कर्म -गीतारहस्यअहंकार, दंभ सुटणे ,अनासक्ती, सम बुद्धि (इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी शांत राहणे), बाष्कळ बडबड न करणे , अध्यात्मज्ञान नित्य आहे हे लक्षात ठेवणे, तत्वाप्रमाणे वागणे, मनोनिग्रह, गुरु सेवा, इत्यादी गुण मनुष्यामध्ये दिसू लागणे यालाच ज्ञान म्हणावे. कार्य म्हणजे शरीर कारण म्हणजे इंद्रिये आणि प्रकृती. गुण हे करवून घेणारे आणि हे करणारा जो, तो सुखदुःखाचा उपभोग घेणारा पुरुष म्हणजेच क्षेत्रज्ञ.कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडूनच केली जातात. आत्मा अकर्ता आहे हे जाणणे व विविधतेमध्ये एकता दिसणे व या एकापासूनच सर्व विस्तार झाला आहे असे समजू लागणे म्हणजेच ब्रह्मप्राप्ती.चांगले कर्म करणे हे सत्वगुणाचे लक्षण आहे पण हे करण्याची प्रवृत्ती होणे हा रजोगुणाचा धर्म