दुष्ट चक्रात अडकलेला तो

(2)
  • 1.8k
  • 0
  • 570

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला जातो. सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो.

1

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 1

सकाळची कोवळी किरणे अभिमन्यूच्या चेहऱ्यावर पडताच त्याला जाग येते. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे रूप डोळ्यांत साठवून अभिमन्यू अंघोळीला सगळं काही आवरून तो खाली देवघरात जातो. अभिमन्यू आणि त्याच्या आईची स्वामी समर्थांवर श्रद्धा होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो स्वामी समर्थांच्या नाम जपाला बसतो. अजित : नाश्ता झाला आहे का ग? आणि अभी उठला का ? आरती : हो...उठून नाम जपाला बसला आहे... त्याचं आवरलं की सगळे एकत्रच बसू नाश्ता करायला... अजित : बर तोवर मला चहा तर दे... आरती : हो आणते... अजित : आज मला यायला उशीर होईल ग.... आरती : का अहो ? अजित : अगं तो चारुदत्त ...अजून वाचा

2

दुष्ट चक्रात अडकलेला तो - भाग 2

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीचा दिनक्रम आटोपून अभिमन्यू कॉलेजमध्ये येतो. तो त्याची बुलेट पार्क करत असतानाच तिथे विनिता येते.विनिता : मॉर्निंग सर...अभिमन्यू : गुड मॉर्निंग...आज चक्क तू लवकर आली आहेस कॉलेजला...गुड...अशीच वेळेवर येत जा...विनिता : हो सर, मला तुम्हाला विचारायचं होत सर की तुम्ही शिकवणी घेता का ?अभिमन्यू : मी खाजगी शिकवणी घेत नाही...माझ्याकडे तेवढा वेळ नाही... तुला काही अडचण असेल तर वर्ग सुरू असताना विचारत जा किंवा मग कॉलेज संपल्यावर ये... पण मी २ पर्यंतच असतो इथे...विनिता : पण सर शिकवणीचा चांगला पर्याय आहे ना...पैसे ही अधिक मिळतात... आणि विद्यार्थ्याला नीट शिकून घेता येतं...अभिमन्यू : मला अधिकच्या पैशांची हाव ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय