पीर बाबाची कृपा भाग ५दर्शनला त्या दिवशी पुर्णत रात्रभर बांधून ठेवल होत - दर्शनच्या देहात घुसलेल्या त्या शक्तिने सुटण्यासाठी खुप प्रयत्न केले , शिवीगाळ, धमकी, सर्वकरून पाहिल.. पन दर्शनच्या घरातल्यांनी त्याला गच्च बांधून ठेवल होत..- सुटका होणे असंभव होत. दुस-या दिवशी सकाळीच दर्शनला दरग्यात आणल गेल- ती एक चौकोनो दहा x दहा ची खोली होती- खोलीत चारही बाजुंना भिंतीवर हिरवा रंग होता .. खाली पांढरी फरशी होती- दर्शनला खोलीच्या मधोमध मांडीवर बसवल होत. त्याच्यासमोर फकीर बाबा बसलेले त्यांच्या अंगात हिरवा जब्बा होता- गालांवर मोठी वाढलेली पांढरट दाढी होती ,डोक्यावर पांढरी गोलसर टोपी होती . हातात एक सफेद मण्यांची माळ आणी