तोतया वारसदार पात्र रचना बबन - सारंग सरांचा चपराशी सुभाष -बबनचा मित्र. कटातला भागीदार. निशांत - शोधकर्ता नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर अनिल - विश्रामचा चुलत भाऊ. सातारा. विनय - अनिलचा मुलगा सातारा. भाग ६२ भाग ६१ वरून पुढे वाचा.... “हूं, गोखले, तुमची अडचण आणि अपेक्षा दोन्ही मला समजली. तुम्ही असं करा, तुम्ही नेमकं काय सोशल वर्क करता, त्याची व्याप्ती किती आहे, आणि भविष्यात काय करण्याचा विचार आहे, ग्रँट किती हवी आहे, हे सगळं मला नीट लिहून द्या. मी ट्रस्ट कडे तुमची फाइल पाठवून देईन, त्यांनी मंजूरी दिली तर