पुण्यातलं एक मोठं कॉलेज. निनाद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉमर्स ला होता. त्याचे ठराविक काही मित्र होते. तो नेहमीच त्या मित्रांमध्ये राहून टवाळक्या करायचा. कॉलेजमध्ये त्याचा दरारा होता. तो त्याच्या गँगचा टीम लिडर होता. हो आता त्याच्या टवाळक्या म्हणजे काही खुप मोठ्या नव्हत्या. आणि विशेष म्हणजे त्याचा कोणाला त्रास होत नव्हता. याला कारणही तसेच होते. निनाद एक हुशार विद्यार्थी होता. त्याचे मित्रही ब-यापैकी हुशार होते. अगदी टॉपर नाही पण सगळ्यांचे मार्क्स चांगले असायचे. शिवाय स्पोर्ट्स मध्ये निनाद आणि टीमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. कितीतरी स्पर्धांमध्ये त्यांनी कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्यामुळे प्रिंसिपल आणि बाकी शिक्षक त्यांच्यावर खुश होते. आता वर
Full Novel
मिले सूर मेरा तुम्हारा - 1
पुण्यातलं एक मोठं कॉलेज. निनाद कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला कॉमर्स ला होता. त्याचे ठराविक काही मित्र होते. तो नेहमीच मित्रांमध्ये राहून टवाळक्या करायचा. कॉलेजमध्ये त्याचा दरारा होता. तो त्याच्या गँगचा टीम लिडर होता. हो आता त्याच्या टवाळक्या म्हणजे काही खुप मोठ्या नव्हत्या. आणि विशेष म्हणजे त्याचा कोणाला त्रास होत नव्हता. याला कारणही तसेच होते. निनाद एक हुशार विद्यार्थी होता. त्याचे मित्रही ब-यापैकी हुशार होते. अगदी टॉपर नाही पण सगळ्यांचे मार्क्स चांगले असायचे. शिवाय स्पोर्ट्स मध्ये निनाद आणि टीमचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. कितीतरी स्पर्धांमध्ये त्यांनी कॉलेजला बक्षिसं मिळवून दिली होती. त्यामुळे प्रिंसिपल आणि बाकी शिक्षक त्यांच्यावर खुश होते. आता वर ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 2
थोड्याच दिवसात एका चांगल्या शुभ मुहूर्तावर मोजक्या पाहुण्यांच्या साक्षीने निनाद आणि वृंदाचा शुभविवाह पार पडला. वृंदा नवरी म्हणून सजलेली छान दिसत होती. कोपरा पर्यंत भरलेले मेहेंदीचे हात, हातातला हिरवा चुडा, त्यात मोत्यांच्या कडा, कपाळावर अर्ध चंद्राची टिकली, डोळ्यात काजळ, नाकात मोत्याची ओठांपर्यंत येणारी नथ, कानातले झुमके आणि केसांच्या आंबाडयातले सोनेरी फुल, गळ्यात सुंदर मोत्याची ठुशी आणि एक लक्ष्मीहार, त्यात हळदी च्या वेळेस घातलेला पिवळा धागा, हातातले हळकुंड, पायातले पैंजण, या सगळ्यात ऊठून दिसणारी निळ्या काठांची गुलाबी नऊवारी साडी आणि भर म्हणून नुकतंच निनाद ने तिच्या भांगेत भरलेले कुंकू, गळ्यातले दोन वाट्यांचे मंगळसूत्र, पायातले जोड्वे आणि मुंडावळ्या.. तिचं सौंदर्य अजून ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 3
असेच दिवस जात होते आणि एक दिवस निनाद लवकर घरी आला. आला तसा फक्त तो फ्रेश झाला असेल नसेल cot वर झोपला. आधी वृंदाला वाटलं की तो थकला असेल. मग तिनेही त्याला आवाज दिला नाही. ती स्वयंपाकाला लागली. तिने अगदी साधं जेवण बनवलं होतं. वरण-भात , चपाती आणि मेथीची भाजी. जेवण तयार झालं तशी तिने पानं वाढली आणि निनादला आवाज दिला. पण तो जागचा हलला नाही. तिने पुन्हा आवाज दिला. “निनादऽऽ..” पण काहिच प्रतिक्रीया नाही. शेवटी तिने त्याच्या हाताला हात लावून त्याला उठवायचा प्रयत्न केला. आणि वृंदाला निनादचा हात गरम लागला. तिने लगेच त्याच्या कपाळावर हात ठेवला. निनाद तापाने ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 4
“डॉक्टर काही सीरियस नाही ना?”, निनाद ने विचारले.“आम्ही test केल्यात. त्यांचा bp लो झालेला. आता तो नॉर्मल आहे आणि हिमोग्लोबीन पण खुपंच कमी झालेय. बेशुद्ध आहेत. येतील शुद्धीवर. पण तरी काही तास observation मध्ये ठेवावं लागेल.”,डॉक्टर म्हणाले.डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर येत निनाद म्हणाला, “ आई आणि निशाला घरी पाठवायला हवं. तू जा त्यांच्यासोबत. मी थांबतो इथे.”“पण मी.. मी कशी जाऊ?”“हे बघ आत्ता आई आणि निशाला तुझी जास्त गरज आहे. मी आहे इकडे. नको काळजी करु. काही वाटलं तर मी फोन करेन.त्यांनी काही खाल्लं नाहीये. तूही खाऊन घे.”“आणि तू ?”“मी खाईन इकडे काहितरी.”वृंदाचं घर तिकडून १० मिनटांवर होतं. तिने ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 5
“काऽय?”आता जीभ चावायची वेळ वृंदाची होती. कारण निनाद ब-याच वेळा उशिरा घरी येत असे आणि वृंदा देखील कधी फोन तो कधी येणार हे विचारत नसे.“मी माझ्यासाठी चहा घेऊन येते.”,असं म्हणून वृंदाने बोलणं टाळलं.दोघांनी मग चहा आणि भजी वर मनसोक्त ताव मारला. निनादची नजर तिच्यावरुन हटतंच नव्हती. “काय झालेय सांगशील का?”,निनाद ने पुन्हा एकदा न राहवून तिला विचारले. यावर वृंदा पुन्हा किचन मध्ये गेली. तिला असं जाताना बघून निनाद तिला पाठमोरा बघत राहीला. थोड्याच वेळात हातात एक केक आणि औक्षणाचं ताट घेऊन वृंदा बाहेर आली. तिने केक आणि ताट टिपॉय वर ठेवलं.“पण आज तर माझा वाढदिवस नाहीये.”“हो पण माझा तर आहे ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 6
“बरं येतोच मी.”निनादला येत येत 11:30 वाजले. वृंदा थांबली होतीच जेवायची. दोघांचं जेवण झालं आणि निनाद लगेच झोपी गेला. खुप थकला होता. वृंदा देखील झोपली. झाला प्रकार ती विसरुन गेली. काही दिवसांनी पुन्हा त्याच नंबर वरुन missed call आला. नेमकं या वेळेस निनाद घरी होता. वृंदाने त्याला नंबर दाखवला.“बघ निनाद पुन्हा तोच नंबर..”“बघू..”, निनादने नंबर बघितला आणि म्हटलं, “ बघुया.. अजून एकदा कॉल केला तर… नाहीतर complaint करु.”पण तशी वेळंच आली नाही. जेव्हा पुन्हा फोन वाजला तेव्हा समोरुन एक ओळखीचा आवाज वृंदाला आला. निनाद ने आधीच फोन लाऊडस्पिकरवर टाकायला सांगितला होता. त्यामुळे दोघे मिळून पलीकडचा आवाज ऐकत होते. वृंदाने तो ...अजून वाचा
मिले सूर मेरा तुम्हारा - 7 - अंतिम
दिवस असेच छान जात होते. अचानक एक दिवस सकाळी वृंदाच्या खुप पोटात दुखू लागलं. तो शनिवार असल्याने निनाद आणि दोघांना सुट्टी होती.“काय झालं वृंदा?”“पोटात दुखतंय रे खुप. चक्कर पण येतेय.”“अचानक कसं? दवाखान्यात जायचं का?”“अचानक नाही रे. पीरियड्स आलेत माझे. म्हणून दुखतंय. खुप वाटलं तर जावं लागेल दवाखान्यात.”“बरं. तू आराम कर. झोप इकडे.”, निनाद ने तिला बेड वर झोपवले आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला. “जास्तंच त्रास होतोय का?”वृंदा आता रडू लागली होती. तिने निनादचा हात घट्ट पकडला. “काय करु मी? बोल ना कुठे दुखतंय?”वृंदाने पाया कडे इशारा केला. निनादने बाम घेतला आणि तिच्या पायाला चोळला. तिचे पाय तो दाबू लागला तसं तिला ...अजून वाचा