Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 11

भाग 2.
" अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर फक्त तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" विलासराव हसू लागले.

पण माझ्या मामांना म्हंणजेच दिगंबररावांना त्यांच हे बोलण पटल नव्हत - शेवटी मामांचा आणि विलासरावांच एक छोठस भांडण झाल आणि रागाच्या भरात मामा बोलून गेले .

" ठिक आहे खुप हिंम्मत आहे ना तुझ्यात , तर एक काम कर , तुझ्या ह्या मटणाच्या पिशवीतून एक मांसाचा तुकडा काढ आणि पुढे शिंद्यांचा मळा लागेल ना , त्या मळ्यात एक चिंचेच झाड आहे बघ - त्या झाडाला नाही का गेल्या वर्षी येड्या बुध्याने फास लावून जिव दिला होता , आणी त्यामुळे वर्षंभर मळा बंदच आहे त्याच झाडाखाली हा मटणाचा तुकडा ठेव , आणी मोठ्याने बोल ए काळ हा मटणाचा तुकडा खा आणि माझ्या डोक्यावर बस्स. !"
दिगंबरराव एवढ बोलून शांत झाले. एकटक विलासरावांची प्रतिक्रीया काय येते ते पाहू लागले.
पन खुपवेळ निघुन गेला तरी विलासराव गप्पच होते . हळू हळू वाट सरली जात शिंद्यांचा मळा जवळ येत होता.

पाच मिनीटांवर शिंद्यांचा मळा लागला आणि विलासराव पुन्हा मस्तीत आले..! विलासरावांनी माझ्या मामाला जागेवरच उभ राहायला सांगितलं आणि आपल्या हातातली मटणाची पिशवी माझ्या मामांकडे म्हंणजेच दिगंबररावांकडे सोपवली.
पिशवीतून एक बोकडाच्या मांसाचा तुकडा बाहेर काढ़ला ..

दिगंबररावांना विलासरावांच हे वागन फारच चमत्कारीक वाटल..होत. तसं ते होतेच विनोदी व कधीही न भिना-या स्वभावातले.. !

एकक्षण तर दिगंबररावांना असं सुद्धा वाटल की विलासरावांना आपण हे सांगायलाच नको होत - पन आता वेळ निघुन गेली होती - विलासरावांना आता कितीही थांबवण्याचा प्रयत्न केल तरी ते ऐकणार नव्हते.

दिगंबररावांच्या हातात मटनाची काळ्या रंगाची प्लास्टीकची पिशवी सोपवून - विलासरावांनी त्यातून एक मांसाचा तुकडा बाहेर काढला..

" चल दिग्या तुझ्या मनासारख करुन येतो ह्ह्ह्ह्ह्ह्ह !"
अस म्हंणतच विलासराव थोडे हसले ..


ह्या दोघांच्याही पुढे एक तूटलेला झाडांच्या फांद्यांपासून बनवलेला गेट दिसत होता.

गेटच्या चारही बाजुंनी एक वईच कंपाऊंड होत..
आणी त्या वईआत एक झोपडी होती, झोपडी पुढे असलेल अंगण शेणाने सारवलेल होत -

झोपडीपासून जरा बाजुलाच एक पंधराफुट उंचीच चिंचेच झाड होत ..!

चिंचेच्या झाडाच्या फांद्या वाकड्या तिक्ड्या जखिणीच्या वाढलेल्या नखांसारख्या झाडावर पसरल्या होत्या.

ह्याच चिंचेच्या झाडाला मानसिक संतुलन ठिक नसलेल्या बुध्याने रात्रीच्या वेळेस फास लावून घेतला होता- गावातली तर अस म्हंणत होती की त्या येड्याला कुणीतरी आधी मारुन टाकल आणि मग झाडाला फास दिल्याचा बनाव केला होता, पन सत्य परिस्थीती काय आहे हे त्या विधात्यालाच ठावूक होती.

असो आपण सत्यअनुभवाकडे वळूयात .

फांद्या- काट्या कूट्यांपासून बनवलेल्या गेटला पार करुन विलासराव मळ्यात आले..

वातावरणात अंधारुन आल होत - उजेड म्हंणायला विलासरावांकडे नोकियाचा फोन असून त्याची टॉर्च पेटलेली होती.

येड्या बुध्याच्या मृत्युनंतर शिंद्यांनी मळ्यावर यायच बंदच केल होत -

कारण त्यांना तिथे काहीबाही चेष्टा होतांना जानवल्या होत्या.

वर्षभर मळा बंद असल्याने तिथे अंगणात झाड लोट होत नव्हती कारण टॉर्चच्या उजेडात चिंचेच्या झाडाची पान , अजुन बराच कचरा खाली अंगनात पडलेल दिसत होत..

आकाशात हळकस चांदण पडलेल ,तोच चांदण्याचा प्रकाश चिंचेच्या झाडावर पडल जात अंगणात झाडाची काळीशार चेटकीणीसारखी प्रतिकृती उमटलेली ,


विलासरावांच्या अंगाला अंगणात एक हलकासा
गारवा झोंबत होता . रातकीटकांचा किरकीरण्याचा आवाज मंद गतीने कानांवर पडत होता. त्या आवाजाव्यतिरिक्त तिथे एक विळक्षण शांतता होती.

विलासरावांच्या उजव्या हातात बोकडाच्या मांसाचा तुकडा होता..

तोच तुकडा त्यांनी कंबर वाकवून त्या चिंचेच्या झाडाखाली ठेवला आणि वाकलेल्या अवस्थेतच वर पाहिल ..

चिंचेच झाड अंधाराने गिळल होत -
वेडेवाकड्या काळ्याशार फांद्यांमधुन चंद्राची कोर दिसत होती ..

एकक्षण विलासरावांना अस वाटल की ते झाड आपल्या अंगावरच धावून आल आहे ..

दिगंबरराव भेदरलेल्या अव्स्थेत विलासरावांकडे पाहत होते.- कारण त्यांनी त्या चिंचेच्या झाडाला लटकलेल येड्या बुध्याच मृतदेह मय्यत पोलिस खाली उतरवत असतांना स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल होत.

बुध्याच्या मयताचे निर्जीव मृत डोळे बेडकासारखे खोंबणीतून बाहेर आलेले, जिभ तोंडातून सरड्यासारखी बाहेर लोंबत होती-
रात्रभर मयत झाडाला लटकत राहिल्याने त्वचा पांढरी पडली होती .-मयतातून घाण वास सुटला होता...

" ए विलास चल बास झाला चल..!'
दिगंबरराव भीतच जागेवरुन ओरडले..
पन विलासरावांनी मात्र त्यांच्याकडे पाहिल नाही ..
विलासराव जागेवर उभे राहिले दिगंबररावांनी सांगितल्यानुसार मोठ्याने ओरडून म्हंणाले.
" ए काळ बुध्या - हा मटणाचा तुकडा खा आणि माझ्या डोक्यावर बस्स हिहिहिहिहिही!"
विलासराव एवढे बोलून वेड्यासारखे हसू लागले..
मग काहीवेळ जागेवरच थांबले - पन काहीच झाल नाही..! फक्त रातकीड्यांची किरकीर तेवढी थांबली जात एक विळक्षण थरथराट माजवणारी सुन्न शांतता पसरलेली. थोडवेळ अजुन चिंचेच्या झाडाखाली थांबून मग विलासराव पुन्हा दिगंबररावांन जवळ आले.. ! विलासरावांनी पुन्हा दिगंबररावांची चांगलीच खेचली..आणी त्यांना पून्हा भित्रा म्हंणून चिडवल - ह्यावेळेस माझे मामा काहीच बोलले नाहीत..! कारण विलासकाकांनी कामच अस केल होत..

काहीवेळाने ते दोघेही घरी आले - पन घरी येतांना
वाटेत एक गोष्ट घडली होती, विलासरावांच्या हातातली मटनाची पिशवी एका कुत्र्याने तोंडात हिसकावून ती पिशवी घेऊन तो दूर पळून गेला होता.

माझ्या मामांना हे झालेल प्रकरण काही चांगल वाटल नाही , त्यांना जरास संशय आल कारण त्याच मटनाच्या पिशवीतला एक मांसाचा तुकडा त्या चिंचेच्या झाडाखाली ठेवला होता ना ? दिगंबर मामांच्या मते जे काही झाल होत ते बरंच झाल कारण त्या मटनावर त्या अभद्राच नक्कीच मन आल अशनार .! आणि तेच मटन जर विलासरावांच्या घरातल्यानी खाल्ल असत तर नक्कीच बाधा झाली असती..





क्रमशः