जखिन भाग 1
मोहिनी मुकुंद शेट्टे वय वर्ष पसतीस पेशाने सरकारी शिक्षिका होत्या , त्यांच्या परिवारात पती मुकुंदराव दहा वर्षा अगोदर एटेक येऊन मय्यत झाले होते -
म्हंणजेच 1992 ला..!
मोहिनीबाईं बद्दल सांगायचं तर त्या देवांवर विश्वावास ठेवणा-या मधल्या नव्हत्या, आपण त्यांना नास्तिकच समजुयात..
नव-याच्या अकाळी जाण्याने जर कोणी दुसरी स्त्री असती तर तिने देवाला दोष दिल असत !वर्षभर तोंडात पदर खोचून हूंदके देत रडत राहिली असती,
स्वत:च्या नशीबाला दोष देत बसली असती..
पन मोहिनीबाइंनी तस काहीही केल नव्हत
..कारण त्यांच्या मते देव थोडीना त्यांच्या मदतीला येणार होता..!
देव ही गोष्ट फक्त नाममात्र आहे , मांणसाने बनवलेली एक धोतांड कल्पना आहे, हे त्यांचे मनाचे विज्ञानवादी श्रेणीचे उच्च विचार होते..
मुकुंदारावांकडून मोहिनीबाईंना एक मोठा मुलगा विशाल मुकुंद शेट्टे वय तेरा ( तो सातवी इयत्ते शिकत होता) , आणी एक मुलगी रिया मुकुंद शेट्टे
वय वर्ष दहा ती दूस-या इयत्तेत शिक्षण घेत होती..
तर ही झाली मोहिनीबाईंच्या परिवाराची थोडक्यात ओळख.
मुकुंदरावांच्या परिवारात म्हंणायला ते एकुलते एक होते , त्यांचे आई - वडील मुकुंदरावांचे लग्न
झाल्यानंतर तीन वर्षांनीच स्वर्गवासी झाले होते..
नातेवाईक तसे म्हंणायला फारच कमी होते ...व अश्या काळात कोण आपला, आणि कोण नाही, हे कळून येतच ! नाही का ?
मोहिनीबाई कोणावर अवलंबून राहणा-यां मधल्या नव्हत्या.
पतीच्या मृत्युनंतर मुलांची जबाबदारी पुर्णपणे मोहिनीबाईंनी स्वत:टच्या खांद्यावर घेतली होती ,
आणी त्यांनी ती जबाबदारी स्वत:च्या हिंमतीवर अगदी काटेकोरपणे पेळली होती..
मोहिनीबाईंनी सरकारी विधवा मदत केंद्राकडे जाऊन स्वत:ला काम मिळाव ह्याकरीता , अर्ज भरला होता..
महिन्याभराने पोस्टमन नोकरी मिळाल्याच अर्ज घेऊन आला होता ..!
मोहिनीबाईंच्या शिक्षण पातळीनुसार त्यांना सरकारी शिक्षिकेची नोकरी मिळाली होती..
तर मित्रहो हे झाल मोहिनीबाईंच थोडक्यात भुतकाळातल पुर्व आयुष्य !
आणी माझ्याकडून अश्या ह्या मायेला कोटी कोटी प्रणाम!
कारण अस स्वत:च्या स्व: बळावर , ह्या जगात स्वत:च आस्तित्व टिकवून ठेवणे म्हंणजे साधीगोष्ट नाही..!
कारण एका विधवा स्त्रीकडे समाजातली मांणस कोणत्या द्रुष्टीने पाहतात , हे ईथे वेगळे सांगायलाच नको, पण मोहिनीबाईंसारख्या स्त्रीने स्वत:च्या जिद्दीवर , ह्या समाजाच न ऐकून स्वत:च्या जिवनाचा गाडा सुरु ठेवला , आज 2024 मध्ये त्यांची दोन्ही मुल मोठ्या सरकारी हुद्यांवर कार्यरत आहेत..
दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे- त्यांना स्वत:चा परिवार सुद्धा आहे.
तर मित्रहो आता जास्त वेळ न घेता सत्यकथेकडे वळूयात..!
तर अनुभवनासूर झालं अस , की 2002 ह्या साली - मोहिनीबाईंची एका शाळेतून दुस-या शाळेत बदली झाली होती..
( ते गाव ,त्या शाळेच नाव ईथे उच्चारल जाणार नाही , अनुभवकर्त्यांनी तशी सख्त ताकीद दिली आहे.! )
मोहिनीबाईंची शाळेतून बदली झाली होती,
सरकारी नोकरी असल्याने राहण्यासाठी घर शोधण्याची गरज पडली नव्हती ,
शाळेकडून मोहिनीबाईंना बंगलो सोसाईटी मध्ये एक बंगला रहायला मिळाला होता..
बंगल्याच्या अवतीभवती अजुन खुपसारे बंगले दहा- बारा बंगले होते-
पण तीन चार बंगल्यांमध्येच वस्ती होती- बाकी उर्वरीत बंगले , ती वास्तु , निर्जीव - मानवी स्पर्शाने वर्जित होती.
मोहिनीबाईंना रहायला मिळालेला बंगला म्हंणायला दोन मजली होता, प्रशस्त बांधणीचा होता..!
बंगल्याला चारही बाजुंनी नऊ फुट उंचीच चौरस आकाराच कंपाउंड होत, कंपाउंडला मधोमध एक छोठस गेट होत..
त्या गेटमधुन आत गेलो की पूढे पाच पावळांवर एक दोन झापांचा , साडे सात फुट उंचीचा दरवाजा दिसत होता.
बंगल्याच्या चारही बाजुंना खाली कट केलेल हिरव गवत सुद्धा दिसत होत !
बंगल्याच्या दोन झापांच्या सताड उघड्या दरवाज्यातून खालची पांढ-या रंगाची शाही पॉलीश केलेली फर्शी दिसत होती..
बंगल्याच्या दरवाज्यातून उभ राहून डाव्या बाजूला पाहता एक सोफा , आणी त्या पुढे टिपॉय ठेवलेला दिसत होता..
त्या सोफ्या पुढेच एक बंद दरवाजा होता ,नक्कीच तिथे बैडरुमची खोली होती.
टिपॉयच्या उज्व्या बाजुला दहा पावलांवर किचन होत , जरा बाजुलाच एक जिना सुद्धा होता , जो किचनच्या भिंतींवरुन दुस-या मजल्यावर जात होता..
दुस-या मजल्यावर सुद्धा डावि आणी उजवीकडे दोन अश्या खोल्या होत्या..
दोन्ही खोल्यांमधोमधून एक कॉरिडोर सारखी सरळ वाट पुढे जात होती, आणी एका दरवाज्या समोर येऊन थांबत होती, त्या दरवाज्या पल्याड टेरेस होत.. संध्याकाळ झाली की टेरेसवर थंडगार हवा सुटायची .म्हंणायला बंगल्याची बांधणी खुपच विचारपुर्वक केली होती.
मोहिनीबाईंच जे काही सामान होत , ते टेम्पोतून ईथे आणुन पहिल्याच दिवशी मजुरांमार्फत बंगल्यात लावुन घेतल होत.
आणी मोहिनीबाई बंगल्यात आपल्या दोन्ही मुलांसहीत शिफ्ट झाल्या होत्या !
आज रविवार असल्याने मोहिनीबाईंना सुट्टी होती..
तर उद्या सोमवारपासून म्हंणजे दुस-या दिवशी पासून त्यांना नव्या शाळेत रुजू व्हायचं होत..
मोहिनीबाईंनी आपल्या दोन्हीमुलांच नाव सुद्धा त्याच शाळेत नोंदवल होत..!
31 /1 / 2002 बुधवार ..!
मोहिनीबाईंकडे मुकुंदरावांची मारुती 800 लाल रंगाची गाडी होती..!
त्याच गाडीने त्या आपल्या दोन्ही मुलांसहित शाळेत जायला निघाल्या.
शाळा तशी म्हंणायला मोहिनीबाईंच्या बंगल्यापासूनन साडे पाच किलोमीटर अंतरावर होती..
शाळा डोंगराच्या मधोमध बांधली होती ,शाळेच्या चारही दिशेना हिरवी गार झाडे असून जंगलासारखा भाग होता..
शाळेत जायचा रस्ता डोंगरावरुन घाटासारखा नागमोडी वळण घेत जात होता..
मोहिनीबाईंची मारुती 800 लाल रंगाची
गाडी त्या डोंगरावरच्या काळ्या कुट्ट रस्त्यावरुन धावत निघाली होती.
मोहिनीबाई गाडी चालवण्यात व्यस्त होत्या,
त्यांच्या बाजुच्या सीटवर विशाल आपल्या शाळेतील युनिफॉर्म सफेद शर्ट खाली गडद निळसर हाल्फ पेंट मध्ये बसला होता.
तर मागच्या सीटवर निळसर फ्रॉकमध्ये रिया
खिडकीजवळ बसली होती..
तिच सर्व लक्ष खिडकीतून बाहेर होत..
सकाळच्या कोवळ्या उन्हाचा तपकिरी प्रकाश तिच्या गोंडस गोलसर चेह-यावर पडला होता..! सुर्याच्या प्रकाशाने तीचा चेहरा पुर्णत ऊजळून निघाला होता.!
गोबरे गाल , पाणीदार डोळे, रेखीव भुवया, नाक मोहिनीबाईंवरच गेल होत -
काळ्याशार केसांच्या वेण्या
आणी त्यांवर दोन रिबीनमार्फत फुल बांधलेली होती.
त्याच चेह-यावरच्या ओठांवर एक मंद स्मित हास्य होत..
पण कोणालाही ,अक्षरक्ष कोणालाही ह्याचा पत्ता नव्हता , की हे हास्य लवकरच कोमजळ जाणार होत !
नागमोडी वळणाच्या रसत्याने गाडी घाट माथा चढत होती!
रस्ता म्हंणायला दोन वाहणे अलगद जातील असा होता ,
रस्त्याच्या दोन्ही तर्फे हिरव्या गार झाडांच गर्द जंगल होत -
जंगलातल्या झाडांच्या हिरव्या पानांनी सुर्याचा प्रकाश अडवून धरला होता..
ज्याने अवतीभवती जरास अंधारुन आलेल होत , झाडांच्या काळ्याशार सावल्या जराश्या भीतिदायक वाटत होत्या..
उन्हाचा प्रकाश खाली पोहचत नसल्याने हलकासा गारवा अंगाला झोंबत होता..
जंगलातूनच पक्ष्यांच्या खुपसा-या मिश्रित किलबिल स्वरांचा गोंगाट ऐकू येत होता..
पन तोच गोंगाट मनाला हवाहवासा वाटत होता ..
हलकेच गाडीने उजव्या बाजूला वळण घेतल,
आणी गाडीत बसलेल्या सर्वाँना ती दोन मजली , उन्हाच्या प्रकाशाने ऊजळून निघालेली , पिवळ्याधमक भिंतींची शाळा नजरेस पडली...
शाळा डोंगरावर बांधळेली होती, शाळेच्या अवतीभवती झाडांचा ज्ंजाळ दुर दूर पर्यंत वसलेला होता..
दुरुन पाहता शाळेभवतालची झाडे काळीशार अपशकूनी दिसत होती,
पिवळ्याधमक भिंतींची ती दोन मजल्यांची शाळा ह्या येवढ्या मोठ्या जंगली भागात एकच अशी वास्तु होती..
जिथे मानवी अंशी होत.
दुरुन पाहता काळ्याशार झाडांत उभी ती शाळा
एका मोठ्या अजस्त्र दानवासारखी , सावजाच्या शिकारीसाठी दबा धरुन बसल्यासारखी वाटत होती..
आणि ते खरही होत , कारण मोहिनीबाईंच्या सुखीसंसाराला जी काळी नजर लागणार होती , त्या घटनेची सुरुवात तिथूनच तर होणार होती .
नागमोडी वळणाचा घाट रस्ता चढत - चढत एकदाची मारुती 800 शाळेच्या दोन झापांच्या काळ्याकुट्ट लोखंडी गेटसमोर येऊन उभी राहिली ...
गेटसमोर प्लास्टीकच्या खुर्च्यांमध्ये , हातात लोखंडी काल्या कालसर काठ्या घेऊन दोन वॉचमन बसले होते ,
दोघांच्या अंगावर एकसारखेच कपडे होते , निळा शर्ट , खाली काळी पेंट..
मोहिनीबाईंना पाहताच एका वॉचमनने लागलीच गेट उघड़ल..
त्याला जणू पहिल्यापासूनच नव्या शिक्षिका येणार आहेत अस कळवल असाव .!
गेट उघड़ताच गाडी गेटमधुन आत घुसली,
गाडी आत घुसताच शाळेचा अवतीभवतीचा परिसर ठळकपणे नजरेस पडू लागला..
गाडी पार्किंगसाठी मोहिनीबाईंना शोधाशोध करायला लागली नाही कारण गेटपासून जरा पूढेच दोन टू-व्हीलर , आणी एक स्कुटी पार्क केलेली दिसत होती..
मोहिनीबाईंनी सुद्धा आपली मारुती 800 तिथेच पार्क केली..
मोहिनीबाई, विशाल, रिया, तिघेही गाडीतून बाहेर आले..
अवतीभवतीच दृष्य पाहू लागले..
शाळेला चारही बाजुनी अकरा फुट उंचीच भक्कम बांधणीच कंपाउंड होत -
आणी आत दोन मजल्यांची पिवळसर भिंतींची ती शाळा उभी होती, शाळेच्या वर एक टेरीस सुद्धा होत..
शाळेच्या अवतीभवती कंपाऊंडच्या आत एक एकर पर्यंत फ्क्त आणी फक्त तांबडसर माती पसरलेली दिसत होती..
आताला बारा वाजले होते , काहीवेळा अगोदरच प्रार्थना संपवून सर्व वर्गशिक्षक आणी, मुले आप- आपल्या वर्गात जाऊन बसले होते..
मोहिनीबाई आपल्या मुलांना घेऊन मुख्यध्यापकांच्या ऑफिस मध्ये गेल्या ..!
तिथे त्यांची मुख्यध्यापकांशी थोडीफार चर्चा झाली, व मुख्यध्यापकांनीच शाळेतल्या सर्व वर्गशिक्षकांशी सुद्धा ओळख करुन दिली गेली..
विशाल - रिया दोघांनाही आप-आपल्या वर्गात पाठवल गेल.. !
वर्गशिक्षिकांनी रिया आणी विशाल दोघांचीही आप- आपल्या वर्गातल्या मुलांशी ओळख करुन दिली ....
रियाने आपल्या दुस-या ईयत्तेतल्या मुलींशी पहिल्याच दिवशी चांगली गट्टी जमवली होती..
पहिल्याच दिवशी तिला दोन मैत्रिणी भेटल्या होत्या. त्या दोघिंच नाव पल्लवी आणी नव्या होत.
मोहिनीबाई, विशाल, रिया तिघांचाही शाळेतला आजचा पहिला दिवस खुपच चांगल्या प्रकारे सरला होता..!
रात्र निघुन गेली आणी पुढचा दिवस उजाडला !
क्रमशः