भाग 3 शेवटी पाहता पाहता चार दिवस निघुन गेले ..पन ह्या चार दिवसात विलासरावांना खुपच विलक्षण अनुभव आले होते - मध्यरात्री काही काही विचीत्र स्वप्ने पडत होती- झोपेतून दचकून जाग येत होती. सतत दोन्ही खांद्यांवर भार असल्यासारख अंग दुखत होते - अस वाटत होत की अंगा खांद्यावर कसला तरी ओझा आहे. रात्री दिड वाजेच्या समई छातीवर कोणीतरी बसल्याची जाणिव होई , एका कुशीवर झोपले असताना सतत मागे कोणीतरी मांडी घालून बसून आपल्याकडे एकटक पाहत्ंय अस मनाला वाटायचं , पन मागे वळून पाहिल्यावर रिकामी जागा नजरेस पडायची , रात्री - अपरात्री चार पाच वेळा त्यांनी आपल्या खोलीत कोणाच्यातरी हलक्या स्वरातल्या कुजबूजण्याचा