वाचलास रेsssss वाचलास

(39)
  • 120.3k
  • 11
  • 56.3k

{"वाचलास रेsssss वाचलास !"- ही माझी एक दीर्घ कथा आहे. भयकथा असली तरीही यात सस्पेन्स आणि प्रेम दोन्ही गोष्टी असल्याने वाचक निराश होणार नाहीत. आजपासून दोन दिवस आड यातील नवा भाग प्रकाशित करण्यात येईल. } -------------------------------------------------------------------------------------------------------- 'पॉssssssss.... रात्री १२:४० ची शेवटची लोकल निघून गेली. बाहेर रस्त्यावर २० वर्षे जुनी फटफटी वाट बघत होती. किक मारताच गाडीत भरलेल्या रॉकेलची साक्ष म्हणून, ढीगभर धूर परिसरात सोडून, उरलेल्या ब्रँडीचे दोन घोट पोटात टाकत, मी तशाच भिजलेल्या बेलबॉटम मध्ये बाटली कोंबली आणि तोऱ्यात निघालो... चांगलीच किक बसली होती, फटफटीला पण आणि मला पण.' आठ-दहा पावलांवर कोणी तरुणी पावसात आपली छत्री

Full Novel

1

वाचलास रेsssss वाचलास ! - 1

{"वाचलास रेsssss वाचलास !"- ही माझी एक दीर्घ कथा आहे. भयकथा असली तरीही यात सस्पेन्स आणि प्रेम दोन्ही गोष्टी वाचक निराश होणार नाहीत. आजपासून दोन दिवस आड यातील नवा भाग प्रकाशित करण्यात येईल. } -------------------------------------------------------------------------------------------------------- 'पॉssssssss.... रात्री १२:४० ची शेवटची लोकल निघून गेली. बाहेर रस्त्यावर २० वर्षे जुनी फटफटी वाट बघत होती. किक मारताच गाडीत भरलेल्या रॉकेलची साक्ष म्हणून, ढीगभर धूर परिसरात सोडून, उरलेल्या ब्रँडीचे दोन घोट पोटात टाकत, मी तशाच भिजलेल्या बेलबॉटम मध्ये बाटली कोंबली आणि तोऱ्यात निघालो... चांगलीच किक बसली होती, फटफटीला पण आणि मला पण.' आठ-दहा पावलांवर कोणी तरुणी पावसात आपली छत्री ...अजून वाचा

2

वाचलास रेsssss वाचलास ! - 2

'हिरव्या गर्द झाडीतून रातकिड्यांची भयंकर किर-किर ऐकू येत होती, जणू हातचे सावज गमावलेल्या शिकाऱ्याचा आक्रोश सुरु आहे. त्यामध्येच सडकून पाऊस माघार घ्यायच लक्षण दिसेना. रस्ता खड्यातून जातो, कि खड्डा रस्त्यातून त्याचा पत्ता लागेना. त्याच खड्यातून मागचा पुढचा कसलाही विचार न करता गाडी फरपटत होती. टायरची पार चाळण झाली असावी. गाडीचे हेडलाईट्स तर केव्हाचे टाटा-बाय-बाय करून गेले. काहीही असो गाडी थांबवायची नाही. कारण जीव महत्वाचा होता. दोन तास न थांबता गाडी चालत होती. शेवटी शहराचा रस्ता लागला. थोडी रहदारी वाढू लागली. तसे दोघेही एका चहाची टपरी बघून उतरले. घडलेला प्रसंग कोणालाही सांगणे शक्य नाही आणि कोण विश्वास ठेवणार ?' " ...अजून वाचा

3

वाचलास रेsssss वाचलास ! - 3

'त्या नदी घाटावर आजूबाजूचा कानोसा घेत मी गाडीला किक मारली, ती काही केल्या स्टार्ट होईना. बरेच दिवस पावसात भिजल्याने अवस्था खूप वाईट झाली होती. सात वर्षे झाली, माझ्या स्वकमाईतून घेतलेली पहिली गाडी. असा कसा वाऱ्यावर सोडेन मी तिला. डिकी चेक करून आधी माझी डायरी उचलली. माझी डायरी, तिच ज्यामध्ये मी कथा लिहितो. माझ्या [अजरामर] कथा. मी लिहितो, मग वेबसाईटला पब्लिश करतो, आणि मग त्याच भयकथा कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यच वाटोळं करतात. अगदी नायनाट....आणि सुरु होतो लपंडाव. मी, माझी कथा आणि या सगळ्याच्या मागे लागलेली मीडिया, माझ्या कथेसारखीच घटना आयुष्यात घडून आयुष्याची फरफट झालेला एखादा अभागी ...अजून वाचा

4

वाचलास रेsssss वाचलास ! - 4

'अंधार्‍या रात्री आजूबाजूचा परिसर राकट धुक्याने आच्छादला होता. झाडे-वेली शांत निवांतपणे पहुडलेल्या, त्यावर नुकत्याच पडुन गेलेल्या पावसाचे ओघवते थेंब लागले. सकाळचा पाच-साडेपाच चा प्रहर. अभिमन्यूची गाडी पार्किंगमध्ये उभी होती, शेजारी रक्षाची बाईक. या वेळी बाबाच्या अड्ड्यावर तसे कोणी चिटपाखरूही नसे. त्यामुळे बोलायला निवांत वेळ मिळतो. शिवाय हा अड्डा शहरवस्तीपासुन एका बाजूला येतो. त्यामुळे एवढ्या पहाटे इथे फक्त आणि फक्त अंधारलेल्या शांततेचे साम्राज्य होते. शिवाय रहदारीच्या ठिकाणी रक्षा भेटायला येणे, हे जवळजवळ अशक्य, म्हणुनच अभिमन्यूने ही जागा निवडली होती.आल्यापासून चार-पाच कप चहा प्रत्येकी संपवून झाला होता. ' गेल्याचं आठवड्यात घडुन गेलेली घटणा आपण सांगितली, पण तिची ...अजून वाचा

5

वाचलास रेsssss वाचलास ! - 5

'काल रात्री बन्याच्या टपरीला भेट देऊन आल्यापासून रक्षाच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचार येत होते. अभिमन्यू ज्या तिला तिथे घेऊन गेला होता, त्या नुसार काहीही माहिती हाती लागली नाही. उलट तिथे बन्या नावाचा कोणीही टपरीवाला दिसला नाही. जी एक टपरी त्याच जागेवर उभी होती, ती कुण्या जग्या नावाच्या बिहारी माणसाची होती. तो तर म्हणाला कि, ' त्याने दोन दिवसापूर्वीच नवीन टपरी चालू केली आहे, त्याआधी तिथे काहीही नव्हते. अगदी निर्जन अशी ती जागा...' कोणाच खरं आणि कोणाच खोटं? तिला काही समजेना.' काय करावं? याच विचारात ती असताना बाजूचा फोन खणाणला. अपेक्षित होत, त्याप्रमाणे पलीकडून ...अजून वाचा

6

वाचलास रेsssss वाचलास ! - 6

'पावरी वस्ती सोडून, डावीकडे जाणाऱ्या छोट्या अरुंद रस्त्याने, टोकाला एका बैठ्या चाळीत दहा-बाय दहाच्या रूममध्ये सलीम आणि त्याची आई होते. सलीम टॉक्सी ड्राइव्हर म्हणून काम करत असल्याने त्याची रूम शोधायला रक्षाच्या लोकांना वेळ लागला नाही. बराच वेळ कोणीही आतून दार उघडले नाही, ती दार ठोकून थेट आत शिरली. आत जाताच क्षणी एक कुबट वास तिच्या नाकाजवळ भनभनला. अंगावर एक भयंकर काटा उभा राहिला. एका लाकडी बाकड्यासारख्या छोट्या पलंगावर सलीम झोपला होता. त्याची अम्मी शेजारी डोकं टेकून बसून होती. सलीमची अवस्था फारच वाईट होती. खोबणीत आत घुसलेले डोळे, अगदी रुक्ष झालेले शरीर, जणू हाडांचा सापळा... मानेवर ...अजून वाचा

7

वाचलास रेsssss वाचलास ! - 7

'मिसेस कारखानिस नी हसत हसत रक्षाचे स्वागत केले. तिचे येणे म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. दोघी खूप फार मनमोकळेपणाने बोलल्या. अभिमन्यूची काळजी होतीच, एवढ्या दिवसांनी दोघींची भेट झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तोपर्यंत अभिमन्यू देखील त्यांच्या बैठकीत सामील झाला. चहापान उरकून त्या भूतकाळातून वर्तमानकाळात आल्या तेव्हा त्यांची मुद्रा फार चिंताग्रस्त वाटली. म्हणून रक्षाने देखील विषय बदलला. ती अभिमन्यूच्या येणाऱ्या नवीन कादंबरी विषयी बोलू लागली.' " अभि, कुठपर्यंत आली तुझी प्रेमकथा? " " संपेल काही दिवसात, तशी थोडीच राहिलेय, पण लिखाणात म्हणावे तसे मन लागत नाही ग. " " अरे अभि, तू चक्क प्रेमकथा लिहितोस? मी ...अजून वाचा

8

वाचलास रेsssss वाचलास ! - 8

'खड्ड... खड्ड, एक मोठा दगड डिक्कीवर आपटला होता. काहीही फायदा झाला नाही. उलट ती अजूनच घट्ट झाली. बाजूला उभ्या आपल्या गाडीतील स्पॅनर आणि इतर साहित्य काढून त्याने फटफटी सुरु करण्याचा पर्यंत केला. तो ही व्यर्थ होता. फटफटी जागची हलेना. चावी सुद्धा लॉकमध्ये आत फसून बसली होती. त्यामुळे गाडी स्टार्ट होईना आणि डिक्की सुद्धा उघडू शकत नव्हती. एवढे दिवस पावसात भिजल्याने तिची अवस्था वाईट झाली होती. भर पावसात अभिमन्यूला घाम फुटला. आंगातला पांढरा शर्ट चिखल-मातीने लालेलाल झाला होता. गाडी पार उलटी-पालटी करू झाली, तरीही जैसे थे स्थिती होती. रागाने गाडीला एक सणसणीत लाथ घालण्याची इच्छा असूनही ते करता येत नव्हते, ...अजून वाचा

9

वाचलास रेsssss वाचलास ! - 9 - शेवटचा भाग

"सायब जरा इचार करा, काय बी लिवू नका. ती तुम्हाला हात लावू शकत नाय, काय तरी ताकद हाय तुमच्यात. तीनं आत्तापर्यंत तुम्हाला मारलं बी असत नाय." कोपऱ्यात फटफटीच्या तुकड्यांच्या मागे घाबरून लपलेला बन्या उठून उभा राहिला होता. ढाब्यावर स्टोव्ह पेटवण्यासाठी वापरत असलेले लायटर खिशातून काढून त्याने ते पेटवले होते. काय समजायचं ते अभिमन्यू समजला होता. डोक्याला एक हिसका देत त्या विकृत भुताने आपला मोर्चा बन्याकडे वळवला. आणि तेवढीचं संधी साधून अभिमन्यूने उर्वरित कथा खरडायला सुरुवात केली होती. काही वेळापूर्वी फटफटीमागील खिशात ठेवलेला बाप्पाचा तो फोटो चाचपडत अभिमन्यूने त्याला हातात घेतले. एका हाताने लेखणी सुरु होती. डायरीवर भराभर अक्षरे उठू ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय