. प्रियंका इतकी गुणी मुलगी आहे की ती आमच्या तिघांच्या काळजाचा तुकडा आहे."

"खरय काका मला तर एक मिनिट तिच्याशिवाय करमतं नाही. आम्ही खूप भांडायचो अजूनही भांडतो पण त्या भांडण्यातसुद्धा एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा डोकवतो. नेहाची तर ती जवळची मैत्रीण झाली. खूप प्रेमळ आहे हो काका आमची प्रियंका. देवाला नेमकी हीच आवडली का?"

"सुधीर देवाला नेहमी चांगलीच माणसं आवडतात. "
साने म्हणाले.

"बाबा आत्ता जितकं रडायचं असेल तेवढं रडून घ्या.आई शुद्धीवर आल्यावर तिच्या समोर आपल्या तिघांनाही पुर्वी सारखं वागायला हवं."

'हो बाबा सुधीर म्हणतो ते बरोबर आहे. प्रियंका तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही दु:खी आहात पण माझ्या एका चांगल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला किती यातना झेलायला लागणार आहेत याचा विचार करून मा़झ्या पोटात गोळा उठला आहे. प्रियंकाची उणीव मी कशी सहन करेन मला कळत नाही."

खूप वेळानंतर नेहा एवढं भडभडून बोलली आणि रडायला लागली.

"सुधीर जरा एकदा आईकडे बघून ये.'

बाबांनी हे म्हणताच सुधीर खाली बसला होता ते ऊठला, डोळे पुसले, चेहरा चांगला केला आणि आतल्या खोलीत गेला.

सुधीरची आई अजून शुद्धीवर आली नव्हती. तिच्याकडे क्षणभर एक टक बघीतलं तसं सुधीरला पुन्हा रडु येऊ लागलं. आई शुद्धीवर आल्यावर तिला कसं समजवायचं या गोष्टीची चिंता त्याला सताऊ लागली. तो आलेला हुंदका कसाबसा रोखत खोलीबाहेर आला.


सुधीरचे बाबा आता बरेच शांत झाले होते. सुधीरला म्हणाले

"काकांना घरी सोडून ये."

"हो.काका चला'

"हो चला.पण हे बघ"

साने सुधीरच्या बाबांकडे बघत म्हणाले

"तुम्हाला कधी असं वाटलं तर मला लगेच फोन करत जा.मी येत जाईन.कळलं?"

"हो."

सानेकाका निघाले. सुधीरच्या बाबांचा फोन आल्यामुळे साने गडबडीने निघाले. स्कुटीने यायचं विसरून गेले. घाईने चालत आले. सुधीर त्यांना स्कुटरवरून घरी सोडायला निघाला.

"सुधीर तुम्हा दोघांना आईबाबांना आधार द्यायचा आहे. तुम्हा दोघांना मजबूत राहणं आवश्यक आहे."

"हो काका.आम्ही दोघंही सर्वतोपरी प्रयत्न करू.तुम्ही मात्र त्यांना सतत भेटत रहा."

"दोनतीन दिवस जाऊ दे. मग त्याला पेन्शनर कट्ट्यावर घेऊन जाईन. मीपण माझी ड्यूटी नीट करीन. तुझ्या बाबांना जर आपण तिघांनी बरोबर सावरलं तर तो तुझ्या आईला हिंमतीने सावरेल. चल भेटू. माझं घर आलं."

सुधीरने स्कुटर थांबवली. सानेकाका गाडीवरून ऊतरले. त्यांनी प्रेमाने सुधीरच्या पाठीवरून हात फिरवला तसं सुधीरचे डोळ्यातून पाणी ओघळू लागलं.

"शांत हो बेटा. तूही रडणं दाबू नकोस. पण आई बाबांसमोर येता जाता तुम्ही दोघं डोळ्यातून पाणी काढू नका. तरच ते दोघं लवकर सावरतील. तुम्ही दोघंही खचलेले दिसले तर ते पार कोसळतील. कळलं नं मी काय म्हणतो ते?"

"हो काका सगळं लक्षात ठेवीन.'

सुधीर नंतर गाडी सुरू करून घरी निघाला.

सुधीरच्या मनात आज आपल्या घरी जायची इच्छा होत नव्हती. कसाबस पाय ओढत घरी गेला. घराचं दार उघडच होतं. सुधीरने घराच्या बाहेर असलेल्या स्टॅंड वर आपल्या चपला ठेवल्या आणि घरात शिरला. शिरल्या शिरल्याच त्याने सोफ्यावर स्वतःला झोकून दिलं आणि डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर मनात साचलेल्या दुःखाचा कढ बाहेर लोटून दिला.

नेहा सुधीरला असं बघून खूप दु:खी झाली. तिला सुधीरचा आणि त्याच्या बाबांचा चेहरा बघवेना पण ती काही करू शकत नव्हती. देवाजवळ प्रार्थना करण्या व्यतीरिक्त ती काही करू शकत नव्हती.

नेहा देव्हाऱ्यासमोर उभी राहिली. तिने देवासमोर हात जोडले आणि देवाला म्हणाली

"देवा खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात तू दिली आहे. त्यातील एक माझी नणंद आहे जी माझी जवळची मैत्रीण झाली आहे. तिलाच आपल्या जवळ बोलवायची तुला घाई झाली. आमचं जिव्हाळ्याचं नातं आताकुठे फुलायला सुरुवात झाली होती. तिच्या लग्नानंतर तर आणखीनच या नात्यामध्ये गोडवा आला. आमचं नातं आमच्या घरात कौतुकाचा विषय झाला होता तो एवढ्या लवकर तू संपवायला निघालास? का? नको असं करू. तू इतका असाध्य रोग तिला दिला आहेस की तिचा अंत माहिती आहे पण माझं मन ते स्विकारत नाही.

तू जे ठरवतोस ते करतो. तुला माझी विनंती आहे की तिला जास्त त्रास देऊ नकोस.शांतपणे तुझ्या जवळ बोलावून घे."

नेहाला एक हुंदका फुटला. त्याचवेळी तिला सुधीरच्या आईने हाक मारलेली ऐकू आली. तशी नेहाने पटकन डोळे पुसले आणि ती सुधीरच्या आई जवळ गेली.

आईच्या पलंगावर नेहा बसली आणि तिने आईचा हात हळूच हातात घेतला. आईचे डोळे वाहू लागले ते पुसत हळुवारपणे नेहाने विचारलंं

"बरं वाटतंय का?"

"हो"
खोल गुहेतून आवाज यावा तसा त्यांचा आवाज ऐकू आला.

दोघी एकमेकींकडे नुसतं बघत बसल्या. दोचीजवळचे शब्द गोठून गेले होते.
_________________________________
प्रियंकाच्या आजारपणात हे चौघे प्रियंकाच्या आजारपणात हे कसे एकमेकांना सावरतील