भाग २, 1/2/2002 गुरुवार ..दूसरा दिवस..: दुपारचे साडे बारा झाले होते. चारही दिशेना दूपारचा कडक असा पिवळ्या धमक रंगाचा उन्ह पडलेला होता , चारही दिशेना वाहणारी हवा ,आपल्यासोबत उन्हाचा उष्मा घेऊन फिरत होती.. हवा शरीरावर आदळताच त्वचेला गरम झळ बसत होती.. शाळेतल्या सर्व मुलांची साडे बारा वाजताची पहिली सुट्टी झाली होती.. ! रिया आपल्या दोन मैत्रिणींसमवेत शाळेचा परिसर हिंडत होती..! तिच्या मैत्रिणीं कडूनच तिला शाळेच्या मागे मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे हे सुद्धा कळाल होत.. मैदानात दोन झोके होते, आणी पिवळ्या लाल रंगाचे दोन सिसॉही होते..!