आजही तो कॉलेजचा 10 जानेवारी २०१०चा काळा दिवस म्हणजे " रक्तकांड " दिवस आठवतो. तेव्हा हातापायाचा थरकाप होतो. त्या घटनेला आज दहा वर्ष झाली. तरी ती घटना काल झाल्यासारखी वाटते. मी वंदना आणि रुपेश जोडीने वकील झालो. आज आम्ही दोघेही नामांकित वकील आहोत. परंतु हा कसाकाय योगायोग आहे कि दोन दिवसांपूर्वी रूपाने आपल्याच हाताने आपल्या चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोप आला रुपेश वर. आज रुपेश तुरुंगात आहे. रुपेशने मला वकिल करून त्याची केस माझ्या हातात सोपवली आहे. मला रुपेशच्या बाजूने केस जिंकायची आहे. रुपेशला न्याय मिळवून द्यायचा आहे. परंतु आज माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे कि मी काय करू---? रूपा याविषयी काहीच बोलायला तयार नाही. मी रुपेशला न्याय देऊ कि रूपाचा हत्यारा रुपेश म्हणून रुपाला न्याय देऊ---? "----दोघेही माझे कॉलेज दोस्त आहेत. रुपेशकडून सत्य परिस्थिती समजून घेत नाही तोपर्यंत काहीच निर्णय घेता येत नाही. रूपा सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मी रुपाकडून झालेल्या " रक्त कांड " घटनेच्या वेळी गावी गेले होते. म्हणून त्यावेळी रूपाच्या हातून वाचले गेले. नाहीतर आज मी सुद्धा कदाचित स्मिता सारखी या जगात जिवंत राहिले नसते-----कारण म्हणजे रूपाने आपल्या झालेल्या पराभवामुळे अहंकाराच्या अधीन जाऊन जी मुलगी दिसेल तिच्यावर काचेच्या तुकड्याने त्यांच्या चेहऱ्यावर सपासप असे वार करून त्यांना घायाळ केले होते.
Full Novel
रक्तकांड - 1
1 आजही तो कॉलेजचा 10 जानेवारी २०१०चा काळा दिवस म्हणजे " रक्तकांड " दिवस आठवतो. तेव्हा हातापायाचा थरकाप होतो. घटनेला आज दहा वर्ष झाली. तरी ती घटना काल झाल्यासारखी वाटते. मी वंदना आणि रुपेश जोडीने वकील झालो. आज आम्ही दोघेही नामांकित वकील आहोत. परंतु हा कसाकाय योगायोग आहे कि दोन दिवसांपूर्वी रूपाने आपल्याच हाताने आपल्या चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोप आला रुपेश वर. आज रुपेश तुरुंगात आहे. रुपेशने मला वकिल करून त्याची केस माझ्या हातात सोपवली आहे. मला रुपेशच्या बाजूने केस जिंकायची आहे. रुपेशला न्याय मिळवून द्यायचा आहे. परंतु आज माझ्यापुढे मोठा प्रश्न ...अजून वाचा
रक्तकांड - 2
प्रकरण-२ दहावीचा रिझल्ट लागला आणि रूपाने आपल्या शाळेच्या मैत्रिणीबरोबर एकत्र येऊन एकाच कॉलेजला ऍडमिशन घेतले. दोन महिन्यातच कॉलेज सुरु शाळेच्या वातावरणापेक्षा कॉलेजचे वेगळे वातावरण बघून रूपा खुश झाली होती. मुलींचे वेगवेगळे रंगीबेरंगी ड्रेस, त्यांच्या हेअर स्टाईल्स, त्यांचे उंच उंच सँडल्स हे बघून रुपाला वेगळेपणा वाटू लागला होता. मुलांमुलींनमधील वागण्यातला खेळकरपणा, मोकळेपणा, बघून रुपाला आश्चर्य वाटत होते. हळू हळू कॉलेजच्या वातावरणात रूपा आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये रुळून गेली होती. क्लास बुडवून पिक्चरला जाणे, हॉटेलला जाणे, या गोष्टींकडे रूपाच्या मनाचा कल जाऊ लागला. नवं नवीन मित्र मैत्रिणी मिळू लागल्या. नवे अनुभव येऊ लागले, एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे मौज मजा यामध्ये रूपा आपले ...अजून वाचा
रक्तकांड - 3
प्रकरण-३ रूपा कॉलेजला सुट्टी असल्याने सोफ्यावर बसून टी.व्ही. बघत होती. परंतु रूपाचे मन टी.व्ही. बघण्यात लागत नव्हते. म्हणून चॅनल चॅनल फिरवत बसली होती. तिचे मन काही स्थिर रहात नव्हते. मनात असंख्य विचार घुमत होते. या वैशालीपुढे आपला टिकाव लागतो कि नाही.या गोष्टीचे तिला खूप टेन्शन आले होते.परंतु आपण काही झाले तरी माघार घ्यायची नाही. काय करू म्हणजे मी वैशालीला हरवू शकते---? हे मोठे प्रश्न चिन्ह रुपाला पडले होते. विचारामध्ये रूपाची बोटं टी.व्ही. रिमोटवर फिरत होती आणि एक एक चॅनल पुढे मागे सरकत होते. परंतु रूपाचे मन एकही चॅनलवर स्थिर होत नव्हते. " अगं रूपा, तुला टी.व्ही. जर बघायचा नाही ...अजून वाचा
रक्तकांड - 4
प्रकरण- ४ ब्युटीक्वीन स्पर्धेचा दिवस जवळ जवळ येत होता. परंतु दोन-दिवस झाले तरी वैशाली कॉलेजला आलेली दिसत नव्हती. वैशालीची बरीच जोरात तयारी चालू आहे असे दिसते असे समजून रूपाने वैशालीला फोन लावला. " हा बोल रूपा---मला वाटलेच होते कि तुझा फोन येणारच---आत्ताच स्मिता, साधना,व वंदना यांचा फोन येऊन गेला---बोल काय म्हणतेस---? " "अगं, काय म्हणतेस काय---? दोन-तीन दिवस कॉलेजला आलीस नाही तर आम्हाला काळजी नाही का वाटणार---? तब्येत वगैरे बरी आहे नं---? " रूपा म्हणाली. " अगं हो, माझी सध्या तब्येत बरोबर नाही. ताप येतोय---डॉक्टरांकडे जाऊन आले. ब्लड टेस्ट केली तर टायफाईड आहे असे समजले. त्यामुळे खूप विकनेस आहे. ...अजून वाचा
रक्तकांड - 5 - अंतिम भाग
प्रकरण- ५ स्मिता रुपेशची अगदी जवळची मैत्रीण होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. स्मिता सोडून गेल्यावर रुपेश एकदम तुटून गेला खूप दुःखी झाला होता. स्मिताला विसरण्याचा प्रयत्न करूनही तो तिला शेवटपर्यंत विसरू शकला नव्हता. त्याचे मन त्याला आतून खात होते कि मी उगाचच वैशालीच्या जागी स्मिताला स्पर्धेत भाग घ्यायला लावले. स्मिता नको नको म्हणत असताना सुद्धा मी तिला जबरदस्ती केली होती. मी माझ्या स्वार्थासाठी विनाकारण तिचा बळी घेतल्यासारखे झाले. रूपाची हार करण्यासाठी मी स्मिताचा वापर केला. मी स्मिताला मारले आहे---या विचाराने रुपेशची मानसिक स्थिती फार बिघडत चालली होती. शेवटी रुपेशलाही मानसिक उपचाराची मदत घ्यायला लागली. त्याला या स्मिताच्या विरहाच्या धक्क्यातून ...अजून वाचा