" आह..." हात हवेत पसरवत अंगाला अळोखेपिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा अंदाज घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबरबँड एव्हाना घरंगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले चार पाच केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यांत गच्च पकडून रबराच्या साहाय्याने तिने घट्ट अंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा
नवीन एपिसोड्स : : Every Thursday & Sunday
भूक बळी भाग १ - भूक बळी
" आह..." हात हवेत पसरवत अंगाला अळोखेपिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबरबँड एव्हाना घरंगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले चार पाच केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यांत गच्च पकडून रबराच्या साहाय्याने तिने घट्ट अंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा ...अजून वाचा
भूक बळी भाग २
संध्याकाळची रात्र झाली होती. मागच्या कित्येक दिवसांत क्वचितच स्टोव्ह पेटला होता. आता तर बाटलीतील रॉकेलही तळाला गेलं होत. कोणाकडून तर आजूबाजूची मंडळीही तिच्यापेक्षाही गरीब. त्यातही अर्धेअधिक गावी पळालेले. नाही म्हणायला तिच्या गल्लीच्या दुसऱ्या टोकावर राहणारा कोणीतरी अजून इथेच होता. त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. केवळ सार्वजानिक शौचालयाचा मार्ग त्यांच्या दरवाजातून जायचा म्हणून केवळ तोंडदेखली ओळख. त्यातही तिच्या भरलेल्या अंगावरून फिरणारी नजर तिला नेहमीच बोचायची. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच कुटुंब तिला दिसलं नव्हतं, कदाचित गावी गेले असावे. तिला एकटीच पाहून त्याने बरेचदा लाळघोटेपणा करत तिची चौकशी केली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट व्यक्त होणारे भाव वाचून तिने नेहमीच त्याला नकार दिला होता. ...अजून वाचा