मला स्पेस हवी पर्व २ भाग २५

  • 1.8k
  • 1k

___________________________मला स्पेस हवी पर्व २ भाग २५मागील भागात आपण बघीतलं की रमण नेहाजवळ माफी मागायला आला होता. आता बघू.आता या भागात बघूरमण घरी आला आणि सोफ्यावर बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण इतका वेळ घेतलेलं ऊसनं अवसान आता पूर्णपणे संपलय. त्यामुळे त्याला खूप थकल्यासारखं वाटायला लागलं.रमण डोळे मिटून बसला होता आणि त्याचे डोळे मात्र अश्रुंमधे मनातलं दुःख वाहून जावं म्हणून प्रयत्न करत होते. त्याचवेळी छकू समोरच्या खोलीत आली आणि रमणला अशा स्थितीत बघून जागीच थबकली.रमणला आता काय त्रास होतो आहे हे छकूच्या लक्षात येत नव्हतं.‘ याच्या मनातील अस्वस्थता आपल्याला कधीच कळणार नाही का? इतकी वर्षे आपण याच्याबरोबरआहोत हा मला