भाग 4 घरीयेताच विलासरावांनी प्रथम बैटरी संपलेला नोकियाचा फोन चार्जींगला लावला आणि मग मस्त फ्रेश झाले, फ्रेश झाल्या नंतर जेवन वगेरे उरकुन..त्यांच्या पत्नी मोहीनीबाईंना आपण पत्ते खेळायला चाललो आहोत अस सांगितल.त्यावर मोहिनीबाईंनी "ठिक आहे एवढच प्रतिउत्तर दिल. सांगायच झाल तर मोहिनीबाईना विलासरावांचा हा छंद बिल्कुल आवडत नव्हता, पन म्हंणुन त्या वाद वगेरे घालत नसायच्या कारण त्यांचा स्वभाव खुपच प्रेमळ होता. म्हंणुनच तर आयुष्य सुखात सुरु होत. साडे आठ च्या सुमारास विलासराव थोडीफार रक्कम सोबत घेऊन अन्ना पाटलांच्या घरी पत्ते खेळायला निघाले. अन्ना पाटलांच घर म्हणायला एक बंगलाच होता. बंगला गावापासुन लांब होता, आणी बंगल्यापासून सत्तर मीटर अंतरावर गावच स्मशान होत.