Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 10

श्री गणेश महिमा भाग 1


भाग 1

नमस्कार वाचक मंडळी 🙏🏼😊.
सुखहर्ता दुख:हर्ता म्हंणजेच लहानापासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लाडक्या बाप्पांच जयंती निमीत्त आगमन झाल आहे. मित्रांनो गणेश जयंती निमित्ताने तुम्हाला रोज मोदक ,लाडू ,करंजी नवे नवे पदार्थ चाखायला मिळत असतीलच ना ? आणि त्या पदार्थांची मस्त मज्जा घ्या बर का !😄
तर वाचकहो आता जास्त न बोलता सत्य अनुभवाकडे वळुयात , तर आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे सत्य अनुभव जो मला माझ्या मामाने सांगितल आहे..

मामा म्हंणताफ की काही लोकांना फक्त गणपती आल्यावरच जुगार खेळायची सवय असते - बाकीचे महिने मात्र हे जुगारु कधीच जुगार खेळत नाहीत , पन गणपतींमध्ये ही अशी लोक रात्र रात्रभर जुगार खेळतात , कित्येक काळ उलटून जातील..पन गणपतींमध्ये जुगार खेळणारे काही कमी होणार नाहीत. लहान, तरुन -वयस्कर सर्वांच्या आवडीचा बाप्पा जस घरोघरी येतो तसे खेडेगावात जुगार खेळला जातो. गणपती आले की दहा दिवस हा खेळ मोठ्याआवडीने दिवसापासुन ते रात्रीपर्यंत चौवीस तास चालूच असतो. अहो नाही हो , मी इथे काहीजुगारीविषयी बोलायला आलो नाहीये , किंवा नाही मी जुगारु आहे.तर उलट आज मी जी सत्यकथा सांगणार आहे , ती ह्याच कारणावर आहे. म्हंणुनच आपल थोडस विषय काढल . तर चला सत्यकथेला सुरुवात करुयात.माझ नाव जयेश झोमटे ! मी आज तुम्हा सर्वांसमोर एक सत्य अनुभव मांडत आहे.जो मला माझ्या मामाने मला सांगितल आहे , तर अनुभवा नुसार झाल असं !

कथा सुरु .


सत्यघटनेवर आधारीत :

सुखकर्ता :दुखहर्ता

लेखक : जयेश झोमटे



सन 2000 फेब्रुवारी, / तारीख-5 / वार _ रविवार

विलासराव हे माझ्या मामाचे म्हंणजेच दिगंबररावांचे जिगरी मित्र होते.
विलासराव हे व्यवसायाने मटन शॉप चालवायचे, तर माझे मामा म्हंणजेच दिगंबर , हे देवाला घालणा-या हारांच दुकान चालवायचे.दोघांचीही दुकान एकाच बाजारात असुन थोडी लांब पण जवळच होती. आज रविवार असल्याने विलारावांच्या मटण शॉपमध्ये तुडूंब गर्दी उसळली होती. इतकी की आज विलासरावांच्या दुकानात दोन बोकडांच मटण संपल होत, ज्याने आज त्यांना धंद्यात खुपच नफा झाला होता. जे विलासरावांच्या चेह-यावर पसरलेल्या आनंदाने समजुन येत होत. शेवटी काहीवेळाने संध्याकाळ झाली गेली. आकाशात निलसर आकाश गंगा अवतरली, त्या गंगेत चांदने स्फटीकासारखे चमकु लागले.
कावळे आकाशातुन उडत का,का,का करत घर गाठू लागले होते त्यांचा अभद्र आवाज जणु कसल्या तरी संकटाची चाहूल लावुन देत होता. मटण शॉप बंद करुन विलासराव आपल्या मित्राच्या म्हंणजेच माझ्या मामाच्या हारांच्या दूकाना जवळ आले.
आज त्यांनी नफा जास्त झाल्याने घरी मटण घेऊन जायचं ठरवलं होत .तशी त्यांनी हातात काळ्या रंगाची प्लास्टीकची पिशवी धरलेली दिसतच होती.

" दिग्या निघायचं का? " विलासरावांनी माझ्या मामाकडे पाहिल व म्हंणाले .

मामा त्यावेळेला दुकानाच दारच लावत होते. दार लावुन ते हळकेच वळाले .
" हा चल !" दीगंबररावांनी दुकानाला टाळ लावुन होकार दर्शवला. मग ते दोघे लागलीच हमरस्त्याला लागले.चालताना रस्त्याबाजुला दोन्ही तर्फे विविध प्रकारची दुकाने लागत होती. गणेशजयंती चार दिवसांवर येऊन ठेपली होती. बाप्पाच्या मखरीला लावल्या जाणा-या रंगीबेरंगी लाईटजने इलेक्ट्रॉनिक दुकाना सजली होती. एका नव्या नवेली नवरीसारख शृंगार करुन ती दुकान सजून बसली होती.आजुबाजुला रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंना जणू ती दुकान आपल्या सौंदर्यांची मोहीनी घालून संमोहिंत करुन आपल्याकडे बोलावतच होती.


" दिग्या गणेश जयंतीला किती दिवस आहेत? " विलासरावांनी चालता चालताच दिगंबररावांना प्रश्ण केला.
" हो आजपासून चार दिवसांवर , म्हंणजे 9 फेब्रुवारीला गणेश जयंती आहे, आणि बाप्पाच्या कृपेने धंदा एकदम जोरात चाल्लाय बघ!" दिगंबरराव प्रसन्न सुरात उच्चारले.
" वा वा हे भारी झाल बघ ! आज माझा ही जरा जास्तच नफा झालंय ! देवाचीच कृपा म्हंणायची!" विलासरावांनी चालता चालता सहज नजर उजव्या बाजुला टाकली. तस त्यांना दिसल. रस्त्यावर एक सुरकुतलेल्या चेह-याची म्हातारी गोल टोपली घेऊन बसली आहे . टोपलीत मातीच्या गौरआईच्या रंग दिलेल्या लहानसर मुर्त्या आहेत. तिचा बिचारीचा आज धंदा कमीच झाल्यासारखा वाटत होत! कारण तिच्या सुरकुतलेल्या चेह-यावर दु:खी भाव झळकत होते. विलासरावांना तिची किव आली.
" दिग्या थांब! " विलासरावांनी दिगंबररावांना नजरेने इशार करत पुढे पाहायला लावल.
" काय झाल रे ?" दिगंबर म्हंणाले.
"अरे त्या बिचा-या म्हातारीचा धंदा नाय झाला वाटत! बघ ना कशी बसलें बिचारी !" विलासराव म्हंणले. दोघांनाही तिची किव आली.
तसे दोघेही तिच्या जवळ पोहचले.
" काय ग म्हातारे , एक मूर्ती कितीला दिली ?" विलासराव उच्चारले.
"त्यांच्या वाक्यावर त्या म्हातारीच्या चेह-यावर प्रसन्नतेचे भाव झळकले! तिच्या सुरकूतलेल्या चेह-यावर हळुच हास्य आल. गरीब माणुस छोठछोठ्या गोष्टीतही आनंद शोधत असतो. आयुष्यात जितक मिळतय तितक्यात सुखी राहन हा निसर्गाचा नियम आहे. परंतु कलीयुगात ह्या नियमास आज पुर्णत तडा गेला आहे. मानवाला पैस्याची हाव गलिच्छ कच-यासारखी चिकटून बसली आहे. असो पुढे
" एक मूर्ती तीस रुप्पे पोरा ! " ती म्हातारी खोल गेलेल्या आवाजात म्हंणाली.तस विलासरावांनी लागलीच पैसे कमी वगेरे न करता एक शंभरची नोट त्या म्हातारीच्या हातावर टेकवली.
" बाकीचे पैशे तुलाच ठेव ." विलासरावांनी दोन मुर्त्या हाती घेतल्या, त्यातली एक मृती त्यांनी दीगंबररावांना दिली आणी एक आपल्याकडे ठेवली.
" पोरा आज तुझ्या मुळ माझा थोडासा तरी धंदा झाल बघ! नायतर आज माझी चुल पेटलीच नसती बघ ! " ती म्हातारी आपल्या जागेवरुन उठली. विलासरावांनी ती गौरींच्या मूर्ती असलेली टोपली हलकेच उचलुन तिच्या डोक्यावर ठेवली.
" पोरा जशी तू माझी मदत केली तस गौरआई पन तुझ भल करील ! तु एकदा तिला हाक दे फक्त! आणी हा ह्या मुर्ती घरी जाऊन पुज म्हंणजे मुर्तीत जिव येईल" त्या म्हातारीने विलासरावांच्या डोक्यावरुन हात फिरवला व निघुन गेली. मग दोघेही पुन्हा रस्त्याला लागले.
" वा विलास! खुप छान काम केलस बघ!" दिगंबरराव हस-या चेह-याने म्हंणाले.
" अरे भावा माझी आई नेहमी सांगायची! आपल्या मुळ कुणाची चुल पेटत असेल तर ते मोठ पुण्याच काम आहे!"
" खर आहे !" दिगंबरराव इतकेच बोलले.
आजुबाजुला गाड्यांची येजा सुरु होती. हॉर्नच्या,इंजीनचा घर्रघर्र आवाज कानांवर येत होता.बाजुच्या दूकानांच्यात लाऊडस्पिकरवर बाप्पांची गाणि वाजत होती.

वीस - पंचवीस मिनिटांनी दिगंबरराव आणि विलासराव दोघांनिही बाजार मागे सोडल ...होत.

आता त्यांच्या गावचा मातीचा माळराण रस्ता लागला होता. अवतीभवती माळरान होत , उंच उंच डोंगर द -या दिसत होत्या, माळरानातल्या खालच्या जमिनीवर हिरवा गवत उन्हाच्या उष्ण प्रकाशाने सुकून तपकिरी झाला होता - त्याच तपकिरी गवतात
कधी- कधी एक सळसळ ऐकू होती- नक्कीच त्यावरुन मानवी चाहुलीला भिऊन जमिनीवर रेंगाळणारा सर्प दूर पळून जात होता..

" दिग्या तुला माहीती आहे का ?"
विलासराव म्हंणाले.


" काय रे ?" दिगंबररावांनी विचारल.

" म्हंणे आपल्या ह्या माळरानावर दूर एक पिराच डोंगर आहे , तिथे एका पेटा-याला दरोडे खोरांनी पकडून मारल होत - आणी त्याच्या बायकोची ईज्जत पन लूटली होती , आणी मग तिला पन मारुन टाकल होत..- लोक अशी म्हंणतात त्या डोंगरावर जो की दिवसा रात्री- जातो त्याला बुम बुम बुम बुम
असा आवाज ऐकू येतो आणि अंगावर सटकी मारल्याचा आवाज पन ऐकू येतो.! रात्री एक - दोन जणांना तर तो मेलेला पेटा-यावाला अंगावर सटकी मारत नाचतांना पन दिसला आहे. "
विलासरावांच बोलूण झाल होत.

त्यांचे हे बोल ऐकून दिगंबररावांना जराशी भीतीच वाटली होती , कारण हाच तो माळरान होता - चारही दिशेना काळयाकुट्ट अंधाराने आपल बाजार मांडल होत - अंधारातून विचित्र आवाज ऐकू येत होते .

विलासरावांच्या वाक्यावर दिगंबरराव बोलले..

" विलास हा विषय ईथ काढु नको, घरी गेळ्यावर बोलू ! कारण ही जागा खुपच वंगाळ आहे, ईथे लय जनांच खून झालंय- आणी रात्रीच्या वेळेला अश्या जागेंवर असा विषय काढू नये, नाहीतर ती ब्याद मागे लागते.!"

" अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर फक्त तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" विलासराव हसू लागले.

पण माझ्या मामांना म्हंणजेच दिगंबररावांना त्यांच हे बोलण पटल नव्हत - शेवटी मामांचा आणि विलासरावांच एक छोठस भांडण झाल आणि रागाच्या भरात मामा बोलून गेले .
क्रमशः