बुद्धिमान बायको

(3)
  • 12.2k
  • 0
  • 6.5k

वैशाख एका फॅक्टरीत मेंटेनेंस मॅनेजर होता, आणि त्या दिवशी सॉलिड चिडला होता. एक महत्वाचं मशीन बंद पडलं होतं. प्रॉडक्शन थांबलं होतं. सगळे प्रॉडक्शन वाले लोकं कोंडाळं करून उभे होते, आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर केंव्हा सुरू होणार हे मशीन असा प्रश्न होता. फॉल्ट तर कळला होता, पण तो दुरुस्त करण्यासाठी जो पार्ट लागणार होता, तो फॅक्टरीच्या स्टोअर मधे उपलब्ध नव्हता. आता अश्या परिस्थितीत मशीन सुरू कसं होणार, हा यक्ष प्रश्न होता. प्रॉडक्शन मॅनेजरने जाऊन जनरल मॅनेजरला परिस्थितीची जाणीव करून दिली. साहेब ताबडतोब मशीनपाशी आले. “काय झालं वैशाख?” साहेबांनी विचारलं. वैशाख आधीच वैतागला होता, त्यात एकेरी नावाने कोण बोलतेय या विचाराने त्याने रागानेच वळून पाहिलं. समोर साहेबांना पाहून त्याने राग आवरला. “मशीनचा ब्रेकडाऊन झालाय, आणि पार्ट आपल्या कडे नाहीये.” – वैशाख. “मग आता?” – साहेब.

1

बुद्धिमान बायको - भाग १

बुद्धिमान बायको भाग १ वैशाख एका फॅक्टरीत मेंटेनेंस मॅनेजर होता, आणि त्या दिवशी सॉलिड चिडला होता. एक महत्वाचं मशीन पडलं होतं. प्रॉडक्शन थांबलं होतं. सगळे प्रॉडक्शन वाले लोकं कोंडाळं करून उभे होते, आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर केंव्हा सुरू होणार हे मशीन असा प्रश्न होता. फॉल्ट तर कळला होता, पण तो दुरुस्त करण्यासाठी जो पार्ट लागणार होता, तो फॅक्टरीच्या स्टोअर मधे उपलब्ध नव्हता. आता अश्या परिस्थितीत मशीन सुरू कसं होणार, हा यक्ष प्रश्न होता. प्रॉडक्शन मॅनेजरने जाऊन जनरल मॅनेजरला परिस्थितीची जाणीव करून दिली. साहेब ताबडतोब मशीनपाशी आले. “काय झालं वैशाख?” साहेबांनी विचारलं. वैशाख आधीच वैतागला होता, त्यात एकेरी नावाने कोण बोलतेय ...अजून वाचा

2

बुद्धिमान बायको - भाग २

बुद्धिमान बायको भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा ........ “मी स्टोअर चं ट्रेनिंग घेणार आहे चार दिवस. मग स्टोअर कसं अप टु डेट करतो ते.” – वैशाख. “अरे पण तुझं डिपार्टमेंट कोण सांभाळेल?” – साहेब. “चिंता करू नका साहेब, सगळे ट्रेंड आहेत. आणि मी आहेच अव्हेलेबल तशीच जरूर पडली तर. मी काही बाहेर गावी जात नाहीये.” – वैशाख. “ओके” – साहेब. “तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहात? कुठे? आधी बोलला नाही?” – ललना. “ट्रेनिंगच घेणार आहे, पण घरीच. आणि तूच देणार आहेस.” – वैशाख. “शेवटी बायकोच सापडते ना चेष्टा करायला? नसेल सांगायचं तर नका सांगू.”-ललना “नाही नाही, तू समजते आहेस ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय