मला स्पेस हवी पर्व २ भाग १६

  • 2.2k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व २ भाग१६मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या विचित्र वागण्यामुळे छकू आणि त्याचे वाद होतात. रमणचं बोलणं दाराआडून ऐकल्यावर दिशा स्तंभित होते.या भागात बघू.कितीतरी वेळ दिशा त्या धक्क्यातून बाहेर आली नाही. हर्षदने दिशाला हलवून भानावर आणलं“काय झालं? अशी काय दिसते आहेस?”“हर्षद तू आलास?”दिशाने हर्षदचा हात घट्ट पकडून ठेवला.हर्षद तिच्या बाजूला बसला.“दिशा काय झालंय? तू खूप अस्वस्थ दिसतेय?”“हो.मी अस्वस्थ आहे?”“कशाने? तुझी तब्येत बरी नाही का?”“मी बरी आहे.बाबा बरे नाहीत.”“बाबा बरे नाहीत? बाबांना काय झालं?”हर्षद पलंगावरून उठू लागला तशी दिशा म्हणाली,“बाबांना बघायला नको जाऊ.”“का?”“मी सांगते म्हणून.”“अरे यार! दिशा तू कोड्यात नको बोलून. स्पष्ट बोल.”दार निट लागलंय का हे बघून