सावरखेडच्या वेशीवर तांबडं फुटलं होतं. राघू-मैनांच्या किलबिलाटानं शिवाराला जाग आली होती. पुण्यातून येणारी लालपरी (एसटी) खडखडचा आवज करत गडगडत वेशीपाशी थांबली आणि धुराचा लोट सोडून निघून गेली. तेव्हा त्या बस चा दरवाजा उघडून, धुरळ्यातून बाहेर पडला तो आशिष. हातातली बॅग सावरत त्यानं गावातल्या वेशीवरच्या मातीला स्पर्श करत, त्या मातीचा टिळा आपल्या कपाळी लावला आणि आपल्या गावच्या मातीत पाऊल ठेवल्या बरोबर एक खोल श्वास घेतला. "पाच वर्षं झाली... पण मातीचा हा वास पुण्यातल्या सेंटमध्ये कुठं सापडणार?" तो स्वतःशीच पुटपुटला.
धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1
धुनी "अंधारलेल्या प्रकाशवाटा"(कांदबरी) - प्रकरण १सावरखेडच्या वेशीवर तांबडं फुटलं होतं. राघू-मैनांच्या किलबिलाटानं शिवाराला जाग आली होती. पुण्यातून येणारी लालपरी खडखडचा आवज करत गडगडत वेशीपाशी थांबली आणि धुराचा लोट सोडून निघून गेली. तेव्हा त्या बस चा दरवाजा उघडून, धुरळ्यातून बाहेर पडला तो आशिष. हातातली बॅग सावरत त्यानं गावातल्या वेशीवरच्या मातीला स्पर्श करत, त्या मातीचा टिळा आपल्या कपाळी लावला आणि आपल्या गावच्या मातीत पाऊल ठेवल्या बरोबर एक खोल श्वास घेतला. "पाच वर्षं झाली... पण मातीचा हा वास पुण्यातल्या सेंटमध्ये कुठं सापडणार?" तो स्वतःशीच पुटपुटला.त्यानं लॅपटॉपची बॅग खांद्यावर नीट केली. गावात शिरताना त्याला जाणवलं की रस्ते सिमेंटचे झालेत खरे, पण गटारं तुंबलेलीच ...अजून वाचा
धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 2
रात्रीचे दोन वाजले होते. सावरखेडच्या जुन्या वाड्याच्या ओसरीवर एक छोटा पिवळा दिवा लुकलुकत होता. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली ज्याचा आवाज वाड्याच्या कौलांवर एक वेगळंच संगीत निर्माण करत होता. आशिष आपल्या लॅपटॉपसमोर बसला होता, त्याचे डोळे स्क्रीनवरच्या आकड्यांवर आणि कोडींगवर खिळले होते. बाजूलाच सत्यजित जमिनीवर सतरंजी टाकून ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे मनन करत होता."सत्या... हे बघ," आशिषने अचानक लॅपटॉप त्याच्याकडे वळवला. "मी सखाराम काकांच्या जमिनीचा डिजिटल मागोवा (Trace) घेतलाय. ज्या 'डिजिटल सिग्नेचर'चा वापर करून जमिनीचे हस्तांतरण झाले आहे, ती सिग्नेचर सखाराम काकांची नाहीच. ती एका डमी फोल्डरमधून तयार करण्यात आली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट... हा सर्व डेटा तहसील कार्यालयातील कॉम्प्युटरवरून ...अजून वाचा