माझे लिखाण... - मला बहीण होती...

(4)
  • 14.5k
  • 0
  • 4.2k

हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहिती नाही, पण हो मला एक बहीण होतीच.... कदाचित ती माझ्यासारखीच दिसत असावी, मी आईला म्हणायचो एखादा तरी फोटो पाठव ना ग, मला बघू दे ती कशी दिसते..पण आईनेही कधी माझी गोष्ट मनावर घेतलीच नाही. कारण कदाचित त्या फोटोची किंमत परवडली नसावी तिला.. कधी कधी ती माझ्या स्वप्नांत यायची. माझे डोळे मिटवून दादा मला आज भुर्र नेशील ना रे ..अशी गोड, केविलवाणी मागणी घालायची... मग मी हो म्हंटल्याशिवाय ती डोळेच उघडू द्यायची नाही...आणि हो म्हंटल्यावर अलगद कुशीत येऊन बसायची...जणू माझ्या

1

माझे लिखाण... - मला बहीण होती...

हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहिती पण हो मला एक बहीण होतीच.... कदाचित ती माझ्यासारखीच दिसत असावी, मी आईला म्हणायचो एखादा तरी फोटो पाठव ना ग, मला बघू दे ती कशी दिसते..पण आईनेही कधी माझी गोष्ट मनावर घेतलीच नाही. कारण कदाचित त्या फोटोची किंमत परवडली नसावी तिला.. कधी कधी ती माझ्या स्वप्नांत यायची. माझे डोळे मिटवून दादा मला आज भुर्र नेशील ना रे ..अशी गोड, केविलवाणी मागणी घालायची... मग मी हो म्हंटल्याशिवाय ती डोळेच उघडू द्यायची नाही...आणि हो म्हंटल्यावर अलगद कुशीत येऊन बसायची...जणू माझ्या ...अजून वाचा

2

मला बहीण होती - भाग दुसरा

ह्या कथेचा पहिला भाग मी 8 फेब्रुवारी 2019 ला सादर केलेला असून कथेचा दुसरा भाग सादर करतोय.... आम्ही तिला पुरवून आलो, घराबाहेर आता स्मशान शांतता पसरली होती. घरात जाऊन बघितलं तर आई तीच करायला लागली होती, बाबाही आवराआवर करत होते, स्वयंपाक खोली ओलांडून मी माझ्या खोलीत शिरलो तर कुणीतरी एका कोपऱ्यात माझं सामान आधीच नेऊन ठेवलेलं होत, माझी नि तिची खोली एकच होती, खोलीतले दोन कोपरे तिचे तर दोन कोपरे माझे, भिंतीवर लावलेल्या त्या माझ्या फोटोवर माझ लक्ष गेलं, तो लहानपणीचा माझा फोटो अजूनही तिथेच होता, मला आश्चर्य वाटत होतं, तो अजून तिथे कसा काय, अस म्हणतात ना की ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय