मला स्पेस हवी पर्व २ भाग १०

  • 2.5k
  • 1.6k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १०मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला लवकरात लवकर भेटायचे ठरवते.या भागात बघू काय होईल ते.नेहा आज ऑफिस मध्ये आली तेच प्रसन्न चेहऱ्याने. जवळ जवळ सहा महिन्यांनी ती ऋषीला ऊद्या भेटणार होती त्यामुळे आज तिचा मूड छान होता. तेवढ्यात अपर्णा नेहाच्या केबीबाहेर आली. नेहाचा आनंदी चेहरा बघून म्हणाली,“ गुड मॉर्निंग मॅडम. आज काही विशेष आहे ?”“ का ग? काही विशेष नाही.””नेहा म्हणाली.“ काही विशेष नाही तर मग तुमचा चेहरा इतका आनंदाने प्रफुल्लीत का झालाय?”यावर नेहा हसली म्हणाली,“अगं उद्या सकाळी सुधीर आणि ऋषी येतात आहे. मी जवळजवळ सहा महिन्यांनी ऋषीला भेटणार आहे म्हणून हा चेहरा