कामीनी ट्रॅव्हल - भाग २३ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग २३

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २३

ठरल्याप्रमाणे प्रवाशांच्या घरी जाऊन जाहिरातीचे शूटिंग झाले.

सगळ्यांना शुटींग हा प्रकार नवीन होता त्यामुळे सगळे एक्साईट झालेले दिसले. ॲडशूट करणा-या टीमला हे सगळं बघून गंम्मत वाटत होती.


जाहीरातीच्या शुटींगच्या दिवशी प्रियाला प्रत्येक प्रवाशांच्या घरी जातीनं हजर रहा असं प्राचीने तिला सांगितलं होतं. त्यामुळे ऑफीसमधलं काम नीट सांभाळून काही काम असीस्टंटवर सोपवून प्रिया शुटींग ज्या घरी असे तिथे हजर राहात असे.

टिव्हीवरच्या जाहीरातीत त्यांच्याबरोबर प्रवास केलेले तरूण जोडपं, वृद्ध जोडपं, मध्यमवयीन जोडपं आणि हनीमून पॅकेज घेणा-यांची मुलाखत घेतल्याने कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल एक विश्वासार्हता निर्माण झाली. प्रवाश्यांच्या घरी हसत खेळत मूलाखत होऊ लागली. प्रत्येक जाहीरातीत वेगळे चेहरे असतं.


हे चेहरे सामान्या लोकांचे होते. प्रवाशांचे होते. कोणी सेलीब्रिटी वा गाजलेले माॅडेल ही जाहीरात करत नव्हते. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला.

जाहिरातींमध्ये दिसणारी मंडळी त्यांच्या घरात, घरातल्या कपड्यात, आपली रोजची कामं करताना कामीनी ट्रॅव्हल्स तर्फे केलेल्या प्रवासाचा आपला अनुभव सांगत. हा अनुभव समोर इतर प्रवासी दिसतायत आणि त्यांना ते आपला अनुभव सांगतात आहे असं वाटायचं.

नेहमी पाॅशकपड्यात आणि मेअकप दिसणारी मंडळी या जाहिरातीमध्ये दिसायची नाहीत. त्यामुळे जरा कुतूहलाने लोक ही जाहिरात बघू लागले.जाहीरातीत दिसणारा परिसर ब-याच लोकांच्या ओळखीचा निघत असे. यामुळे जाहीरात बघणारे लोक स्वतःला या जाहिरातींवर सहज जोडल्या गेले.


प्राचीची ही कल्पना चांगलीच यशस्वी झाली. जाहीरातीत दिसणारे चेहरे ज्यांच्या ओळखीचे होते ते लगेच या जाहीरातीशी मनानी जोडल्या गेले आणि नंतर प्रवास करून कामीनी ट्रॅव्हल्सशी जोडल्या गेले.

कामीनी ट्रॅव्हल्स बरोबर ज्यांनी प्रवास केला आहे त्यांच्या आठवणी ऐकून लोकांना कामीनी ट्रॅव्हल्स बद्दल एक विश्वास वाटू लागला. पेपरमधील जाहीरात आधीच लोकांच्या मनाला स्पर्श करून गेली होती. आता टीव्हीवरील जाहीरात बघून तर लोकं कामीनी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देऊ लागले.

प्रिया खूप आनंदाने प्राचीच्या केबिनमध्ये शिरली,

" मॅडम खूप आनंदाची बातमी आहे. आपली जाहिरात यशस्वी झाली. आपण जेवढ्या टूर्स प्लॅन केल्या होत्या त्या सगळ्या फूल झाल्या.तरी लोकांचे फोन येतात आहे.काय करायचं?"

" प्रिया बस. खूप छान बातमी दिलीस सकाळी सकाळी.
पुढचे टूर कधी घ्यायचे याबाबत आपण मिटींग घेउ."

" चालेल मॅडम. तुम्ही सांगा तसं मी तयारी करते."
प्रिया म्हणाली.

" प्रिया तू बाहेर गेलीस की यादवसरांना माझ्या केबिनमध्ये पाठव."
प्राचीच्या म्हणण्यावर हो म्हणून प्रिया प्राचीच्या केबीनबाहेर पडली.

***

टिव्हीवर ही जाहीरात बघून भय्यासाहेबांच्या अंगाचा तिळपापड झाला. हर्षवर्धन आणि प्राचीचा ऊत्कर्ष त्यांना बघवत नव्हता. सुंभ जळाला तरी पीळ गेला नव्हता..

जाहीरातीत सांगीतलेल्या नंबरवर भय्यासाहेबांनी फोन लावला.फोन कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीस मधल्या रिसेप्शनीस्टनी उचलला. भय्यासाहेब फोनवरून अद्वातद्वा बोलू लागले. सगळ्यांना शिव्या घालू लागले.फोन घेणारी ऑपरेटरनी घाबरून फोन ठेऊन दिला. पुन्हा बेल वाजते. ती फोन उचलत नाही.दोन तीनदा फोन वाजूनही ती उचलत नाही ते बघून यादवने तिला विचारले,

" प्रेरणा क्या हुआ? आप फोन क्यूँ नहीं उठा रही?"


"माहित नाही सर कोण आहे हा माणूस.फोनवर खुपचं घाणेरडं बोलतोय हर्षवर्धन सरांबद्दल आणि प्राची मॅम बद्दल."

"अरे कुछ तो नाम बताया होगा."यादवने विचारलं.

"हां बताया. कोई भय्यासाहेब पटवर्धन है."

यादवने हे ऐकलं आणि क्षणभर तो सुन्न झाला.तो लगेच अशोकच्या केबीनमध्ये गेला आणि त्याला ही गोष्ट सांगितली.

अशोकला काय बोलावं समजलं नाही पण तरी तो यादवला म्हणाला,

"यादव तुम्ही शांत रहा मी मॅमना सांगतो."

अशोक लगेच प्राचीच्या केबीनमध्ये जातो आणि तिला ही गोष्ट सांगतो. प्राचीला विश्वासच बसत नाही या गोष्टींवर.

भय्यासाहेब विकृत आहेत धूर्त आहेत पण असं काहीतरी करतील यावर तिला विश्वासच बसत नव्हता.

"प्राची आज एकदा त्यांनी फोन केला.वारंवार करायला लागले तर ऑफीसमध्ये यावर चर्चा व्हायला सुरुवात होईल. उगीचच तर्कवितर्क सुरू होतील.काय करणार आहेस?"

"हां बोलते." ती फोन करून संदीपला बोलावते

"आता येऊ मॅम"

" हो ये. संदीप लॅंडलाईनवरून हा नंबर लाव"

संदीपच्या हातात ती फोन नंबर लिहीलेल्या कागद देते. "फोन लावला की समोरच्या माणसाला तू काय सांगशील?"

"मी कामीनी ट्रॅव्हल्स मधून बोलतोय."

"नुसतं तेवढं नाही सांगायचं.कामीनी ट्रॅव्हल्स मधून मी प्राची मॅडमचा सेक्रेटरी संदीप विंचूरकर बोलतोय असं सांग नंतर बोल मॅडमना तुमच्याशी बोलायचय. मला फोन देऊन तू जा आणि केबीनबाहेर मी मिटींगमध्ये आहे असा बोर्ड लाव.आता लाव नंबर"


संदीप फोन लावला.

भय्यासाहेबांनी फोन उचलला.

"हॅलो"

"नमस्कार मी कामीनी ट्रॅव्हल्स मधून प्राची मॅडमचा सेक्रेटरी संदीप विंचूरकर बोलतोय.मॅडमना तुमच्याशी बोलायचय आहे."
एवढं बोलून फोन प्राचीच्या हातात देऊन संदीप केबीनबाहेर जातो.

" हॅलो मी प्राची बोलतेय."

"वा! सेक्रेटरी ठेवायला लागले आजकाल दीडदमडीची माणसं पण."असं बोलून कुत्सित हसतात. प्राची शांत असते.अशोक तिचं निरीक्षण करत असतो.

"बाबा तुम्ही आमच्या ऑफीसमध्ये फोन करून आमच्या रिसेप्शनीस्टला वाटेल तसं बोललात हे चांगलं केलं नाही."

भय्यासाहेब उसळून म्हणाले.

" मग काय आरती करू? तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांना खरंतर यापेक्षा वाईट भाषेत बोललं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. तू तर फारच खोटारडी आहेस.मतलबी बाई."
भय्यासाहेबांच्या एकेक शब्दांनी तिचा राग उसळत होता.पण ती शांत राहीली.

शांतपणे ती भय्यासाहेबांना म्हणाली

" पुन्हा आमच्या ऑफीसमध्ये फोन करायचा नाही. तरीही तुम्ही फोन केलात आणि आमच्या एम्प्लाॅइना त्रास झाला तर मी पोलीसात जाईन.आणि हे मी करू शकते.."
एवढं बोलून पुढचं काहीही न ऐकता प्राचीनी फोन ठेवला.

तिनी भय्यासाहेबांना फोनवर शांतपणे समज दिली..
अशोक तिचा ठामपणा आणि शांतपणा बघून चकीत झाला.

***

अशोकनी घरी आल्या आल्या वासंतीला ही बातमी सांगीतली. त्यावर जरा चिडूनच वासंती बोलली

"अहो या भय्यासाहेबांना दुसरा उद्योग नाही का? किती दिवस छळणार आहेत प्राचीला."

" विकृत माणसांचं काही सांगता येत नाही. पण वासंती प्राची आता छान धीट झाली आहे. जराही आवाज न चढवता तिनी भय्यासाहेबांना सांगीतलं."

वासंतीला तरी काळजीच वाटली.या विकृत माणसांचं कधी काय करायचं मनात येईल सांगू शकत नाही.

ही घटना घडून फार दिवस झाले नाहीत तर भय्यासाहेबांनी पेपरमध्ये जाहीरात दिली. माझी सून प्राची हर्षवर्धन पटवर्धन हिनी माझा अपमान केला आहे. हिनी माझी माफी मागीतली तरच तिच्या नव-याला म्हणजे माझ्या मुलाला हर्षवर्धनला माझा वारसदार समजीन. येत्या सात दिवसांच्या आत तिनी माझी माफी मागावी.

ही बातमी अशोकने प्राचीला दाखवली.. प्राची आपल्या वकीलांशी यावर बोलली तेव्हा ते म्हणाले,

"फार महत्व देऊ नका‌. पुन्हा कायदेशीर शब्दात काही आलं तर बघू."

म्हणून तिघही या जाहीरातीला महत्व देत नाहीत.

भय्यासाहेबांच्या कारवायांबद्दल प्राची कामीनी बाईंना सांगत नाही.त्यांना तशीच सारखी भीती वाटत असते की भय्यासाहेब काही वेडंवाकडं करतील का? त्रास देतील का? त्यात जर हे कळलं तर त्या फारच घाबरतील.

हर्षवर्धनसाठी त्या खूप हळव्या आहेत आणि महत्प्रयासानी हर्षवर्धन आता पहिल्यासारखा होतोय त्यामुळे खूप आनंदी आहेत. त्या आनंदावर आपण ही बातमी सांगून विरजण टाकायला नको असं प्राचीला वाटलं.

ती अशोकला ही बजावते.

" बाबा तुम्ही चुकूनही आईंसमोर या गोष्टीचा उल्लेख करू नका. आत्ता जरा त्या आनंदात असतात."

"प्राची मी अजीबात काही सांगणार नाही. तू काळजी करू नकोस.भय्यासाहेबांवर मात्र नजर ठेवायला हवी. त्यांच्या कुरापती वाढायला नको."

"हो ती काळजी मी घेणारच आहे. त्यांनी जास्तीच त्रास द्यायला सुरुवात केली तर पोलीसांचीपण मदत घेईन. भय्यासाहेब एवढुश्या दामदमटीनी ऐकणारे नाहीत. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललेलच कळेल. ती वेळ त्यांनी आणून नये म्हणजे मिळवली. बाबा तो नवीन एम्प्लाॅई घेतलाय आपण तो बरा आहे नं कामात.?"

" हो स्मार्ट आहे.पण जरा जास्तच चौकस आहे."

"बाबा आपण कोणतही अवैध काम करत नाही. तेव्हा घाबरू नका. तुम्ही आत्ता त्यांच्याबद्दल असं बोललात. त्यादिवशी यादव पण मला सांगत होता. हा आपल्याकडे लागलेला मुलगा आपलाच नोकर आहे की आपल्या प्रतीस्पर्धी कंपनीचा माणूस आहे बघावं लागेल."

" हे काय म्हणतेस तू?" अशोकने आश्चर्याने विचारलं.

"तो फक्त अकाऊंट सेक्शन पुरतं चौकस राहिला तर ठीक आहे. पण इतर विभागातही तो चौकशी करतो.हे योग्य नाही.म्हणून माझ्या डोक्यात आलं.बाबा आपण खूप कमी काळात चांगला जम बसवला आहे त्यासाठी कोणी काही करत असेल असं."

" मला यातलं काही कळत नाही."
अशोक म्हणाला.हसून प्राची म्हणाली "" तुम्ही काळ्जी करू नका बाबा.मी बघते."" प्राची संदीपला आत बोलावते.

"आता येऊ मॅडम?"

" हो.ये. संदीप ते सुबोध पाटकर प्रायव्हेट डिटेक्टीव्ह यांच्याशी झालं का बोलणं?"

" हो.मॅडम. मी आत्ता सांगणारच होतो. ऊद्या सकाळी ११वाजता ते येणार आहेत आपल्या ऑफीस मध्ये."

"ती वेळ मी कोणाला दिली आहे का?"

" नाही.म्हणूनच मी त्यांना ११ची वेळ दिली."

" ठीक आहे.ते ऊद्या येतील तेव्हा तू थांब केबीनमध्ये."

" हो."
" आता गेलास तरी चालेल."
संदीप केबीनच्या बाहेर गेला.

अशोक रोज प्राचीचं नवीन रुप बघत असतो आणि चकीत होत असतो. हीच का ती आपली प्राची अवखळ,थोडी हट्टी, मस्ती करणारी पण अभ्यासही तेवढाच प्रिय असलेली आज किती समजूतदार झालीय.किती भराभर निर्णय घेते.त्या निर्णयामागे तिनी चहूबाजूंनी विचार केलेला असतो. अशोकच्या डोळ्यात आनंदानी पाणी येतं ते अशोक पुसायला हात वर करतो तेव्हाच प्राचीचं लक्ष जातं.

"काय झालं बाबा? रडताय?"

"नाही ग हे आनंदाश्रू आहेत. माझी अवखळ पोरं आज किती समजूतदार झालीय हे बघतोय. रोज मला तुझं नवीन रूप बघायला मिळतं.वाटलच नव्हतं कधी मला आणि वासंतीला तुझ्यात इतका बदल होईल."

"या लग्नामुळे मी बदलले.आईंचा प्रेमळ स्वभावामुळे मी त्या घरी थांबले नाहीतर कधीच घटस्फोट घेतला असता. त्यांचा माझ्यावर इतका जीव आहे की सतत त्या भय्यासाहेबांपासून मला वाचवायला बघायच्या.मग मीही ठरवलं त्यांच्या मुलाला ठीक करण्यासाठी भय्यासाहेबांशी वाकडं घ्यायचं.पण गोड शब्दांत.ते फसले माझ्या काव्याला.

हर्षवर्धन खूप चांगला आहे बाबा.त्याची काही चूक नसताना तो या व्यसनाच्या विळख्यात अडकला.त्यातुन त्याला बाहेर काढायचं मी ठरवलंच होतं.आज खूप आनंद होतो आहे की तो या सगळ्यातून बाहेर पडला आहे.तो पुर्वीसारखा व्हायला वेळ लागेल पण माझी तयारी आहे थांबायला.अर्धी लढाई जिंकली आहे."

"प्राची तुला हॅट्स ऑफ.तू ऊरलेली लढाई जिंकणारच आहेस"
अशोक उठून प्राचीपाशी येऊन तिला शाबासकी देऊन केबीनबाहेर गेला. प्राची आपल्याच तंद्रीत हरवून जाते.

राधाचा फोन येतो. प्राची फोन घेते.

"हॅलो.बोल."

"काय ठरवलय का हनीमूनला जाण्याचं?"

"हो.मी आईंशी बोलले याबद्दल. त्याही खूप खूष झाल्या. म्हणाल्या इथली काही काळजी करू नको. मी आमचा टूर प्लॅन करायला प्रियाला सांगीतलय.तिला सवय आहे सगळा प्लॅन ठरवायची.""


""काही हरकत नाही कोणीही ठरवलं तरी. तुम्ही दोघं फिरायला जाणं महत्वाचं आहे. तुझा प्लॅन ठरला की सांग."

"हो सांगते. आम्ही नाही राहणार तेव्हा आई असतील ऑफीसमध्ये.तू आणि शशांक चक्कर टाकत जा.बाबापण आहेतच तरीसुद्धा तुम्ही दोघं येत जा."

"हो.तू सांगीतलं आहेस.ओके मॅम. तुम्ही दोघं निश्चींतपणे जा."


प्राची आज खूप आनंदात असते का?तर तिचा आणि हर्सवर्धनचा बाहेर फिरायला जाण्याचं ठरतंय. अगदी नव्यानवलाईची जी गंम्मत असते ती येईल का माहिती नाही.कारण त्यावेळेस प्राची खूपच वीचित्र स्वरुपाच्या संकटाला तोंड देत होती. त्यातून बाहेर पडता पडताच इतकी वर्ष लागली. ते नवथर वय आता राहीलं नाही पण ज्याला सुधारण्याचा अट्टाहास केला. तो पुर्ण बरा होऊन आपल्याबरोबर पुलपंखी जीवन जगण्यासाठी येणार आहे. आता वयाचा निब्बरपणा लक्षात घ्यायचा नाही. आपल्यालाच पुढाकार घेऊन हळुहळू हर्षवर्धनच्या मनाला फुलवायला हवं.

पुढल्या आयुष्याची,संसाराची सुंदर स्वप्नं आपणच त्याला दाखवायला हवी.त्याला त्यातील आनंद उलगडून दाखवायला हवा.ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.


आपल्याच विचारांच्या नादात ती कधी घरी पोचली तिलाच कळलं नाही.आज हर्षवर्धन ऑफीसला आला नव्हता.मधूनच कधीतरी त्याला ऑफीसमध्ये यायचा कंटाळा येई. प्राचीपण त्याला जबरदस्ती करत नसे.कारण त्याचा मेंदू मिटींग,चर्चा याने खुपदा दमून जायचा.अशावेळी तो कंटाळा करत असे. त्यांच्या कलाकलानी अजून काही दिवस चालावं लागणार होतं.टूरवर जाऊन आल्यावर बघायचं त्याच्यात किती आणि कसा बदल होतो ते.

गाडी पार्कींग मध्ये ठेऊन लॅपटाॅप आणि पर्स घेऊन प्राची गाडी लाॅक करून लिफ्ट कडे गेली.
--------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका… मीनाक्षी वैद्य.