त्याला आठवत होता त्याचा भुतकाळ. तो आठवत होत्या गतकाळात घडलेली प्रकरणे. तो होता म्हणून एका आंधळ्या माणसालाही जग पाहता आलं होतं. तो सदैव सोबत होता त्या आंधळ्या माणसाच्या. कुणाला तरी दिलेलं वचन होतं ते. ते भंगू नये म्हणून तो कर्तव्य पालन करीत होता तो. परंतू त्याच्या मनात आज एक शल्य होतं. ते म्हणजे तो त्या आंधळ्या व्यक्तीच्या शेवटच्या समयी त्याला वाचवू शकला नव्हता. महाभारत घडलं की नाही, हे काही माहीत नाही. परंतू त्यात असलेली एक एक पात्र आजही आपल्याला बोध देत असतात. माणूसकी शिकवीत असतात. कोणत्या प्रसंगात कसं वागावं याची शिकवण देत असतात. आजची परिस्थिती पाहिली जगाची तर असं जाणवतं की आजचं जग हे कौरव व पांडवानंच भरलेलं असून आजच्या काळात जी मुठभर इमानदार माणसं मिळतात. त्याच माणसांवर आजची वास्तविकता आधारलेली आहे. त्यांनाच पांडव म्हणता येईल. ही मुठभर असलेली मंडळी अतिशय इमानदार असून ती मंडळी चो-या लुटमार, डकैती, व्याभीचार करीत नाहीत. तसेच आदर्श व्यवहार ठेवत असतात. मात्र बाकीची सर्व मंडळी अशी आहेत की जी चो-या, लुटमार, डकैती, व्याभीचार करीत असतात. कोणाच्याही मुली पळवून आणत असतात. भावाच्याही पत्नीचे धिंडवडे काढत असतात. कोणी याला कलियुग म्हणतात तर कोणी याला महाभारत काळ. परंतू ते काहीही म्हणोत. वास्तविकता हेच दाखवते की हा महाभारत काळ आहे.

1

संजय - भाग 1

संजय कादंबरी भाग एक त्याला आठवत होता त्याचा भुतकाळ. तो आठवत होत्या गतकाळात घडलेली प्रकरणे. तो होता म्हणून एका माणसालाही जग पाहता आलं होतं. तो सदैव सोबत होता त्या आंधळ्या माणसाच्या. कुणाला तरी दिलेलं वचन होतं ते. ते भंगू नये म्हणून तो कर्तव्य पालन करीत होता तो. परंतू त्याच्या मनात आज एक शल्य होतं. ते म्हणजे तो त्या आंधळ्या व्यक्तीच्या शेवटच्या समयी त्याला वाचवू शकला नव्हता. महाभारत घडलं की नाही, हे काही माहीत नाही. परंतू त्यात असलेली एक एक पात्र आजही आपल्याला बोध देत असतात. माणूसकी शिकवीत असतात. कोणत्या प्रसंगात कसं वागावं याची शिकवण देत असतात. आजची परिस्थिती पाहिली ...अजून वाचा

2

संजय - भाग 2

संजय भाग दोन आज ती कौरव मंडळी लहानाची मोठी होत होती. त्यांच्यावर कुसंस्कार पडत चालले होते शकुनीचे. शकुनी तसा लागला होता हस्तीनापुरला. तो षडयंत्र करीत होता हस्तीनापुरसोबत. परंतू ती बाब ब-याच हस्तीनापुरातील लोकांच्या लक्षात येत नव्हती. काहींच्या लक्षात येत होती. ते पर्यायानं धृतराष्ट्रला टोकतही असत. परंतू धृतराष्ट्र मी विवश आहे असा हवाला देवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असे. अशाच टोकणा-यात होता संजय. संजय क्रिष्णाचा भक्त होता. तसं पाहता तो धार्मीकही होता. त्यातच तो नित्यनेमानं धृतराष्ट्रला समजावीत असे. सांगत असे की शकुनी आपल्या बाळांवर कुसंस्कार टाकतोय. त्याला थांबवावं. परंतू त्यावर धृतराष्ट्र आपल्या मुलांना ताकीद न देता त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय