बायको माझी प्रेमाची!

(5)
  • 41k
  • 2
  • 23.7k

१) नवरा- बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते! व्यक्त- अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवेफुगवे, हसणे-खेळणे, वादविवाद, सुसंवाद, लटका राग, प्रसंगी संताप, चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंफलेले नाते म्हणजे पतीपत्नी! दोघेही एकमेकांची हौसमौज, आवड-निवड जपताना, काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाड जपणारे असे नाते म्हणजे पतीपत्नी! अशाच एका नवराबायकोच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया... त्यादिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काही तरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. 'बाप रे! आठ वाजून गेले. किती वेळ झोपलो मी? जाग कशी

Full Novel

1

बायको माझी प्रेमाची! - 1

१) नवरा- बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते! व्यक्त- अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवेफुगवे, वादविवाद, सुसंवाद, लटका राग, प्रसंगी संताप, चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंफलेले नाते म्हणजे पतीपत्नी! दोघेही एकमेकांची हौसमौज, आवड-निवड जपताना, काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाड जपणारे असे नाते म्हणजे पतीपत्नी! अशाच एका नवराबायकोच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया... त्यादिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काही तरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. 'बाप रे! आठ वाजून गेले. किती वेळ झोपलो मी? जाग कशी ...अजून वाचा

2

बायको माझी प्रेमाची! - 2

२) 'चला एक युध्द तर जिंकले. फराळाची व्यवस्था झाली.' असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवसीय बायकोचे म्हणजे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शिसारीच आल्यागत झाले. कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठांच्या दोन्ही कडांमधून पेस्टचा फेस पाण्यासारख्या वाहत होता. शीला केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधी समजलेच नाही कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. शीलाला स्नान करतानाच्या किंवा ओलेत्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात असूनही तो योग कधीच आला नाही. इकडे सरोज त्याच अवस्थेत फतकल मारून सोफ्यावर बसून विचारत होती, "ये-ये-च-च-हा--फ-रा-ल....." तितक्यात तिच्या तोंडातली खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती ...अजून वाचा

3

बायको माझी प्रेमाची! - 3 - अंतिम भाग

३) आपुले मरण आपणच पहावे याप्रमाणे मी जणू निर्जिवास्थेत स्वयंपाकघरात पोहचलो, भाजी आहे का नाही हे पहावे म्हणून फ्रीज आणि पाहतो तर काय फ्रीजमध्ये सारा स्वयंपाक जणू माझीच वाट पाहत होता. मी एक-एक भांडे बाहेर काढून उघडत गेलो, संपूर्ण स्वयंपाक तयार होता, अगदी स्पेशल स्वीट डिश तीही माझ्या आवडीची...बासुंदी! मला आश्चर्याचा धक्का बसला. हा काय प्रकार? देव पावला काय? शीलाच्या भक्तीचा तर हा प्रसाद नव्हे? मी देवाकडे पाहात हात जोडले आणि त्याच हाताने का कोण जाणे मोबाईल उचलला. पुन्हा शीलाचा नंबर डायल केला. "अहो, हे काय? एक दिवस तर सुखाने झोपू द्या." "म्हणजे तू चक्क झोपलीस?" "मग? अहो, तुम्हाला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय