शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णा म्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते स्वप्न मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता. बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली. पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली. पुण्यात कोणत्या कॉलेजला जायचे हॆ आधी ठरवले नव्हते.बारावीत गट्टी झालेल्या आम्हा पाचसहा मित्रांनी एकत्र येऊन आम्ही कर्वे रोडवर असलेल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.राजेंद्र ढवळे, विकास लोंढे आणि बाकी दोन मित्र कॉलेज जवळच्या हॉस्टेलला रहाणार होते.त्यांच्या बरोबर रहायची इच्छा असली तरी माझ्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे मला ते शक्य नव्हते.

1

चाळीतले दिवस - भाग 1

चाळीतले दिवस भाग 1शिक्षणासाठी पुण्यात माझ्यापेक्षा मोठ्या बंधूकडे, (त्याला मी आण्णाम्हणायचो) यायचे माझे स्वप्न होते.माझ्या दहावीनंतर दोन वर्षे ते मला हुलकावणी देत होते.आण्णा त्यावेळी एका नामांकित बांधकाम क्षेत्रातल्या कंपनीत नोकरीला होता.बारावी झाल्यानंतर मात्र ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत असतानाच आण्णाला कंपनीच्या वतीने कुवेतला जाण्याची संधी मिळाली.तिकडे जाताना त्याने माझ्यावर त्याची नागपूर चाळीत असलेली झोपडीवजा खोली सोपवली.पुण्यात येरवडा जेल जवळच्या नागपूर चाळीत माझी रहायची सोय झाली.पुण्यात कोणत्या कॉलेजला जायचे हॆ आधी ठरवले नव्हते.बारावीत गट्टी झालेल्या आम्हा पाचसहा मित्रांनी एकत्र येऊन आम्ही कर्वेरोडवर असलेल्या गरवारे कॉलेजला प्रवेश घेतला.राजेंद्र ढवळे, विकास लोंढेआणि बाकीदोन मित्रकॉलेज जवळच्याहॉस्टेलला रहाणार होते.त्यांच्या बरोबर रहायची इच्छा असली ...अजून वाचा

2

चाळीतले दिवस - भाग 2

भाग 2त्या काळी कॉलेजमधून घरी आलो की अभ्यासाव्यतिरिक्त करण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते.वस्तीतल्या अनेक मुलांशी ओळख झाली होती.नित्यनेमाने संध्याकाळी रस्त्यावर असलेल्या मंडळाच्या पोरांच्यात गप्पा मारत उभे राहणे हाच माझा एकमेव टाईमपास होता.तिथे भेटलेल्या मुलांशी नंतर माझी छान मैत्री झाली. शिर्के बंधुबरोबरच बाळू नितनवरे,आसिफ पठाण,सुरेश गायकवाड,आल्फ्रेड सायमन, चंदू घोलप, अशोक कांबळे, सदा निकम नाना निकम असे वीस पंचवीस मित्र माझ्याशी जोडले गेले. यातले बरेचजण अर्धशिक्षित होते.काहीजण वर्कशॉपमधे छोटीमोठी कामेकरत.कुणी रिक्षा चालवायचे.एकाची पानटपरीहोती तर एकाचे किराणा मालाचे दुकान होते.त्यातल्या त्यात आमच्या या मित्रांमध्ये आल्फ्रेड सायमन हा अव्हेरी इंडिया सारख्या नामांकित कंपनीत नोकरी करायचा,यातले अनेकजण बेकार होते.काहीजण नियमितपणे दारूही पीत असत.अनेकांची लफडी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय