तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 1 Sam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

तू भेट ना रे रोज रोज नव्याने - भाग 1

आज तिचा जॉब चा पहिलाच दिवस होता अन तिला पोहचायला late झाला होता....

शोरूम आलं ,तशी ती ऑटोवाल्याला पैसे देऊन उतरली...अन थोडं पळतच शोरूम मध्ये पोहचली...
तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, अन काळजी ही दिसत होती...केस व्यवस्थित करत ती आत आली, तर समोर
Reception वरचे सगळे तिलाच पाहू लागले...

ती सगळ्यांना इग्नोर करून निघाली. reception वर चौकशी केली तर थोडा वेळ वाट पाहायला सांगण्यात आले...तशी ती तिथे असणाऱ्या सोफ्यावर बसली...

थोड्यावेळाने तिला आत बोलवलं गेलं....

"मे आय कम इन सर..." ती थोडी घाबरतच बोलली

"येस..." आतून रुक्ष असा आवाज आला तशी ती आत गेली.

"सीट..."

ती खुर्चीवर बसली अन चेहऱ्यावरचा घाम रुमालाने पुसत ती सरांच्याकडे पाहू लागली.

"तर मिस् गौरी शिंदे..आज तुमचा जॉबचा पहिला दिवस आहे, अन आजच late झाला तुम्हाला , पहिला दिवस आहे म्हणून excuse देतोय, पण पुन्हा late चालणार नाही वेळेतच यावं लागेल नाही तर हाफ डे पडेल अन सॅलरी कट केली जाईल..." सर अजून ही रुक्ष पणे बोलत होते...

"सॉरी सर ,पुन्हा अस होणार नाही..." ती खाली मान घालूनच बोलत होती...

"Ok, i hope so, तुम्ही पुन्हा वेळ करणार नाही..."

" विक्रांत कदम, तुम्हाला तुमच काम समजावून सांगतील..."सर आता कॉम्प्युटर स्क्रीन कडे बघत कॉल करत बोलले.

" हा विक्रांत come to my cabin..." कॉल कट करून ते पुन्हा आपलं काम करू लागले

थोड्या वेळाने विक्रांत केबिनमध्ये आला..

" हा तर विक्रांत.. या मिस् शिंदे ,या आज पासून आपल्यासोबत काम करणार आहेत, तर यांना त्याच काम समजावून सांग...अन मला येऊन भेट नंतर... "

"Ok sir..." म्हणून तो बाहेर निघाला

तस गौरी ही उठली अन विक्रांत च्या मागे गेली...एक वळण घेऊन एक हॉल वजा रूम होती...तो आत गेला तस सगळे त्याच्याशी हसून बोलत होते...एका टेबल जवळ जाऊन तो थांबला...

" तर मिस् गौरी, हा तुमचा टेबल असेल... तुम्ही इथे CCE म्हणून काम बघणार आहात. इथे तुम्हाला तुमचा स्वतंत्र PC आहे, यावर तुम्हाला काम करायचं आहे, कंपनी कडून तुम्हाला मोबाईल दिला जाईल with sim card.. ज्यावरून तुम्हाला customer सोबत touch मध्ये राहायचं आहे,म्हणजे त्यांनी आपल्या कंपनी ची जी कार घेतली आहे त्याचं मॉडेल कोणतं आहे, रनिंग किती झालं आहे, पहिली फ्री सर्व्हिस कधी आहे..त्यांना reminde करून देऊन त्याची अपॉइंटमेंट फिक्स करायची...त्यानंतर second paid सर्व्हिस, third paid सर्व्हिस कधी आहे...." अस खूप काही तो समजावून सांगत होता...

गौरी फक्त ऐकून घेत होती...तिच्या डोक्यावरून जात होतं आता सगळं...कारण तिची field च नव्हती ही... पण तरी ती हे काम करत होती... त्याला ही एक कारण होत की ती इथे आपली field सोडून काम करणार होती...

तिचा चेहरा पाहून विक्रांत ला समजून गेलं की तिला काही समजलं नाहीये...तो तिथली एक खुर्ची घेऊन तिच्या जवळच थोडं अंतर ठेवून बसला...

" Can I just call you gouri, if you don't mind,...." तो चेहऱ्यावर हसू ठेवून बोलला

"अ.... हं...., हो सर...." ती थोड कचरतच बोलली

" call me only viki...." तो हसत बोलला

ती मात्र हसली नाही, ती निर्विकारच दिसत होती उत्तरा दाखल फक्त तिने हुंकार भरला.

" तर गौरी, पहिल्यांदा मी तुला सांगेन की इथे काम करताना तुला कोणता ही त्रास होणार नाही, हे सगळे जे आहेत ते सगळे एका फॅमिली सारखेच आहेत, सगळे free minded आहेत, तुला सगळे मिक्स करून घेतील लगेच...सगळे हसत खेळत काम करतात इथे त्यामुळे हे जे तुझ्या मनावर आता दडपण आलं आहे ते निघून जाईल..."

ती आता ही फक्त ह्म्म म्हणून मान हालवत होती...हे पाहून विकीला थोडं हसू आलं...तो समजून गेला पहिला दिवस आहे त्यामुळे अशी थोडी अवघडली असेल...

"कॉफी..."विकी ने विचारले.

ती नको म्हणाली... तरी त्याने तिथे असणाऱ्या शिपाई काकांना दोन कॉफी आणण्यास सांगितले.

"मी तर नको म्हणाले होते सर..."गौरी बोलली

"हो, पण तुला गरज आहे...,कारण मी काम समजावून सांगणार त्यामुळे तुला बोर होईल म्हणून कॉफी पी मस्त अन फ्रेश हो..." तो थोडा गालात हसत बोलला

गौरी मात्र हसली नाही ..

"तुला मी अस एकेरी बोलावलं तर चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना..."तो अजून ही चेहऱ्यावर हसू ठेवून बोलत होता

"हो सर चालेल..."ती कचरतच बोलली.

कॉफी आली,अन दोघे कॉफी घेऊ लागले...कॉफी चे सिप घेता घेता विकी तिला सगळं समजावून सांगू लागला..

कसा वाटला पहिला भाग नक्की कळवा.गौरी इतकी शांत का आहे?? , ती नेहमीपासून अशीच होती का?,का काही झालं होतं तिच्या life मध्ये...??? जाणून घेऊ नेक्स्ट पार्ट मध्ये.