तू भेट ना रे रोज रोज नव्याने

(5)
  • 25.1k
  • 1
  • 12.8k

आज तिचा जॉब चा पहिलाच दिवस होता अन तिला पोहचायला late झाला होता.... शोरूम आलं ,तशी ती ऑटोवाल्याला पैसे देऊन उतरली...अन थोडं पळतच शोरूम मध्ये पोहचली... तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, अन काळजी ही दिसत होती...केस व्यवस्थित करत ती आत आली, तर समोर Reception वरचे सगळे तिलाच पाहू लागले... ती सगळ्यांना इग्नोर करून निघाली. reception वर चौकशी केली तर थोडा वेळ वाट पाहायला सांगण्यात आले...तशी ती तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसली... थोड्यावेळाने तिला आत बोलवलं गेलं.... "मे आय कम इन सर..." ती थोडी घाबरतच बोलली "येस..." आतून रुक्ष असा आवाज आला तशी ती आत गेली. "सीट..." ती खुर्चीवर बसली अन चेहऱ्यावरचा घाम रुमालाने पुसत ती सरांच्याकडे पाहू लागली.

1

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 1

आज तिचा जॉब चा पहिलाच दिवस होता अन तिला पोहचायला late झाला होता.... शोरूम आलं ,तशी ती ऑटोवाल्याला पैसे उतरली...अन थोडं पळतच शोरूम मध्ये पोहचली... तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, अन काळजी ही दिसत होती...केस व्यवस्थित करत ती आत आली, तर समोर Reception वरचे सगळे तिलाच पाहू लागले... ती सगळ्यांना इग्नोर करून निघाली. reception वर चौकशी केली तर थोडा वेळ वाट पाहायला सांगण्यात आले...तशी ती तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसली... थोड्यावेळाने तिला आत बोलवलं गेलं.... "मे आय कम इन सर..." ती थोडी घाबरतच बोलली "येस..." आतून रुक्ष असा आवाज आला तशी ती आत गेली. "सीट..." ती खुर्चीवर बसली अन चेहऱ्यावरचा घाम ...अजून वाचा

2

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 2

आज महिना होत आला होता गौरीला जॉईन होऊन, पण ती जास्त कोणाशी बोलत नव्हती... जिया ही तिथेच कामाला होती...गौरीच्या टेबलवर ती असायची, ती मात्र जाम बडबडी होती... आणि गौरीला मिसळून घेऊ पाहत होती.....गौरी मात्र सगळ्यांपासून लांब राहू पाहत होती. गौरी दुपारचा टिफिन आणत नसे, सगळे जेवायला गेले तरी ही तिथेच बसून असायची....काम मात्र परफेक्ट असायचं तीच. पंधरा दिवसांतच तिने सगळं काम समजावून घेतले होते. सर अन मॅनेजर दोघे ही तिच्या कामावर खुश होते, पण तिची वागणूक पाहून सगळ्यांना अस वाटायचं की तिला खूप घमंड आहे. ती जास्त मिक्स होत नाही हे पाहून विकी विचारात पडला . "नेमका हिला प्रॉब्लेम ...अजून वाचा

3

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 3

विकीने गौरीला रेल्वेस्टेशनवर पाहिले, तो तिच्याशी बोलण्यासाठी जाणार होता की, मध्ये रेल्वे आली आणि पुन्हा ती त्याला दिसली नाही. निल ही आला व विकी ही घरी निघून गेला.दुसऱ्या दिवशी विकी गौरीला शोधत आला. ती अजून शोरूममध्ये आली नव्हती. शोरूमच्या मागेच कंपनीचे वर्कशॉप होते. तो तिथे ही बघून आला. पण ती कुठे दिसली नाही. तो नाराज झाला आणि पुन्हा आपल्या डेस्ककडे जाण्यासाठी वळला की समोर गौरी येताना त्याला दिसली.तो तीच्याशी बोलण्यासाठी जाणारच होताच की त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर बॉस नाव झळकत होत तस तो बॉसच्या केबिन कडे गेला.सरांशी बोलून तो बाहेर आला. पण आता त्याच्या हातात दोन फाईल्स होत्या ज्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय