अनाकलनीय आपल्या आयुष्यात कधी कधी अश्या गोष्टी घडतात, की ज्याचा कार्य कारण भाव लावताच येत नाही. असाच एक प्रसंग माझ्याही आयुष्यात घडला. साधारण दोन एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, बायकोची खूप इच्छा होती म्हणून आम्ही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जायचं ठरवलं. घरचीच गाडी आणि ड्रायव्हर असल्याने चिंता नव्हती. संध्याकाळी कोल्हापूरला पोचलो आणि एका हॉटेल मधे मुक्काम केला. सकाळी सगळं आटोपून, मंदिरात निघालो. हॉटेलवाल्याने सांगीतले की आज काही विशेष आहे म्हणून खूप गर्दी असणार आहे आणि देवळा पर्यन्त गाडी जाणार नाही, मग आम्ही ऑटो रिक्शा करून मंदिरात पोचलो. तुफान गर्दी, गेट वरच्या पोलिसाने सांगीतले की दुसऱ्या दरवाज्याने जा. कसा बसा आम्ही मंदिरात प्रवेश