भाग २,
1/2/2002 गुरुवार ..
दूसरा दिवस..:
दुपारचे साडे बारा झाले होते.
चारही दिशेना दूपारचा कडक असा पिवळ्या धमक रंगाचा उन्ह पडलेला होता , चारही दिशेना वाहणारी हवा ,आपल्यासोबत उन्हाचा उष्मा घेऊन फिरत होती..
हवा शरीरावर आदळताच त्वचेला गरम झळ बसत होती..
शाळेतल्या सर्व मुलांची साडे बारा वाजताची पहिली सुट्टी झाली होती.. !
रिया आपल्या दोन मैत्रिणींसमवेत शाळेचा परिसर
हिंडत होती..!
तिच्या मैत्रिणीं कडूनच तिला शाळेच्या मागे मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे हे सुद्धा कळाल होत..
मैदानात दोन झोके होते, आणी पिवळ्या लाल रंगाचे दोन सिसॉही होते..!
मैदानाचा हा भाग अजुन पुढे पुढे गेला होता..
चालत गेलो तर जेमेतेम , दिडशे दोनशे पावळांवर
शाळेच पांढ-या भिंतींच कंपाउंड होत...
त्या कंपाऊंड जवळच एक काटेरी बोरांचा , साडे नऊ फुट उंचीच झाड़ दिसत होत..
कंपाउंडच्या पलिकडे ती झाडांची चौहू दिशेना पसरलेली मुर्द्यांची फौज उभी होती..
" पल्लवी , नव्या तिथे बोराच झाड आहे का ग? ए आपण तिकडे जाऊयात का ग ! मला बोर खायला खुप आवडत ग!"
रिया उत्सुकतेने म्हंटली.
तिचा ईशारा शेवटच्या कंपाऊंडच्या टोकाला असलेल्या भिंतींच्या दिशेने होता.
" पल्लवी आपण नंतर जाऊयात का, आता सुट्टी संपेल ना ? आणी तसंही त्या बोरीची बोर कोणी खात नाही " नव्या म्हंटली. पन तीचा स्वर काफरा होता , नव्याच्या बोलण्यात भीतिची कंपने जाणवत होती.
रियाच्या बाळ नजरेनतून ती गोष्ट सुटली नाही.
तिने आपल्या मैत्रिणीला नव्या विचारलं सुद्धा
" नव्या , तू ईतकी घाबरुन का बोलत आहेस !"
रियाच्या त्या वाक्यावर ह्यावेळेस पल्लवी बोलू लागली तिच्या सुरात सुद्धा भीतिची कंपने होती.
" कारण शाळेतली पोर म्हंणतात तिथे एक भुत आहे, आणी आम्ही भुताला घाबरतो..!"
पल्लवीच्या बोलण्यावर रियाने एकवेळ दोघिंकडे पाहिल व म्हंणाली.
" नव्या - पल्लवी अंग असं काही नसत ग , माझी मम्मा म्हंणते देव- भुत बित वगेरे सगळं खोट आहे..! ते फक्त आपले भास असतात, चला आज मी तुमच्या दोघांची भीती दुर करते चला आपण पाहूणच येऊयात, आणी मस्त पैकी बोरेही पाडून खाऊयात.!"
रिया , पल्लवी, नव्या अश्या ह्या तीन मुली - ज्या अजुन खुपच लहाण होत्या , ज्या तिघिंना जगाची बिल्कुल अद्याप माहीती नव्हती.. !
समोर दिसत असलेल्या दृश्यावर विश्वास न ठेवण्याचं त्यांच वय नव्हतं, दिसतं तस्ंच असतं ही मनाची ठाम घडण होती , आणी पाहिलेली गोष्ट ध्यानातून कधीही न जाण्याचं ते परिपक्व,कोवळ वय होत - फक्त दहा अकरा वर्षाच..
ह्या अश्या कोवळ्या वयाच्या मुलांना , भुत-खेतांसंबंध काय कळणार होत !
पल्लवी , नव्या शाळेच्या मागच्या बाजुला असलेल्या शेवटच्या कंपाउंडच्या भिंतीपाशी कधीच आल्या नव्हत्या -
त्या कोवळ्या वयाच्या मुलींच्या मनात भुत,बुवा
जे खुप वाईट असत , ह्या ऐकीव माहितीनुसार मनात एक छोठीशी भीति पसरली होती..
जी त्या बोरीकडे जाऊन देत नव्हती
पन आज रियाच्या हिंमतीमुळे त्या दोघींच्या भीतिला दूर हिबाळल गेल होत.
तिघिही मुली त्या कंपाऊंडच्या भीतिंच्या दिशेने निघाल्या होत्या ...
जिथे ती काटेरी कालिशार खोडाची , साडे आठ फुट उंचीची बोर होती.
तिघिंच्याही डोक्यावरुण आकाशात सुर्याचा गोल गोळा पेटलेला दिसत होता - सुर्याच्या पिवळसर प्रकाशात तिघांच्याही काल सावल्या खाली जमिनीवर पडलेल्या दिसत होत्या..
त्यांच्या प्रत्येक पावळासरशी ती कालिशार सावली तपकीरी रंगाच्या मातीवरुन त्यांच्या सोबत पूढे पुढे चालत निघाली होती..
पाहता पाहता त्या तिघिंनीही शाळा मागे सोडली,आणी चालत चालत तिघिही कंपाऊंडच्या शेवटच्या भिंतीपाशी आल्या -
त्या तिघिंपासून समोर दहा पावळांवर एक काटेरी बोरीच साडे आठ फुट उंचीच झाड होत ,
बोरीच्या काटेरी फांद्यावर लहान - लहान हिरव्या रंगाची गोल गोल नुकतीच उगवलेली हिरवी हिरवी बोर दिसत होती..
आणि अश्याच एका फांदीला एक दोरी बांधलेली दिसत होती,
जणू कोणीतरी फास वगेरे टांगला असावा !
व ते खरच होत ना !
या पाहूयात ते कस ते ?
" ए नव्या , पल्लवी त्या बोरीच्या झाडावर ती दोरी कोणी बांधली असेल ग ?" रियाने विचारल..
तिच्या त्या वाक्यावर नव्या -पल्लवी दोघींनिही घाबरत एकमेकिंकडे पाहिल..
त्या कोवळ्या वयाच्या दोन्ही मुलींच्या नजरेत भीतिचा उद्रेक झाला होता..
ती विस्फारलेली पांढ-या बुभळांची नजर, ते थरथरणारे ओठ भीतिचा उच्चांक दर्शवत होते.. !
आणी पुढच्याचक्षणाला त्या दोघिंच्या मनात पुन्हा एकदा भीतीच वार चढल ,
दोघीही रियाला तिथेच एकट्या सोडून धावत ते थेट शाळेच्या दिशेनेच.. सुटल्या.
रिया मात्र तिथेच उभी होती, त्या दोघिंना अस अचानक काय झाल ?रिया आपल्या मैत्रिणींच्या पळत पळत पुढे जाणा-या आकृतीना जागेवरच उभ राहून पाहत होती..
तेवढ्यात रियाच्या बाळमनाला आपल्या मागे कोणितरी उभ असल्याची तीव्र स्वरातली जाणिव होवू लागली ,
तिच्या चेतातंतूमार्फत मेंदूला एक संदेश मिळाला...
अस म्हंणतात की लहाण मुल आपल्या माता -पित्यांच चालण, बोलण,स्वभाव सर्वकाही वागण्याच अनुसरण करतात ..!
रियाच्या वागण्यात सुद्धा आपल्या मम्मीच मोहिनीबाईंचा स्वभाव गुण होते!
हुशार , न घाबरणा-यांमधला,तिच्या मम्मीच मॉन्सटर ,भुत- देव अस काहीही नसत ही शिकवण तिला नेहमीचंच ठावूक होती..
म्हंणूनच अचानक काहीतरी मागे जरी अवतरल, तरी तिच मन घाबरणार नव्हत..
रियाने अलगद वळून समोर पाहिल आणी तिच्या नजरेला जे दृष्य दिसल ते खरंच विळक्षण, अविश्वनिय , मेंदूला न पटणार होत..
रिया पासून दहा पावळांवर उन्हाच्या तळपत्या पिवळसर उजेडात , बोरीच्या झाडाची जमिनीवर कालिशार सावली पडली होती - आणी बोरीच्या खोडाजवळ त्याच काळ्याशार सावलीत -
ती काळ्या लुगड्यातली, डोक्यावर त्याच लुगड्याचा पदर घेतलेली, शरीरयष्टीने लुकडी असलेली एक 70-80 वयाची म्हातारी , पाठीत बाक आल्यासारखी पाठ वाकवून तिथे उभी होती..
न जाणे कोठुन पन त्या म्हातारी जवळून पांढरट धुक वाहत पुढे निघुन जात होत,
क्रमश