खिडकी आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई, मी, नंदा (माझी बायको) आणि मुले असे सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाबांना आणायला निघालो होतो. कार्यक्रम अतिशय नेटका झाला, वेळेनुसार सुरु होऊन संपला देखील. बाबांच्या ऑफीसातील शिस्त कार्यक्रमात ठासून जाणवत होती. सहकाऱ्यांची भाषणे झाली, निरोप समारंभ झाला आणि मग आम्ही घरी निघालो. घरीदेखील आईने जैयत तयारी ठेवली होती, बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होते. या सगळ्या लवाजम्यामुळे बाबादेखील खुष होते. दुसऱ्या दिवशी मात्र मी नित्यनियमाने ऑफिसात गेलो, मुले शाळेत गेली, आई आणि नंदा त्यांच्या कामात दंग

Full Novel

1

खिडकी - १

खिडकी आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई, मी, नंदा (माझी बायको) आणि मुले असे सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाबांना आणायला निघालो होतो. कार्यक्रम अतिशय नेटका झाला, वेळेनुसार सुरु होऊन संपला देखील. बाबांच्या ऑफीसातील शिस्त कार्यक्रमात ठासून जाणवत होती. सहकाऱ्यांची भाषणे झाली, निरोप समारंभ झाला आणि मग आम्ही घरी निघालो. घरीदेखील आईने जैयत तयारी ठेवली होती, बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होते. या सगळ्या लवाजम्यामुळे बाबादेखील खुष होते. दुसऱ्या दिवशी मात्र मी नित्यनियमाने ऑफिसात गेलो, मुले शाळेत गेली, आई आणि नंदा त्यांच्या कामात दंग ...अजून वाचा

2

खिडकी - २

नंदाने हातातले फुलपात्र जमिनीवर आपटल्याने कर्ण-कर्कश आवाज झाला आणि मी दचकुन किंचाळलो, मा‍झ्या किंचाळण्यामुळे आई आणि नंदा आपसूकच घाबरल्या दोन पावले मागे सरकल्या. काय झाले हे मला समजल्यावर मात्र मी भानावर आलो आणि दोघींनाही शांत केले. “असेच टक लावून बसतात बाहेर. काय दिसतयं रे एवढे त्या खिडकीतून?” – आई “आग तेच तर बघण्यासाठी मी इथे बसलो होतो, आणि त्याच विचारात हरवून गेलो होतो. पण इथुन तर फक्त समोरची बाग दिसते, जिथे काही मुले खेळत असतात, काही जण बाकड्यावर बसले असतात आणि मग पलीकडचा रस्ता दिसतो. विशेष असे काहीच नाही.” – मी मा‍झ्या बोलण्यावर बहुतेक त्यांचा विश्वास नसावा, त्यामुळे दोघींनीदेखील ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय