मला स्पेस हवी पर्व२ भाग १२

  • 2.5k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १२मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आणि ऋषी येणार आहेत त्यामुळे आता सुधीर आणि नेहा इतक्या महिन्यांनी कसे भेटतील? पुर्वी सारखे की अजूनही तो तणाव भेटीत असेल? बघू.आज सुधीर आणि ऋषी येणार म्हणून नेहाच्या मनाचा गोंधळ उडाला होता. संमिश्र भावना मनाच्या कॅनव्हासवर फटकारे मारत होत्या. सहा महिन्यांचा विरह हा दोघांच्या आयुष्यात पुर्विचे रंग आणेल का? की काही अनोळखी रंग दोघांच्या भेटीत लुडबुड करतील? गोंधळ, आनंद अशी काहीशी विचीत्र मनोवस्था नेहाची झाली होती. तिने भरभर सगळं आवरलं. ऋषीसाठी तिने आज त्याला आवडतात म्हणून आलू पराठे करायचं ठरवलं होतं. त्याच्या आवडीची जीमजॅम बिस्कीटं आणि बोर्नव्हिटा आणून