सायलेन्स प्लीज

(26)
  • 92.2k
  • 1
  • 55.7k

पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती. “ सॉरी , पटवर्धन, मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली. “ अठरा मिनिटं ” पाणिनी म्हणाला. “ इथे आल्यावर आमच्या पद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ” तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि पाणिनी कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली. “ ठीक आहे असू दे.” पाणिनी म्हणाला. “मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली. “ सौम्या सोहोनी ही माझी खाजगी सेक्रेटरी आहे. तिच्या पासून मी काहीच गुप्त ठेवत नाही.आम्ही शाळे पासून चे मित्र आहोत.इथे आपल्यात होणार बोलणं ती टिपून घेईल. मला नंतर ते संदर्भ लागला तर उपयोगी पडत.” पाणिनी म्हणाला.त्याने सौम्या ने आणून दिलेल्या कागदावर नजर टाकली. “ अच्छा, तर तू मिस केणी आहेस तर.”

Full Novel

1

सायलेन्स प्लीज - प्रकरण 1

सायलेन्स प्लीज......... प्रकरण १ पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस च्या दारात एक विलक्षण देखणी तरुणी उभी होती. “ सॉरी , मला दहा पंधरा मिनिटं उशीर झाला .” ती ओशाळून म्हणाली. “ अठरा मिनिटं ” पाणिनी म्हणाला. “ इथे आल्यावर आमच्या पद्धती प्रमाणे तुमची आणि कौटुंबिक माहिती, भेटायचं कारण, हे सगळं सौम्या कडे लिहून दिलंय ना? ” तेवढयात सौम्या हातात कागद घेऊन आली आणि पाणिनी कडे तो दिला. “ मी हा कागद तुम्हाला देण्या पूर्वीच ही आत आली.” ती म्हणाली. “ ठीक आहे असू दे.” पाणिनी म्हणाला. “मला खाजगी बोलायचं आहे.” ती सौम्या कडे बघून म्हणाली. “ सौम्या सोहोनी ही माझी ...अजून वाचा

2

सायलेन्स प्लीज - प्रकरण 2

प्रकरण २ “सॉरी, मी एकदम दांडगाई केल्या प्रमाणे आत आलो. मला एकदम नैराश्य आलय आणि मला अस होतं तेव्हा असचं विचित्र वागतो..” माझी भाची ज्योतिष जाणते.तिला माझी कुंडली माहिती आहे.मला मात्र त्यावर बिलकुल विश्वास नाही.पण तरीही तिने सांगितलेली गोष्ट माझ्या मनातून जात नाही.ती म्हणते मी वकिलाचा सल्ला घ्यायला हवा . आणि असा वकील गाठायला हवा ही त्याच्या आडनावात पाच अक्षरे आहेत.मी शहरातले सगळे वकील पालथे घातले आणि पाच अक्षरे असलेल्या आडनावाचे आणि सर्वात चांगले नाव तुमचे होते, मी ते भाचीला सांगितल्यावर ती म्हणाली तुम्हालाच भेटले पाहिजे मी. काय फालतू पणा आहे हा ! पण तरीही मी तिचे ऐकून आलोय.” ...अजून वाचा

3

सायलेन्स प्लीज - प्रकरण 3

प्रकरण तीन पाणिनी पटवर्धन फोन वर डॉ.खेर यांच्या शी बोलत असतानाच ओजस आत आला. “ तू माझी वाट बघतोयस सौम्या म्हणाली.”- पाणिनी ने फोन वर बोलता बोलताच मान डोलावली आणि ओजस ला बसायला खुणावलं. “ झोपेत चालण्याच्या सवयी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे डॉक्टर त्रिगुण खेर ? ” पाणिनी म्हणाला . “ तुमच्या साठी माझ्याकडे एक रुग्ण आहे.रात्री हातात चाकू घेऊन झोपेत चालतो तो.घरा भोवती फिरतो,अनवाणी. आपण आज भेटणार आहोत त्याला रात्री. मी तुम्हाला साडेसातला फोन करतो.तुम्ही त्याला तपासावं.त्याच्या बायकोचे म्हणणे आहे ,तो वेडा आहे. ठीक ,ठीक. मी तुम्हाला क्लब मधून घेतो.आपण एकत्रच जाऊ. ” “ झोपेत चालण्याची भानगड ...अजून वाचा

4

सायलेन्स प्लीज - प्रकरण 4

प्रकरण 4 लीना माईणकर उंच,सडपातळ,मन मोकळी आणि प्रथम दर्शनी आवडणारी होती. “ पटवर्धन, मी विहंग पेक्षा वीस वर्षांनी लहान मी पैशासाठी लग्न करणार आहे असे कोणालाही वाटू शकतं.मी तुम्हाला शब्द देते की विहंग खोपकर च्या हिताचे जे काही असेल अशा कोणत्याही कागद पत्रावर मी सही करीन.” पटवर्धन समाधानाने हसला. “ विहंग चा सावत्र भाऊ वदन राजे याच्याशी तू हा विषय बोलली आहेस का? ” “ नाही बोलल्ये.त्याला मी आवडत नाही.आर्या चा प्रियकर हर्षद आणि त्याचं चांगलं जमतं.” तेवढ्यात विहंग खोपकर लीना ला पार्टी साठी घेऊन जाण्यासाठी आला. “ तुझ्या कडून मला एक अॅफिडेव्हिट करून घ्यायचंय कोर्टात सादर करण्यासाठी.”पटवर्धन म्हणाला. ...अजून वाचा

5

सायलेन्स प्लीज - प्रकरण 5

प्रकरण 5 विहंग आणि त्याच्या भावी पत्नीला विमान तळावर सोडून पाणिनी पुन्हा आर्या च्या घरी तिच्या खोलीत आला.तिने पाणिनी सर्व इत्यंभूत माहिती काढून घेतली. “ तू काय काय केलंस?” पाणिनी म्हणाला . “ मी भुकेने व्याकुळ झाले होते.त्यामुळे मी हळूचकन मागील दाराने घरा बाहेर पडले. टॅक्सी केली आणि बाहेर जाऊन हॉटेल मधे मस्त खावून आले. येताना मात्र लपत छपत न येता राजमार्गाने आले आणि सांगून टाकल सगळ्यांना की मी खांडवा वरून बस ने अत्ताच आले म्हणून.” “ तुमच्या खान सम्याने , बल्लव ने मला पकडण्याचा प्रयत्न केला.माझा कॉफीचा रिकामा कप त्याला हवा होता म्हणून अचानक तो तुझ्या खोलीपाशी आला ...अजून वाचा

6

सायलेन्स प्लीज - प्रकरण 6

प्रकरण 6 पाणिनी ने दचकून उशी खाली फेकली. आर्या एकदम किंचाळायला लागणार तोच पाणिनी ने तिच्या तोंडावर हात ठेवला. उपयोग नाही.” पाणिनी म्हणाला “ त्यापेक्षा शांत राहून आपण कुठल्या स्थितीत सापडलोय याचा अंदाज घ्यायला पाहिजे.” तो म्हणाला. “ पण... पण....रक्त लागलंय त्याला.....” ती दबलेल्या आवाजात म्हणाली. पाणिनी ने बाहेर पॅसेज मधे डोकावून अंदाज घेतला. डॉक्टरांच्या खोलीपाशी आला आणि दार ठोठावले. आतून कडी काढल्याचा आवाज आला.दाढी करताना गालाला साबण लावलेल्या अवस्थेत ते बाहेर आले. “ खाली नाश्त्याच्या वासानेच मी उठलो. तुम्ही आला नसतात तरी मी येणारच होतो.” खेर म्हणाले. “ आम्ही त्यासाठी नाही वाजवले दार. तुम्ही तोंड धुवा आणि लगेच ...अजून वाचा

7

सायलेन्स प्लीज - प्रकरण 7

प्रकरण 7 त्या प्रशस्त घराच्या फरसबंदी केलेल्या अंगणात पाणिनी आर्या ला हलक्या आवाजात सूचना देत होता. “ काहीही झालं खांडवा चा मुद्दा कोणालाही समजता कामा नये. तुझ्या विहंग मामा ला पुढचे दोन अडीच तास आपल्याला पूर्ण सुरक्षित ठेवायला लागणार आहे.” “ ते त्याला इथे ओढत घेऊन येतील असं तुम्हाला वाटतंय?” तिने शंका विचारली “ त्यांना प्रश्न विचारायचे असणार विहंग ला.” पाणिनी म्हणाला “ पोलिसांनी मला अत्ता त्याच्या बद्दल विचारलं तर काय सांगू मी? ” आर्या म्हणाली “तो कुठे आहे ते मला माहीत नाही असे सांग.” “ मी सांगते की मी खांडवा ला मुक्काम केलं आणि बस ने घरी आले.” ...अजून वाचा

8

सायलेन्स प्लीज - प्रकरण 8

प्रकरण 8 पाणिनी ला कनक ओजस त्या घरा बाहेर त्याच्या गाडीत बसलेला दिसला. “ मला आत नाही येऊ दिले तो म्हणाला. “ काय घडलं तिथे? ”“ बरंच काही ” पाणिनी म्हणाला. “ राजे नावाच्या त्या घरात राहणाऱ्या एका चा खून झालाय. तो अंथरुणात असतानाच रात्री चाकू ने भोसकून. त्याच्या अंगावर असलेल्या पांघरुणावरूनच त्याला भोसकलय ”“ खुनाचा हेतू ? ” ओजस ने विचारलं.“ परिस्थितीजन्य पुरावा माझ्या अशिलाच्या, विहंग खोपकर च्या विरोधात आहे.”“ तो आहे कुठे अत्ता? ” ओजस ने विचारलं.“ व्यावसायिक कामासाठी बाहेरगावी गेलाय.” पाणिनी म्हणाला.“ तू त्याला पोलिसांसमोर हजर करणार आहेस? ”“ ते इतर अनेक गोष्टीवर अवलंबून राहील.” पाणिनी ...अजून वाचा

9

सायलेन्स प्लीज - प्रकरण 9

प्रकरण 9 पाणिनी त्याच्या केबिन मधे येरझाऱ्या घालत होता.ओजस ने पोलिसांकडून गुप्त पणे तपासाच्या प्रगती विषयी माहिती मिळवली होती. पर्यंत तरी, त्याचं झोपेत चालणे हा तुझ्या बचावाचा एकमेव मुद्दा आहे असं दिसतंय.” ओजस म्हणाला. “ चाकूच्या मुठीवर कोणाचेच ठसे नाही मिळाले.पण दुर्वास मात्र शपथेवर सांगतोय की त्याने विहंग खोपकर ला च पाहिलंय रात्री फिरताना.आणि चंद्राच्या उजेडात स्पष्टपणे.मला असं समजलंय की अगदी पहिल्यांदा दुर्वास ने केलेल्या वर्णना नुसार त्याने फक्त एक आकृती घरा बाहेर झोपेत फिरताना पाहिली होती. आता त्याचं म्हणणं आहे की ती आकृती म्हणजे विहंग च होता.” ओजस पुढे म्हणाला, “ आणि हे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीचे काम आहे ...अजून वाचा

10

सायलेन्स प्लीज - प्रकरण 10

प्रकरण १० पाणिनी पटवर्धन, विहंग विरुध्द शेफाली या दाव्यातील कागदपत्रे तपासात होता तेव्हा सौम्या आत येऊन म्हणाली, “आर्या बाहेर आहे.ती सारखी रडत्ये, झटका आल्या सारखं करत्ये.मला नाही वाटलं की तिला बाहेर जास्त थांबवाव.” “ रडायचं कारण काय तिला?” पाणिनी म्हणाला. “ बहुदा तिच्या मामाला अटक केल्याचा धक्का तिला बसला असावा.” “ मला वाटत नाही तसं, त्याला अटक होईल याचा तिला अंदाज आला तेव्हा ती खंबीर पणे उभी होती.” पाणिनी म्हणाला “ तिच्यावर लक्ष ठेवा पण.म्हणजे जरा काळजीने बोला तिच्याशी नाहीतर काय होईल तिचं सांगता येणार नाही.” –सौम्या “ ठीक आहे सौम्या , पाठव तिला आत. आणि तू ही इथेच ...अजून वाचा

11

सायलेन्स प्लीज - प्रकरण 11

प्रकरण ११ संध्याकाळ होत होती.मोठ्या कार्यालयीन इमारतीत ऑफिस बंद होताना चालू असते तशी गडबड ऐकू येत होती.पॅसेज मधे घरी घाई झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बुटाचे आवाज प्रतिध्वनित होत होते, मधेच लिफ्ट च्या दाराची उघड झाप होत होती. पाणिनी पटवर्धन हे सर्व शांत पणे ऐकत होता.पुढील अर्धातास हे सर्व आवाज एक एक करत विरळ होत गेले आणि पाठोपाठ हा आवाजाचा लोंढा जणू रस्त्यावर अवतरला.आता त्याचे स्वरूप बदलले होते.आता मोटारींचे इंजिन चालू झाल्याचे आणि हॉर्न चे कर्कश्य आवाज येऊ लागले. पाणिनी ला रोजची या आवाजाची सवय होती, त्यातूनही मन एकाग्र करायची त्याला सवय होती.अत्ता सुध्दा त्याच्या ऑफिस मधे तो येरझाऱ्या घालत विचार करीत ...अजून वाचा

12

सायलेन्स प्लीज - प्रकरण 12

प्रकरण 12पाणिनी च्या सुचने प्रमाणे कनक ओजस ने प्रांजल वाकनीस ला पाणिनी च्या ऑफिसात हजर केलं होत ! अत्ता क्षणी ती पाणिनी समोर गुबगुबीत खुर्चीत बसली होती.“ तुला हे विचारायला बोलावलंय की विहंग खोपकर साठी काही करायची इच्छा आहे का? ” पाणिनी म्हणाला..“ अर्थातच.” “ तू निराश दिसतेस ” पाणिनी म्हणाला.“ निराश नाही नाराज आहे.का होऊ नये मी नाराज? अचानक एक माणूस माझ्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो अत्ताच्या अत्ता मी पाणिनी पटवर्धन ना भेटायला जायचं आहे.विचार करायला मला वेळ ही न देता अक्षरश: तो मला गाठोडं उचलल्या सारखं उचलून इथे आणतो याचा काय अर्थ समजायचा मी? ” प्रांजल ...अजून वाचा

13

सायलेन्स प्लीज - प्रकरण 13

प्रकरण 13 “ तुझ्या मामासाठी मला जरा मदत करशील? ” पाणिनी ने आर्या ला विचारलं“ दुनियेतली काहीही ! ” तिने उत्तर दिलं“ पण मला जी मदत अपेक्षित आहे ती जरा नाजुक किंवा अवघड आहे.” पाणिनी म्हणाला.“ म्हणजे कशी? ”“ म्हणजे तू पकडली गेलीस तर अडचणीत येऊ शकतेस.”“ तुमचं काय? मी पकडली गेले तर तुम्ही पण अडचणीत याल? ”“ खूपच ” पाणिनी म्हणाला.“ मग पकडलं जायचंच नाही.” आर्या म्हणाली“ हा विचार एकदम पटला मला ! ”“ बोला तर मग काय करुया? ” आर्या म्हणाली“ आर्या, तुझ्याशी कायद्याबद्दल बोलायचय आणि आणि मी यात नेमका कुठे बसतो हे सांगायचंय ” पाणिनी म्हणाला.तिने ...अजून वाचा

14

सायलेन्स प्लीज - प्रकरण 14

प्रकरण 14 पाणिनी ने खोपकर च्या घराची बेल दाबली.ती दाबताच क्षणी इन्स्पे.होळकर ने दार उघडले.पाणिनीच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. कामावर फार लौकर हजर झालास काय आज? ” त्याला खवळवण्याच्या हेतूने पाणिनी म्हणाला.. “ ही लौकर ची वेळ आहे आणि मी कामावर आहे.” इन्स्पे.होळकर ने उत्तर दिलं. “ काय हवंय तुला इथे? ” “ माझ्या केस च्या दृष्टीने मला साक्षीदारांना प्रश्न विचारायचेत आणि हा परीसर जरा नजरेखालून घालायचाय. तुझी काय हरकत? ” पाणिनी म्हणाला.. “ सरकार पक्षातर्फे साक्षीदारांना समन्स काढलं गेलंय तुला त्यात काही लुडबूड करता येणार नाही.” इन्स्पे.होळकर म्हणाला. “ मी काही छेड छाड करणार नाहीये , फक्त प्रश्न ...अजून वाचा

15

सायलेन्स प्लीज - प्रकरण 15

प्रकरण 15पाणिनी पटवर्धन, पेंढारकर च्या हार्ड वेअर च्या दुकानाचे दार उघडून आत गेला.त्याला पाहून उदित पेंढारकर ला नवलच वाटले. अरे पटवर्धन तुम्ही? ” तो उद्गारला.“ मस्त आहे दुकान तुझं ! ” पाणिनी म्हणाला.“ आवडलं तुम्हाला? बरं वाटलं.” उदित म्हणाला.“ कधी पासून आहे हे दुकान? ”“ फार दिवस नाही झाले. भाडयाने घेतलंय एका कडून. मला आधी इथला जुना माल काढून टाकयचाय. मग नंतर आतली दुरुस्ती, नूतनीकरण करून घ्यायचं आहे.”“ मला वाटलं स्वत:चं आहे दुकान.” पाणिनी म्हणाला.“ भाड्याचे आहे परंतू माझ्या स्वतःच्या खर्चाने काहीही दुरुस्ती करायला परवानगी आहे.”“ कधी करणार सुरुवात? ” पाणिनी म्हणाला..“ लगेचच. सवलतीच्या किंमतीत जुना सगळा माल काढून ...अजून वाचा

16

सायलेन्स प्लीज - प्रकरण 16

प्रकरण १६न्यायाधीश.वज्रम स्थानापन्न झाले होते.धूर्त आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती.त्यांच्या समोर हेरंभ खांडेकर , सरकारी वकील.जाड धाटणीचे.रुंद छाती,जाड मान, ते बसले की उगाचच दोन तीन माणसांची जागा अडवाल्यासारखे बसत. समोर बसलेल्या पाणिनी पटवर्धन कडे ते खाऊ की गिळू नजरेने बघत होते, धावण्याच्या स्पर्धेत आपण कायम पुढे आहोत याची जाणीव असणारा धावपटू ज्या विश्वासाने पळत असतो आणि शर्यत संपत येताना मागून येणारा धावपटू आपल्याला ओलांडून पुढे जातो आणि शर्यत जिंकतो तेव्हा हरणाऱ्याचा चेहेरा कसा होईल तशा चेहेऱ्याने ते पाणिनी कडे बघत होते.त्यांचा सहाय्यक, समीरण भोपटकर त्यांच्या बाजूलाच बसला होता.तो तरुण,शिडशिडीत,होता.आपल्या चष्म्याच्या रिबीन शी बोटाने चाळा करत होता.पटवर्धन ...अजून वाचा

17

सायलेन्स प्लीज - प्रकरण 17

कोर्टातला दिवस चांगला जाऊन सुध्दा पाणिनी बेचैन होता. आपल्या ऑफिसात येरझऱ्या घालत होता. “ काहीतरी गडबड आहे,सौम्या ” “ काय झालंय सर ? ” “ त्या शेफाली खोपकर च काय कळत नाही.” “ सर, तुम्हाला तिच्याकडून काहीच निरोप नाही? ” “ नाही ना ! तुला वाटतंय ना गोरक्ष भेटला असेल तिला म्हणून? ” पाणिनी म्हणाला. “ शंभर टक्के. आधी माझ्याशी तो उर्मटपणे वागत होता, त्रास देत होता, पण जेव्हा मी त्याला शेफाली खोपकर च्या आर्थिक स्थिती बद्दल सांगितलं तेव्हा गरम बटाटा चटका बसल्यावर आपण जसं हातातून टाकतो ना तसंच त्याने मला सोडून दिलं. ” –सौम्या “ दिसायला कसा आहे? ...अजून वाचा

18

सायलेन्स प्लीज - प्रकरण 18 - (शेवटचे प्रकरण)

प्रकरण अठरा शेवटचे प्रकरण “ कोर्टाचं कामकाज कालच्या पुढे आज सुरु करावं.” न्या.वज्रम म्हणाले. “ मला वाटतं दुर्वास याची तपासणी चालू होती ; मिस्टर दुर्वास, असे पुढे या आणि तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे द्या.” दुर्वास पिंजऱ्यात आला.आपल्या साक्षीला विलक्षण महत्व आहे याची जाणीव असल्याने तो जास्तीत जास्त भाव खात होता. “ मला एखाद-दुसरा च प्रश्न विचारायचा आहे.” दुर्वास पिंजऱ्यात येताच पाणिनी म्हणाला. “ मला वाटतंय की काल तुम्ही साक्ष देताना असं म्हणाला होतात की तुमचं अशील मरुद्गण याच्याशी तुम्ही रात्री अकरा वाजता बोललात आणि नंतर झोपायला गेलात. बरोबर ? ” पाणिनी म्हणाला. “ हो साधारण अकराच्या दरम्यान.” ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय