भेट - ( भाग - १ ) mahendr Kachariya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

भेट - ( भाग - १ )

तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. स्पर्धा लवकर सुरु होत नव्हती म्हणून मी आणि माझा मित्र PJ मारत बसत होतो ....


कुठल्यातरी जोकवर तिला ही हसू आवरलं नाही..


तीने उगाचच एकूण किती स्पर्धक आलेत हे बघण्यासाठी मागे वळून बघितलं आणि मान वळवताना हळूच नजरेच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघितलं.


(भौ, पोरींचं हे नजरेच्या कोपऱ्यातून बघणं फार भारी असतं राव... भलेभले निकामी होतात.)


तो पर्यंत ती दिसते कशी हे ही मला माहित नव्हतं.


फक्त समोर कोणीतरी आपले माणूस बसलयं ह्याची जाणीव / संवेदना फार आतून होत होती.


स्पर्धा संपल्यावर ती स्वतःहून माझ्याकडे येऊन म्हणाली, " तू छान बोलतोस."


" पण तू तर न बोलताच जिंकलस मला राणी. मी (स्वगत)


वादविवाद स्पर्धा संपली होती पण रिझल्ट 2 दिवसांनी लागायचा होता आणि दुसऱ्या दिवशी वक्तृत्व असल्यामुळे त्याचीही तयारी बाकी होती.


संध्याकाळी सहज भटकायला म्हणून विद्यापीठाच्या आवारात मित्राबरोबर आलो होतो.


डिबेट चा संभाव्य निकाल काय असेल यावर आमची चर्चा चालू होती. तेवढ्यात ती समोरून येताना दिसली, तिच्याबरोबर तिची डिबेट पार्टनर होती. सकाळची ओळख ताजी असल्यामुळे एकमेकांना हात दाखवून हाय हॅलो करून झालं.


मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. एकमेकांशी विद्यापीठं विचारून झाली.


'कधीतरी ये आमच्या गावाला, संत्री फार सुरेख मिळतात तिकडे' ती.


" आता चिपळूण ते नागपूर एकूण प्रवास मोजला तर चिपळूणात संत्री स्वस्त मिळतात या टिपीकल" कोब्रा - देब्रा " विचाराने मी तो विचार तसाच बाजूला ठेवला. मग आम्ही चौघे जणं एकत्रच फिरत होतो.


मधे आम्हाला सकाळच्या वाद-विवाद स्पर्धेचे परिक्षक भेटले.


त्यांनी डिरेक्ट रिझल्ट न सांगताही तूम्ही आनंदाने घरी जाल, तुम्हाला पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करायला हवा " असं सांगत indirectly रिझल्ट सांगून टाकलेला होता.


पण नंतर ते परिक्षक फार बोर करायला लागले म्हणून आम्ही एकमेकांना खुणावत तिथून पद्धतशीरपणे सटकलो.


पुढचा बराच वेळ आम्ही एकमेकांशी बोलण्यात घालवला होता.


खरं सांगू, आजूबाजूला एवढे सगळेजण होते पण माझं पुर्ण लक्ष बाकीच्या फ्रेम्स ब्लर करून फक्त तिच्यावरच एकवटलं होतं.


तेवढ्यात तिच्या मॅडमनी त्यांना हाक मारली आणि ती तशीच निघून गेली.


रात्री दुसऱ्या दिवशीच्या वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीपेक्षा******


लक्ष कुठं होतं तुझं, तिच्याशी बोलताना ? सर बघत होते आपल्याकडे ******** या मित्राच्या शिव्या खाण्यातच जास्त वेळ गेला.


स्पर्धेची तयारी किती झाली माहित नाही पण झोपताना डोळे बंद केल्यावरही तिचाच चेहरा समोर येत होता.


आणि अखेर विरहाचा दिवस उजाडला.


आज माझा फक्त वक्तृत्वाचा इव्हेंट असल्यामुळे मी तसा निवांत होतो. सकाळी 9.30 ला स्पर्धा सुरु झाली, 12 ला संपूनही गेली. ती ही स्पर्धेला आली होती. स्पर्धा संपल्यावर हसत खेळत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बोलता बोलता कळलं की ती आज रात्रीच निघून जाणार आहे. एकदा वाटलं सांगावं तिला की please जाऊ नकोस पण परत विचार आला आपण कोणत्या अधिकाराने तिला हे सांगतोय ?


या सगळ्या विचारात तिचा नंबर घ्यायचा राहूनच गेला.


पुढचे 3-4 तास फार बेचैनीत घालवले.


संध्याकाळी आमच्या विद्यापीठाची एकांकिका असल्यामुळे त्याच्या तयारीला बाकीच्यांबरोबर गेलो.


वाटतं होतं या पुढे ती कधीच दिसणार नाही, भेटणार नाही.


एकदा तर मधेच सगळ्यांची नजर चुकवून तिला भेटून यावं असाही विचार आला मनात पण महत्प्रयासाने पुढच्या संभाव्य परिणामांचा विचार करून तो टाळला. पण एकांकिका झाल्यावर सेट परत नेत असताना अचानक तिची हाक ऐकू आली.


वळून बघितलं तर ती माझ्याकडेच येत होती.


आदित्य, "मी आज रात्री चालल्ये "...


परत कधी भेटणार ?


"माहित नाही."


नंबर मिळेल का तुझा ?


हो... पण कसा देऊ? माझ्याकडे कागद नाहीये.


माझा पण फोन रूमवर आहे. थांब... असं म्हणून मी बाजूला असलेल्या एका माणसाकडून पेन घेतलं आणि माझा डावा हात पुढे केला. (कारण उजव्या हातात खांद्यावर मोडा पकडलेला होता)


तिने नंबर लिहीला आणि बाय... बोलू फोनवर ..!! म्हणून निघून गेली.


तीची आणि माझी ती शेवटची भेट .... वर्ष 2012 ...


मी लिहीलेला नंबर पुसू नये यासाठी जमेल तसं एका हाताने मोडा उचलून आणला. विद्यापीठातून गुरुद्वारात आमच्या रुम मधे जाई पर्यंत किमान हजार वेळा तरी तो नंबर मनातल्या मनात म्हणला होता.


रूममधे आल्यावर डायरीत तो नंबर लिहून ठेवला आणि फोनमधे सेव्ह ही करून ठेवला.


आता ती कायम संपर्कात रहाणार या विचाराने फार शांत झोप लागली मला त्या रात्री...


दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फोन केला तर तिच्या आईने तो उचलला होता. मी त्यांना नमस्कार वगैरे करून ती उठल्यावर फोन करायला सांगा असा निरोप देऊन फोन ठेवून दिला......


त्यानंतर आजपर्यंत आम्ही फक्त फोन वर बोललोय .....


भेटण्याची अनिवार इच्छा आहे, ओढ आहे पण मुहूर्त काही साधता आला नाहीये आतापर्यंत.... ना तिला ना ही मला .....


मध्यंतरी ब-याच गोष्टी होऊन गेल्या....


असो ....


पण तिची आठवण आणि ती..... तिला पहिल्यांदा बघितल्यापासून ते शेवटच्या भेटीपर्यंत अगदी आहे तशी मनात कोरली गेली आहे......


बघू..... या पुढे काय होतं ते


क्रमशः