रानभूल भाग १( काही दिवसांपूर्वी गोवा फोंडा येथील पाच मुले दोडामार्ग विर्डी येथल्या घनदाट जंगलात वाट चुकली होती.रात्री त्यांची सुटका पोलीसांनी केली होती.या घटनेवर आधारित ही गूढ रम्य थरारक दिर्घ कथा आहे.यातील नावे खरी नसून घटना कल्पनेने उभ्या केल्या आहेत. चुकून साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) " रोशन,बघ ना घरी फोन लागतो का?"मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली." मघा पासून पन्नास वेळा प्रयत्न केला...रेंज नाही. पण या गडबडीत चार्जिंग दहा टक्क्यांवर आलंय." रोशन उदासवाणा होत म्हणाला." घरी गोंधळ उडाला असेल. फोन करत असतील."मनस्वीच्या डोळ्यात खरेखुरे अश्रू उभे ठाकले. आकाश हळूहळू गहिरे होत चालले होते.अंधार वेगाने आपले साम्राज्य पसरवत होता. घरट्यांकडे परतलेल्या पक्ष्यांचे सुस्तावलेले श्वास वाऱ्यात मिसळून दूरवर जात होते.नदीचं पाणी आता काळसर होत चाललं होत. रातकिड्यांचा कर्कश आवाज परीसरात घमू लागला होता." कोणाकतरी फोन लागता काय बघ."मनवेल नासीरला म्हणाला." ना रे,माझ्या मोबाईलान ओन्ली तीन पर्सेंट बॅटरी आसली." नासिर निराश होत म्हणाला." उदय, सव्वासात झाले. आता दिसायचं पण बंद झालं.तू बघ जरा प्रयत्न करून.

1

रानभूल - भाग 1-2

रानभूल भाग १( काही दिवसांपूर्वी गोवा फोंडा येथील पाच मुले दोडामार्ग विर्डी येथल्या घनदाट जंगलात वाट चुकली होती.रात्री त्यांची पोलीसांनी केली होती.या घटनेवर आधारित ही गूढ रम्य थरारक दिर्घ कथा आहे.यातील नावे खरी नसून घटना कल्पनेने उभ्या केल्या आहेत. चुकून साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) " रोशन,बघ ना घरी फोन लागतो का?"मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली." मघा पासून पन्नास वेळा प्रयत्न केला...रेंज नाही. पण या गडबडीत चार्जिंग दहा टक्क्यांवर आलंय." रोशन उदासवाणा होत म्हणाला." घरी गोंधळ उडाला असेल. फोन करत असतील."मनस्वीच्या डोळ्यात खरेखुरे अश्रू उभे ठाकले. आकाश हळूहळू गहिरे होत चालले होते.अंधार वेगाने आपले साम्राज्य पसरवत होता. घरट्यांकडे परतलेल्या पक्ष्यांचे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय