तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. स्पर्धा लवकर सुरु होत नव्हती म्हणून मी आणि माझा मित्र PJ मारत बसत होतो .... कुठल्यातरी जोकवर तिला ही हसू आवरलं नाही.. तीने उगाचच एकूण किती स्पर्धक आलेत हे बघण्यासाठी मागे वळून बघितलं आणि मान वळवताना हळूच नजरेच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघितलं. (भौ, पोरींचं हे नजरेच्या कोपऱ्यातून बघणं फार भारी असतं राव... भलेभले निकामी होतात.) तो पर्यंत ती दिसते कशी हे ही मला माहित नव्हतं. फक्त समोर कोणीतरी आपले माणूस बसलयं ह्याची जाणीव / संवेदना फार आतून होत होती.
भेट - ( भाग - १ )
तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. स्पर्धा लवकर सुरु होत नव्हती म्हणून मी आणि मित्र PJ मारत बसत होतो ....कुठल्यातरी जोकवर तिला ही हसू आवरलं नाही..तीने उगाचच एकूण किती स्पर्धक आलेत हे बघण्यासाठी मागे वळून बघितलं आणि मान वळवताना हळूच नजरेच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघितलं.(भौ, पोरींचं हे नजरेच्या कोपऱ्यातून बघणं फार भारी असतं राव... भलेभले निकामी होतात.)तो पर्यंत ती दिसते कशी हे ही मला माहित नव्हतं.फक्त समोर कोणीतरी आपले माणूस बसलयं ह्याची जाणीव संवेदना फार आतून होत होती.स्पर्धा संपल्यावर ती स्वतःहून माझ्याकडे येऊन म्हणाली, तू छान बोलतोस. पण तू तर न बोलताच जिंकलस ...अजून वाचा
भेट - ( भाग - २ )
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बक्षीसमारंभ होता पण आम्ही मात्र सकाळपासून कोकणातलं निसर्गसौंदर्य, नागपूरचा उन्हाळा, हापूस आंबे, संत्री..... असल्या विषयांवर गप्पा होतो. साधारणपणे 9.30-10 वाजता मी आमच्या संघांबरोबर बक्षीस समारंभाच्या ठिकाणी पोहचलो. तिकडे व्यासपीठावर नमस्कार -चमत्काराची भाषणं सुरु होती आणि मी शेवटच्या रांगेत बसून नॉनस्टॉप चॅट करत होतो." आदित्य, तुला निकालाची भिती वाटत नाही का ? मला तर अजूनही काही खरं वाटत नाही आमच्या संघाचं ... तिच्या या प्रश्नावर प्रभु वक्त्यांसारखा मी पण एक इंग्रजी कोटेशन तिला ऐकवलं.'गप ना रे... स्पर्धा संपली आहे ना आता ? कशाला उगाचच ....या तिच्या रिप्लायला मी' ह्या ह्या ह्या'.. एवढाच रिप्लाय दिला.यथावकाश निकाल जाहीर झाला. ...अजून वाचा
भेट - ( भाग - ३ )
शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलोस्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर phone सायलेंट करून ठेवला होता.बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय एवढाच आला.पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला.Call me एवढीच अक्षरं होती.कॉल केला.' आदि ..''बोल बाळा..!' मला कळत नाहीये '' काय '?' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते''का'?' मला विचारच करता येत नाहीये.... म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked'' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस... वेळ जाऊ दे की ... Take your own time'' ...अजून वाचा