Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 13

भाग 4






घरीयेताच विलासरावांनी प्रथम बैटरी संपलेला नोकियाचा फोन चार्जींगला लावला आणि मग मस्त फ्रेश झाले, फ्रेश झाल्या नंतर जेवन वगेरे उरकुन..त्यांच्या पत्नी मोहीनीबाईंना आपण पत्ते खेळायला चाललो आहोत अस सांगितल.त्यावर मोहिनीबाईंनी "ठिक आहे एवढच प्रतिउत्तर दिल. सांगायच झाल तर मोहिनीबाईना विलासरावांचा हा छंद बिल्कुल आवडत नव्हता, पन म्हंणुन त्या वाद वगेरे घालत नसायच्या कारण त्यांचा स्वभाव खुपच प्रेमळ होता. म्हंणुनच तर आयुष्य सुखात सुरु होत. साडे आठ च्या सुमारास विलासराव थोडीफार रक्कम सोबत घेऊन अन्ना पाटलांच्या घरी पत्ते खेळायला निघाले. अन्ना पाटलांच घर म्हणायला एक बंगलाच होता. बंगला गावापासुन लांब होता, आणी बंगल्यापासून सत्तर मीटर अंतरावर गावच स्मशान होत. गावातल कोणीही मेल की राम नाम सत्य हे च्या घोषात प्रेतयात्रा बंगल्या जवळून जात असायची. दिवसा ढवळ्या काही वाटत नसायच पन रात्री? विलक्षण भीतीदायक कल्पना! नाही का?
साडे आठ वाजता घरुन निघालेले विलासराव दहा- पंधरा मिनीटांनी अन्ना यांच्या बंगल्यावर पोहचले . सर्वप्रथम त्यांनी दारातुनच एक कटाक्ष आत टाकला तस त्यांना दिसल , मखारीत बाप्पा विराजमान झालेले आहेफ आणी बाप्पांच्या पुढे बंगल्यातल्या प्रथम हॉलमध्ये तीस - पसतीस जुगारुंचा जमिनीवर वेग वेगळा घोळका करुन पत्त्यांचा डाव रंगला होता.
हॉलमधल्या पिवळ्या भिंतींवर चार ट्यूब पेटत होत्या. हॉलमध्ये मधोमध एक भलामोठ्ठा लाईटचा झुंबर टांगला होता. म्हंणायला लाईटचा झगमगाट संपुर्णत हॉलमध्ये पड़ला होता. एका साईडला बाप्पाची मोठी फाइस्टार ड़ेकोरेशन केलेली मखर नी त्यात पाच दिवसाचा पाहुणा बाप्पा विराजमान झालेला दिसत होता. विलासरावांनी हॉलमध्ये प्रवेश करुन सर्वप्रथम बाप्पाचे चरण स्पर्श करत आशिर्वाद घेतला. मनोमन पत्ते खेळताना डाव माझाच येवो अस म्हंटल. पाया पडल्या नंतर त्यांनी बाप्पाच्या मुर्तीजवळ प्रसाद म्हंणून ठेवलेला शिरा एका कागदाच्या पुडीत बांधून घेतला आणी ती पुडी वरच्या खिशात ठेवली व लागलीच समोर बसलेल्या जुगारुंमध्येच पन्नास रुपयांच एक टेबल पकडल , पत्ते खेळू लागले. पाच सहा डाव उलटले
परंतु एकही डाव विलासरावांकडे आला नाही. पाहता-पाहता अजुन पाच सहा डाव उलटले आणी खिशाला चांगलाच फटका बसला, विलासरावांचा हसरा चेहरा आता पार कालवंडला होता. पैसा जसा हातुन सटकायला सुरुवात झाली चेह-यावर उदासीनतेचा अमळ चढला शेवटी विलासरावांनी जागा बदलायची ठरवली आणि आंतिम डाव म्हंणत शेवटचा डाव बदललेल्या जागेवर बसुन खेळायला सुरुवात केली. की अचानक तो डाव विलासरावांचा पाहिला डाव म्हंणुन आला.-जो की पुढे घडणा-या अक्लीष्ट घटनेचा साक्षीदार होणार होता. नियतीने रचलेल्या जाळ्यात विलासराव अटकणार होते. एक डाव येताच विलासराव पुन्हा त्याच जागेवर बसले. एकापाठोपाठ चार डाव येताच त्यांच्या दूखी भावनेचा चकनाचुर झाला. चेह-यावर प्रसन्न भाव पसरले.डोळ्यांत पैस्यांची हाव झळकू लागली.
एकावर एक डाव रचले जात होते. विलासरावांना जुगाराची नशा इतकी चढली होती , की साडे बाराच्या आत घरी जाणारे विलासराव एक वाजुन गेला तरी जागेवरुन उठले नव्हते. जुगारात फेकले जाणारे पैसे जणु त्यांना जागेवर बसायला भाग पाडत होते. पन्नास, शंभर, पाचशेच्या नोटांचा थवा त्यांच्या डोळ्यांसमोर थयथय करत नाचत होता. पाहता पाहता दोन वाजुन चाळीस मिनीटे झाली. तब्बल पाच सहा तास बसुनच असल्याने त्यांची पाठ दु खु लागली. त्यावेळेस आता सारखे स्मार्टफोन्स नव्हते.. विलासरावांकडे असलेला नोकीयाचा फोन सुद्धा बैटरी संपल्याने त्यांनी घरी चार्जिंगला लावला होता.

आणी उजेड म्हंणून सोबत फक्त एक चार्जिंगची बैटरी घेतली होती..

शेवटी अडीज वाजले तेव्हा गावातल्याच कोणितरी ओळखीच्या मांणसाने विलासरावांना वेळेची जाणिव करुन दिली. पन जुगारात जिंकणा-या पैश्याच्या लालसेने विलासराव वेडे झाले होते ..

शेवटी विलासरावांनी अजुन अर्धातास जुगार खेळला आणि मध्यरात्रीच्या तीन वाजेच्या समई
ते घरी जायला निघाले..

आबा पाटलांनी विलासरावांना अडवल होत व टाईम खुप झाल आहे , आता एकटा घरी जाऊ नको आजची रात्र बंगल्यातच काढ़ व सकाळी घरी निघून जा अस सांगितल ..

पन विलासरावांचा पुरुषीपणा मध्ये आला , ते मोठ्या थाटात म्हंणाले ..! मी कुणाच्या बा ला घाबरत नाही- मर्दगडी आहे मी , एका चापटीत लोळवीन समोरच्याला..
शेवटी अस म्हंणून विलासराव मध्यरात्री 3:15 दरम्यान पाटलांच्या वाड्यातून घरी जायला निघाले ..

आकाशात चंद्राची कोर उगवली होती,
चंद्राचा निळसर प्रकाश चौहू दिशेना पसरला होता .
त्या निळसर प्रकाशात आजुबाजुला असलेली
झाडे गडद काळीशार दिसत होती.

आणी समोरची मातीची ती सरळ गेलेली पायवाट कालोखात बुडली होती..


हातातल्या बैटरीचा पिवळसर गोल प्रकाश बिंदू अंधाराच्या काळ्या पडद्याला चिरुन विलासरावांना समोरची वाट दाखवण्याच काम बजावत होत..

थंडीचा महिना असल्याने मध्यरात्रीच पांढ़रट मंद धुक अवतीभवती पसरल होत.

त्याच धुक्यातून चालत जातांना थंडी अंगाला चिटकली जात एक तीव्र सनक हाडा मांसात घुसत होती व थंडीच्या स्पर्शाने सर्व शरीर शहारुन उठत होत..


विलासरावांच्या पायात असलेल्या पैरागॉन चपलीचा चट चट आणी रातकिड्यांचा किरकिर असा मिश्रित आवाज त्यांच्या स्वत:च्या कानांवरच पडत होता.

विलासराव बैटरीच्या पिवळसर उजेडात वाट कापत निघाले होते ..!

तोच अचानक त्यांच्या मागून कोणीतरी वेगाने धावत गेल..



क्रमशः