भेट - ( भाग - २ ) mahendr Kachariya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

भेट - ( भाग - २ )

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बक्षीसमारंभ होता पण आम्ही मात्र सकाळपासून कोकणातलं निसर्गसौंदर्य, नागपूरचा उन्हाळा, हापूस आंबे, संत्री..... असल्या विषयांवर गप्पा मारत होतो. साधारणपणे 9.30-10 वाजता मी आमच्या संघांबरोबर बक्षीस समारंभाच्या ठिकाणी पोहचलो. तिकडे व्यासपीठावर नमस्कार -चमत्काराची भाषणं सुरु होती आणि मी शेवटच्या रांगेत बसून नॉनस्टॉप चॅट करत होतो.


" आदित्य, तुला निकालाची भिती वाटत नाही का ? मला तर अजूनही काही खरं वाटत नाही आमच्या संघाचं ... तिच्या या प्रश्नावर प्रभु वक्त्यांसारखा मी पण एक इंग्रजी कोटेशन तिला ऐकवलं.


'गप ना रे... स्पर्धा संपली आहे ना आता ? कशाला उगाचच ....या तिच्या रिप्लायला मी' ह्या ह्या ह्या'.. एवढाच रिप्लाय दिला.


यथावकाश निकाल जाहीर झाला. तिला वादात तर मला वक्तृत्वात बक्षीस मिळालं होतं. एकमेकांना अभिनंदन वगैरे करून मी तेवढ्यापुरता आमचा संवाद थांबवला.


रात्री संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टी


अरेंज करण्यात आली होती. मी पार्टीला चाललो आहे या माझ्या मेसेज चा रिप्लाय तिने' Do you buzz ?' असा प्रश्न विचारून केला होता. त्यावेळी माझा इंग्रजीचा घोडा 90% लंगडा असल्यामुळे तिच्या या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यायचं असा प्रश्न मला पडला, पण पार्टी - सेलीब्रेशन या दोन शब्दांच्या रांगेत Booze हा शब्द बसवल्यावर बहुतेक दारुकामाबद्दल ही विचारत असावी या अंदाजाने मी नाही असा रिप्लाय करून मोकळा झालो. (पहिल्याच भेटीत वाईटपणा का घ्यावा ह्या विचारामुळे)


माझ्या त्या रिप्लायला तिची गोड हसणारी स्मायली मी रिप्लाय बरोबरच केला होता हे सांगून गेली पार्टी आटपल्यावर मोबाईल चेक केला तर काहीच मिनीटांपूर्वी तिचा गुड नाईट चा मेसेज आला होता. मी रिप्लाय न देताच झोपून गेलो.


रात्री 2 वाजता मधेच उठून" आपकी आँखो में कुछ मेहेके हुए से राज है" अशा ओळी टायपून गुड नाईट म्हणून मी डाराडूर झालो. सकाळी उठल्यावर' आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है' हा तिचा मेसेज वाचला आणि स्वतःशीच हसलो. पोर हुशार आहे असं म्हणून निवांतपणे आवराआवर करायला सुरुवात केली.


मुंबईत पोहचेपर्यंत आम्हा दोघांना एकमेकांच्या ब-याचशा आवडी-निवडी कळल्या होत्या वाचन, cooking, आणि प्रवासाची आवड 100% जुळली होती. जसजसे दिवस पुढे जात होते तसतसं मेसेजींगचं प्रमाणही वाढत गेलं. दिवसभरात कोणत्याही वेळी एकमेकांना मेसेज करण्याएवढं नातं तयार होणं माझ्या दृष्टीने प्रेम या कल्पनेची पहिली पायरी होती.


त्यात नांदेडच्या स्पर्धेचे फोटो मिळाल्यावर मी जाम खुश होतो, कारणही तेवढंच महत्वाचं होतं. त्या पत्रकाराने पेपरात माझा आणि तिचा फोटो बाजूबाजूला ठेवला होता. तिच्याशी भरपूर बोलायला मिळावं म्हणून इतरांना मेसेज पाठवणं बंद केलं कारण दिवसाला 200 मेसेजची असणारी मर्यादा.


पिल्लू, बाबू, शोना वगैरे कधीच करावंस वाटलं नाही किंबहुना केलं ही नाही पण आज तुला खूप miss केलं एवढ्या छोट्या मेसेज मधूनही हवा तो संदेश पोहचत होता.


डिसेंबर उजाडला आणि स्पर्धांचा मौसम पुन्हा जोमाने सुरू झाला. नागपूरच्या रखरखीत उन्हात स्पर्धा करण्याबरोबरच कधीतरी पुण्या - मुंबईच्या स्पर्धेतही आपलं दर्शन घडावं, या मेसेज ला तू फक्त स्पर्धा सांग मी पोहचेन या मेसेजला मी तिला 5-6 स्पर्धांच्या details लगेचच दिल्या होत्या.


पुण्याच्या एका वादस्पर्धेत भेटण्याचं ठरलं तेव्हा आदि, आपण दोघं पार्टनर होऊया का स्पर्धेत?" या तिच्या प्रश्नावर मी स्पर्धा संयोजकांना फोन करून दुसऱ्या महाविद्यालयाचा पार्टनर निवडला तर चालेल का हे विचारून मोकळा ही झालो. दुर्दैवाने नियम आड आले आणि स्वप्न स्वप्नंच राहिलं.


15 डिसेंबरचा दिवस होता. रत्नागिरीला एका स्पर्धेत होतो. फोन वाजला, तिचा मेसेज आला होता.


8-10 फळांची नावं होती आणि प्रत्येक फळासमोर एक तिच्याबद्दल मला काय वाटतं असा एका ओळीचा संदेशही होता.


For example


Orange - you are beautiful. I like your smile.


Blackberry you are kind.


Watermelon - you need to improve your personality.


Mango I love you.


Reply asap असं खाली लिहिलं होतं.


पुढची पाच मिनिटं माझ्या दृष्टीने म्हणजे उत्स्फुर्त फेरीत आपल्याला आवडणारा, पट्टीतला विषय यावा पण आयत्यावेळी आपण ब्लॅन्क व्हावं अशी काहीशी होती. पण मी धीर करून रिप्लाय केला आणि


क्रमशः


• महेंद्र काचरिया