१) निघाले सासुरा! शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं 'सावधान' हे मंगल कार्यालय केवळ त्या शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक गावातील लोकांचे आवडते मंगल कार्यालय होते. सावधान कार्यालय अस्तित्वात येत असताना तो परिसर अगदीच निर्मनुष्य नसला तरी नेहमी शुकशुकाट मात्र नक्की असायचा. मंगल कार्यालयाची उभारणी झाली. त्या कार्यालयात सुरुवातीला काही 'शुभ मंगल' झाले तसे हळूहळू त्या परिसरात सिमेंटचे जंगल वाढले. अत्यंत देखणे, सुबक आणि लग्न समारंभात लागणारी हवी ती वस्तू मिळणारे मंगल कार्यालय म्हणून सावधान

Full Novel

1

निघाले सासुरा - 1

१) निघाले सासुरा! शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं 'सावधान' हे मंगल कार्यालय केवळ त्या शहरातीलच नव्हे पंचक्रोशीतील अनेक गावातील लोकांचे आवडते मंगल कार्यालय होते. सावधान कार्यालय अस्तित्वात येत असताना तो परिसर अगदीच निर्मनुष्य नसला तरी नेहमी शुकशुकाट मात्र नक्की असायचा. मंगल कार्यालयाची उभारणी झाली. त्या कार्यालयात सुरुवातीला काही 'शुभ मंगल' झाले तसे हळूहळू त्या परिसरात सिमेंटचे जंगल वाढले. अत्यंत देखणे, सुबक आणि लग्न समारंभात लागणारी हवी ती वस्तू मिळणारे मंगल कार्यालय म्हणून सावधान ...अजून वाचा

2

निघाले सासुरा - 2

२) निघाले सासुरा! आपल्या खोलीत पलंगावर पडलेल्या छायाच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. एक- नकाराचे प्रसंग तिच्या मनात रुंजी घालत होते. या ना त्या कारणाने तिला मुले नकार देत होती. त्यादिवशी सकाळीच पंचगिरींचा फोन खणाणला. हातातील वर्तमानपत्र बाजूला सारुन फोन उचलून पंचगिरी म्हणाले, हॅलो, मी पंचगिरी बोलतोय... अरे, मी देविदास बोलतोय... आज कशी काय आठवण झाली बुवा? पंचगिरींनी काहीशा आनंदात विचारले आपल्या छायासाठी माझ्याकडे एक ठिकाण आहे, सांगू का? अरे, असे का विचारतोस? सांग ना... आपल्यासोबत देशपांडे होता, तुला आठवत असेल. त्याचा एकुलता एक मुलगा इंजिनिअर असून तो लग्नाचा आहे. सांगतोस काय, ही तर आनंदाची गोष्ट आहे. देशपांडे आपला चांगला मित्र होता. त्याचा मुलगा निश्चित ...अजून वाचा

3

निघाले सासुरा - 3

३) निघाले मी सासुरा! सायंकाळचे पाच वाजत होते. दयानंद पंचगिरी यांच्या घरी समाधानाचे आणि प्रसन्नतेचे होते. फार मोठ्या प्रतिक्षेनंतर छायाला पसंती मिळाल्याने घरामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मध्यस्थाची भूमिका बजावणारे देशपांडे प्राथमिक चर्चेला काही क्षणातच पोहोचणार होते. पंचगिरी दिवाणखान्यात बसून त्यांची वाट बघत असताना घरासमोर थांबलेल्या ऑटोतून साधारण सत्तरीचे एक गृहस्थ उतरलेले दिसताच दयानंद जागेवर उभे राहत आतल्या खोलीकडे बघत म्हणाले,"अग ए... अग... ए बाई, बाहेर या. भाऊजी आले आहेत."तोपर्यंत दयानंदाचे दामोदरभाऊजी दिवाणखान्यात पोहोचले. सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसे दामोदर म्हणाले,"व्वा! तुम्हाला पाहून, भेटून आनंद झाला." तसा आकाश हसत म्हणाला,"मामा, तुम्हाला म्हणजे? आत्याला पाहून आनंद झाला असे ...अजून वाचा

4

निघाले सासुरा - 4

४) निघाले सासुरा! पंचगिरी यांच्याकडे बसलेल्या देशपांडेंनी चहाचा आस्वाद घेत कुलकर्णी यांना फोन लावला. ते म्हणाले,"कुलकर्णीसाहेब, नमस्कार. तुम्ही धर्मसंकटात टाकले हो.""तसे काही नाही हो. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत.""तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे मी जाणतो पण हीच परिस्थिती धर्मसंकट निर्माण करते. तुम्ही काही तरी नाव ठेवले ना तर सर्वांनाच एक दिशा मिळाली असती.""देशपांडेजी, मला वाटते तुमची तिकडे चर्चा झालीय. तेव्हा...""कुलकर्णी, तुम्ही आणि पंचगिरी दोघांनी मिळून मला ...""तसे काही नाही. तुम्ही मोकळेपणाने बोला.""ठीक आहे. एक गोष्ट निःसंकोचपणे सांगा, की तुम्हाला हुंडा कोणत्या स्वरूपात हवा आहे?म्हणजे एकरकमी की सोने, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपात चालेल?" देशपांड्यांनी विचारले"त्यांची कोणती इच्छा आहे?" ...अजून वाचा

5

निघाले सासुरा - 5

५) निघाले सासुरा! स्वयंपाक घरात बाई, सरस्वती आणि अलका स्वयंपाकाची तयारी करीत असताना दिवाणखान्यात गप्पांचा रंगलेला असताना पंचगिरीच्या भ्रमणध्वनीवर कुलकर्णींचा फोन आला. फोन उचलत पंचगिरी म्हणाले, कुलकर्णीसाहेब, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन! तुमचेही अभिनंदन! खुश आहात ना? असे करा, रविवारी सकाळी अकरा वाजता आपण सारे कुटुंबीय आमच्या घरी या. आणि हो, आमच्या सूनबाईला आणायला विसरू नका. आता जे काही ठरले आहे ते चारचौघात जाहीर करू. ठीक आहे. नक्की येतो. ठेवू? असे विचारत पंचगिरींनी फोन ठेवला. भाऊजी, पाहुण्यांनी आपल्याला सर्वांना रविवारी बोलावले आहे. देशपांडे, तुम्हीही यायलाच हवं. बरे, झाले. तू निमंत्रण दिले ते. तसे कुलकर्णीही यांना निमंत्रण देतीलच पण एखादेवेळी गडबडीत ते विसरले तर ...अजून वाचा

6

निघाले सासुरा - 6

६) निघाले सासुरा! छाया पंचगिरीचे लग्न ठरले. तिला श्रीपालसारखा अतिशय सुयोग्य जीवनसाथी मिळाल्याने तिचा गगनात मावत नव्हता. 'इंतजार का फल मिठा होता है।' अशी काहीशी स्थिती छायाची झाली होती. ती खूप खुश होती. घरातही अत्यंत आनंदाचे वातावरण होते. बाईआत्या आणि मामा हे आल्यामुळे घरातील उत्साहाला आनंदाचे भरते आले होते. अलका-आकाशला स्वर्ग चार बोटे उरल्यागत् झाला होता. लग्नाच्या निमित्ताने करावयाची खरेदी, कार्यक्रम, कपडा खरेदी, खाण्याचे पदार्थ यासोबतच हौस- मौजीच्या वस्तूंचीही यादी तयार होत होती. अशा याद्यांवर चर्चा होत असताना प्रसंगी घनघोर चर्चाही झडत असे परंतु या चर्चा वादविवादापर्यंत जात नसत. कुणीतरी मधला मार्ग काढायचा आणि चर्चेला पूर्णविराम मिळायचा. ...अजून वाचा

7

निघाले सासुरा - 7

७) निघाले सासुरा! चहा झालेला असताना बाई म्हणाली, "सरस्वती, आपण दुपारी आमंत्रण पत्रिका कुणाकुणाला द्यायच्या ती यादी करूया. वाटते गं, महिना आहे पण दिवस असे चुटकीसरशी निघून जातात..." सरस्वती त्यावर काही बोलणार तितक्यात दयानंद आणि दामोदरपंतांचे आगमन झाले."झाले बुवा झाले. एक मोठ्ठे काम झाले. सावधान बुक झाले. कुलकर्ण्यांचे समाधान झाले. आता पुढल्या तयारीला लागले पाहिजे." दामोदर बोलत असताना फोन खणाणला."हॅलो, मी कुलकर्णी बोलतोय.""मी तुम्हाला फोन करणार होतो. सावधान बुक झाले बरं का.""वा! वा! छान! परवाच्या दिवशी चांगला मुहूर्त आहे. तेव्हा म्हटलं साखरपुडा करुन घेऊया.""परवा? एवढ्या लवकर?" दयानंदांनी विचारले."मग काय झाले? अहो, आत्ताच श्रीपालचा फोन आला होता, ...अजून वाचा

8

निघाले सासुरा - 8

८) निघाले सासुरा! 'आहेर द्यायचे आणि घ्यायचे!' सरस्वतीच्या हट्टापुढे सर्वांनी माघार घेतली. सर्वांनी एकत्र बसून निमंत्रणं कुणाला द्यायची यासंदर्भात यादी तयार केली. ते काम अंतिम टप्प्यात असताना सरस्वती आकाशाला म्हणाली,"आकाश, त्या नमुन्याला... अरे, मला म्हणायचे होते, तुझ्या दिगुकाकांना फोन कर. पत्रिकांचे चांगले नमुने घेऊन ये म्हणावे..." सरस्वतीच्या स्पष्टीकरणानंतरही तिथे चांगलीच खसखस पिकलेली असताना छायाने एक पत्रिका सर्वांना दाखवली. तिने विचारले,"आई, आत्या, ही पत्रिका कशी वाटतेय..." तसे आकाश- अलकाने एकमेकांकडे सहेतुक पाहिले."व्वा! व्वा! छान! सुरेख! अशी पत्रिका मी तर प्रथमच पाहतोय." दामोदर म्हणाले."अग, पण फार भारीची वाटतेय ग." सरस्वती म्हणाली."आई, आपल्या लाडक्या छायाताईचे लग्न म्हटल्यावर असं हजार-पाचशे रुपयाकडे पाहून ...अजून वाचा

9

निघाले सासुरा - 9

९) निघाले सासुरा!"दयानंदराव, चला. छान झाले. त्रास संपला." "हो भाऊजी. पण खरेच फार त्रास झाला हो.""जाऊ दे ना. शेवट तर सारे गोड. हा सारा योगायोगाचा खेळ आहे. किती कार्यक्रम झाले असतील रे?""भाऊजी, प्रत्यक्ष दाखविण्याचे पाऊण शतक आणि एकूण भेटाभेटीचे शतक झाले असेल .""रेकॉर्डच झाले म्हणायचे." दामोदरपंत म्हणाले."हो ना. भाऊजी, असे अनुभव आले ना की बस्स! विचारुच नका. वेगवेगळे नमुने भेटले बुवा! अनेकदा एकेकाचा राग यायचा, वैतागून जायचा जीव! परंतु आता काही प्रसंग आठवले ना, की हसू येते. अहो, एका ठिकाणी आम्ही जाण्यापूर्वी फोन करून गेलो. समोरून फोनवरच प्रश्नांच्या फेऱ्या झाडल्या गेल्या आणि नंतरच आम्हाला येण्याची परवानगी दिली. त्यानंतर चार-पाच तासांनी ...अजून वाचा

10

निघाले सासुरा - 10

१०) निघाले सासुरा! साखरपुड्याचा दिवस उजाडला. मागील काही दिवस भलतेच गडबडीत गेले होते. रविवारी सकाळी लवकर उठून सारे पंचगिरी कुटुंबीय अकरा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णींकडे पोहोचले. कुलकर्णी यांच्या घराची सजावट बघण्यासारखी होती. अल्पावधीतच भिंतींना रंग देऊन झाला होता. दारे-खिडक्यांचे पडदे बदलले होते. घरातील फर्निचर नवीन आणि आकर्षक स्वरुपाचे घेतले होते. घरामागे असलेल्या मोकळ्या जागेवर दोन खोल्यांचे बांधकाम चालू होते. पंचगिरी यांची निमंत्रित पाहुणे मंडळी दहाजण होती तर कुलकर्णी यांचेही पंधरा पाहुणे उपस्थित होते. एकदम सुटसुटीत, आटोपशीर असा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. कुठेही घाई नाही, गडबड नाही. अगदी सारे कसे यथासांग झाले. एकंदरीत सारे हलकेफुलके वातावरण पाहून पंचगिरी यांच्यासोबत ...अजून वाचा

11

निघाले सासुरा - 11

११) निघाले सासुरा! एकेक दिवस मागे पडत होता. लग्नाचा दिवस जवळ येत होता. तसतशी लगीनघाई वाढत त्यादिवशी जेवणे झाली आणि सारे जण दिवाणखान्यात बसले असताना बाई म्हणाली, अहो, आपण एक गोष्ट कशी विसरलो हो? कोणती? दामोदरपंतांनी विचारले. अहो, दयानंदाच्या मुलीचे लग्न ठरलंय. हो क्का? पण हे दयानंद कोण गं? कोणत्याही वेळी मस्करी करत जाऊ नका हो. अहो, आपणास केळवण करावे लागेल की. अरे, खरेच की. मीसुध्दा विसरलोच. पण त्यासाठी आपल्याला आपल्या घरी जावे लागेल. या सर्वांनी तिकडे यावे लागेल. वन्स, भाऊजी, ते काहीही नको. तुम्ही इथून गेलात म्हणजे संपलं सारं. सरस्वती म्हणाली. खरे आहे. अग बाई , केळवणाची काहीच गरज नाही. दयानंदा, तुमचे बरोबर आहे. पण सरस्वती ...अजून वाचा

12

निघाले सासुरा - 12

१२) निघाले सासुरा! दामोधरपंत आणि बाई यांनी शेवटी आकाशच्या मदतीने केळवणाचा घाट घातलाच. त्यादिवशी सारे कुटंबीय, श्रीपाल यांचेसह दामोदर आणि बाई हॉटेल अमृतमध्ये जेवायला गेले. अत्यंत प्रसन्न वातावरणात जेवणे सुरू होती. केळवण हॉटेलमध्ये असले तरीही बाईंनी पंचगिरी कुटुंबीय आणि श्रीपालच्या ताटाभोवती फुलांची सुंदर रांगोळी काढून छान सुवासिक अगरबत्ती लावली होती. आकाशने मोबाईलवर सुरुवातीला फोटो काढले. जेवताना आकाशने अचानक विचारले,"मामा, लग्नामध्ये ती कानपिळी काय असते हो?""वधूचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो आणि नवरदेव त्याला बक्षीस देतो." दामोदर म्हणाले."आपून को भी एक चान्स है तो। भाऊजी, बघा हं. मला माझ्या पसंतीचा ड्रेस हवाय नाही तर..." असे म्हणत आकाशने जोरात कान पिळण्याचा ...अजून वाचा

13

निघाले सासुरा - 13

१३) निघाले सासुरा! छायाच्या लग्नाच्या कामांनी वेग घेतला होता. जो तो जमेल तसा आपला नोंदवत एक-एक काम मागे टाकत असला तरीही ऐनवेळी एखादे नवीन काम समोर उभे टाकत होते. त्यादिवशी कोणत्या तरी विषयावर चर्चा रंगलेली असताना अचानक आकाशने विचारले,"आत्या, मला एक सांग लग्नाची वेळ झालेली असताना, सारे अक्षता टाकायला सज्ज असताना मंगलाष्टकं सुरू होण्यासाठी वेळ का लागतो ग?""त्याला काय एक कारण आहे का? आजच नाही, पूर्वीही असे प्रकार होत असायचे." बाई म्हणाली."पूर्वी म्हणे नवरदेव रुसत असे." अलकाने विचारले."ती फार मनोरंजक कारणे आहेत. कधी हुंडा जास्त मिळावा म्हणून तर कधी अंगठी, कपडे इतकेच काय पण पलंग मिळावा म्हणूनही नवरदेव ...अजून वाचा

14

निघाले सासुरा - 14

१४) निघाले सासुरा! सीमांतपूजनाचा दिवस उजाडला. तशी वेगळीच घाई सुरू झाली. सामानाची पत्रिकेसह इतर कामांवर शेवटचा हात फिरविणे, आलेल्या पाहुण्यांची विचारपूस, येत असलेल्या पाहुण्यांचे स्वागत अशी धांदल सुरू असताना दामोदरपंत म्हणाले, दयानंद, पाहुण्यांना म्हणजे कुलकर्णी परिवाराला आमंत्रण घेऊन जावे लागेल हं. भाऊजी, गावातच लग्न आहे. तेव्हा... तरीही निमंत्रण द्यावे लागेल. तशी परंपराच आहे. अरे, माझ्या परिचिताकडे गावातच लग्न होते म्हणून त्यांनी वरपक्षाकडे निमंत्रण दिलेच नाही. शिवाय वराच्या घराजवळ ते मंगल कार्यालय होते. वधूपक्षाचे सारे बिऱ्हाड कार्यालयात पोहोचले. वरपक्षाकडील मंडळी येण्याची सारेजण वाट पाहत होते. रात्रीचे नऊ वाजले परंतु वरपक्षाकडील लोक येण्याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हते. तेव्हा कुणीतरी म्हणाले, की फोन ...अजून वाचा

15

निघाले सासुरा - 15

१५) निघाले सासुरा! लग्नाचा दिवस उजाडला तशी वेगळीच लगीनघाई सुरू झाली. चहा, पाणी, आंघोळी अशा वेग घेतला. नवरीला हळद लावण्याची तयारी सुरू झाली परंतु वाट होती नवरदेवाकडून येणाऱ्या 'उष्टी हळद'ची. आत्या, उष्टी हळद हा काय प्रकार आहे? अलकाने विचारले. अग, तिकडे श्रीपालला तेल, उटणे, हळद लावून आंघोळ घातली जाणार आहे. त्याला तेल-हळद लावून झाली की ती हळद आपल्याकडे येईल आणि मग तीच हळद छायाला लावायची असते. असे होय का? मला वाटले उष्टी हळद म्हणजे आधी नवरदेव थोडी हळद खात असेल आणि मग त्याने तोंड लावलेली हळद नवरीला आणून लावत असणार. खाल्ल्याशिवाय ती उष्टी होईलच कशी नाही का? अलकाने विचारले. ये चूप ग. ...अजून वाचा

16

निघाले सासुरा - 16 - अंतिम भाग

१६) निघाले सासुरा! छायाचे लग्न उत्साहात पार पडले. भोजनकक्षात गडबड पाहून दामोदर म्हणाले, अरेरे! काय ही गर्दी, म्हणे बफे! हे असे लोटालोटी करून, फतकल मारून खाण्यापेक्षा आणि ताटासाठी एक अधिकची खुर्ची अडवण्यापेक्षा पंगती वाढणे, पंगतीत मानाने बसून खाणे शतपटीने चांगले! त्या पंगतींचा थाट काही निराळाच! हसतखेळत, मौजमजा करत, आग्रह करत खाण्याची मजा औरच असते..! त्यांना थांबवत आकाशने विचारले, पण मामा,एवढ्या पंगती वाढणार कोण? तिथेच तर घोडे अडतेय ना. तुला सांगतो आकाश, आजही खेड्यात लग्न लागले ना, की पहिली पंगत पाच-सहा हजार लोकांची होते. शेवटच मंगलाष्टक होताच तेवढी माणसे खाली अंथरलेल्या सतरंज्या गोळा करून पटापट बसतात. पन्नास-साठ पोरांचा ताफा अगदी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय