कामीनी ट्रॅव्हल - भाग २३

  • 1.8k
  • 1k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २३ठरल्याप्रमाणे प्रवाशांच्या घरी जाऊन जाहिरातीचे शूटिंग झाले.सगळ्यांना शुटींग हा प्रकार नवीन होता त्यामुळे सगळे एक्साईट झालेले दिसले. ॲडशूट करणा-या टीमला हे सगळं बघून गंम्मत वाटत होती.जाहीरातीच्या शुटींगच्या दिवशी प्रियाला प्रत्येक प्रवाशांच्या घरी जातीनं हजर रहा असं प्राचीने तिला सांगितलं होतं. त्यामुळे ऑफीसमधलं काम नीट सांभाळून काही काम असीस्टंटवर सोपवून प्रिया शुटींग ज्या घरी असे तिथे हजर राहात असे.टिव्हीवरच्या जाहीरातीत त्यांच्याबरोबर प्रवास केलेले तरूण जोडपं, वृद्ध जोडपं, मध्यमवयीन जोडपं आणि हनीमून पॅकेज घेणा-यांची मुलाखत घेतल्याने कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल एक विश्वासार्हता निर्माण झाली. प्रवाश्यांच्या घरी हसत खेळत मूलाखत होऊ लागली. प्रत्येक जाहीरातीत वेगळे चेहरे असतं.हे चेहरे सामान्या लोकांचे होते.