रानभूल - भाग 1-2 Balkrishna Rane द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रानभूल - भाग 1-2

रानभूल  भाग १( काही दिवसांपूर्वी गोवा फोंडा येथील पाच मुले दोडामार्ग विर्डी येथल्या घनदाट जंगलात वाट चुकली होती.रात्री त्यांची सुटका पोलीसांनी केली होती.या घटनेवर आधारित ही गूढ रम्य थरारक दिर्घ कथा आहे.यातील नावे खरी नसून घटना कल्पनेने उभ्या केल्या आहेत. चुकून साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

  " रोशन,बघ ना घरी फोन लागतो का?"मनस्वी रडवेल्या आवाजात म्हणाली." मघा पासून पन्नास वेळा प्रयत्न केला...रेंज नाही. पण या गडबडीत चार्जिंग दहा टक्क्यांवर आलंय." रोशन उदासवाणा होत म्हणाला." घरी गोंधळ उडाला असेल. फोन करत असतील."मनस्वीच्या डोळ्यात खरेखुरे अश्रू उभे ठाकले.   आकाश हळूहळू गहिरे होत चालले होते.अंधार वेगाने आपले साम्राज्य पसरवत होता. घरट्यांकडे परतलेल्या पक्ष्यांचे सुस्तावलेले श्वास वाऱ्यात मिसळून दूरवर जात होते.नदीचं पाणी आता काळसर होत चाललं होत. रातकिड्यांचा कर्कश आवाज परीसरात घमू लागला होता." कोणाकतरी फोन लागता काय बघ."मनवेल नासीरला म्हणाला." ना रे,माझ्या मोबाईलान ओन्ली तीन पर्सेंट बॅटरी आसली." नासिर निराश होत म्हणाला." उदय, सव्वासात झाले. आता दिसायचं पण बंद झालं.तू बघ जरा प्रयत्न करून. बॅटरी किती पर्सेंट उरालीसा?"रोशनने उदयला सांगितले." फिफ्टीन पर्सेंट !"" अरे आता ,हेका तेका फोन लावण्या पेक्षा पोलिसांक फोन लावया."  रोशनने सुचवलं. " तसच केलेल बर."  मनस्वी उदासपणे म्हणाली." उदय, आजूबाजूक फिरान बघ , नेटवर्क मिळता काय ता."मनवेलने सुचवले.उदय फोन घेऊन समोरच्या उंचवट्यावर गेला खरं तर आता आजूबाजूला जायला त्याला भिती दिसत होती.पायाखाली व्यवस्थित दिसत नव्हते. घाबरतच तो उंचवट्यावर चढला होता.मोबाईल हातात घेऊन तो इकडेतिकडे फिरवत होता.अचानक त्यांचे डोळे लकाकले.बीएसएनएल नेटवर्कची एक कमी जास्त होणारी काडी दिसली.उदयने आपत्कालीन मदतीचा फोन नंबर ११२ डायल केला. सुरुवातीला फोन लागेना. पण उदयने प्रयत्न चालू ठेवले.अखेर रिंग झाली." हॅलो... हॅलो....""..........."पलीकडून कोणच बोलेना.फक्त खरंखर चालू होती.उदयला फोन फेकून द्यावासा वाटला. तेवढ्यात रेंज गेली व फोन डिस्कनेक्ट झाला. खालून आशेने बघणारे सारेजण सुसकारले.सगळ्यांनीच काही क्षण डोळे बंद केले .त्यांचे चेहरे रडवेले झाले होते. आता पुढे काय  या विचाराने त्यांचे मन हादरले होते. हे घनदाट वर्षावन--- प्रकाश गिळून टाकत चाललेला अंधार..आजूबाजूलाकोण दबा धरून बसला असेल सांगता येत नव्हते. मोबाईलला रेंज मिळत नव्हती. चार्जिंग संपत चालले होते . बॅटरी नाही तर रात्रभर राहायचं कस ? सगळे प्रश्नफेर धरून भोवताली नाचत होते." ओ...गॉड !" मनस्वीने दोन्ही हातांनी डोके ठोकले. "  रडतंय कित्ये ?  गॉड हेल्प करतोलो.आपण घट रवाक होया." मनवेलने धीर दिला.तेवढ्यात उदयच्या मोबाईलची रिंग वाजली. " या...यां..." सगळेच उठून उभे राहिले." हॅलो... हॅलो.... " उदय जवळपास किंचाळला.पण पलिकडून काहीच ऐकू येईना. काही वेळ हॅलो.. हॅलोतच गेला. उदयच्या चेहे-यावर घनघोर निराशा पसरली.सगळ्यांनी हात जोडून देवाची प्रार्थना केली.अखेर पलिकडून आवाज आला. " कौन बोल रहा है ? आप कौनसी मुसीबत मे है?"कुणीतरी विचारलं.उदयने सुरुवातीलाच फोन स्पीकरवरठेवला होता." हम पांच युवा... दोडामार्गके विर्डीके जंगलमे फंसे है|"" दोडामार्ग कहॉं है ?"नासीरने उडी मारत उदयकडचा फोन खेचला." साहब, हम घनघोर जंगलमे फस गये है! रास्ता नहींमिल रहा है|दोडामार्ग, महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले हे है|"" आप सब जहाॅं हो वही रूको...हम नागपूरसे बोल रहे है|जल्द ही हम सिंधुदुर्ग पुलिससे कॉन्टॅक्ट करेंगे| डरो मतजल्द ही आपको मदद मिलेगी |"फोन डिस्कनेक्ट झाला.आशेचा किरण दिसला होता.सगळे थोडे रिलॅक्स झाले होते. पण एक प्रश्न होताच.हजार किलोमीटरवरच्या नागपूरला फोन लागला होता.तिथून सगळी सूत्रे हलून मदत मिळेपर्यंत किती वेळ जाईल हे सांगता येत नव्हते.तोपर्यंत सुखरुप राहू की नाही हे ही सांगता येत नव्हते.काही क्षणांपूर्वी झालेला आनंद हळूहळू ओसरू लागला होता.पण या पाच मुलांना माहीत नव्हते की पाठीमागे कोणीतरी उभं होतं आणि मंद हसत होत.ते हसणं वा-याच्या झुळकी सारखं त्यांच्या अंगावरून पुढे गेलं.--------*****---------*******-----------***"--- गोवा येथील फोंडा ज्युनिअर कॉलेजची  सतरा  - अठरा वर्षांच्यां मुलांनी ट्रिप काढायची ठरवली.  परीक्षा संपल्या होत्या.रिझल्ट यायचा होता.गोवा-महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या विर्डी गावातल्या वज्रासखैल धबधब्यावर जायचं ठरलं.महिना एप्रिलचा...रणरणत ऊन...!विर्डी गांव ...तिथलं घनदाट जंगल याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हती. पण सळसळत रक्त होत.सारासार विचार नव्हता.नेट वरून माहिती गोळा केली होती.उन्हाळ्यात सुध्दा धबधबा चालू असतो.कारण कर्नाटक राज्याने वरच्या बाजूला धरण बांधले होते व काही पाणी त्यामुळे विर्डीकडे सोडले होते.खरतर या धरणामुळे गोवा व कर्नाटकात वादही सुरु होता.पण युवा मुलांना कसलीच फिकीर नव्हती.मनस्वी व रोशन परब हे सख्खे चुलत बहीण व भाऊ, उदय आमोणकर,मानवेल डिसोजा व नासीर बेग हे सगळे फोंड्याच्या आसपास राहणारे . तेरा एप्रिलला सकाळी नऊ वाजता सगळा ग्रुप सहलीसाठी बाहेर पडला.फक्त मनस्वीने घरी सांगितलं होतं की ती वर्गातील मुलांसोबत..( त्यात रोशनही होता ) सहलीला जात आहे.पण तिने ठिकाण... किती जण व कोण आहेत हे सांगितले नव्हते.      जी.पी.एस.लावून त्यांनी प्रवास सुरु केला.तीन मोटरसायकलवरून हा प्रवास चालला होता.मध्ये मध्ये थांबून फोटो घेतले जात होते.सव्वादहाला ही मंडळी विर्डी गावातल्या सातेरीच्या मंदीराजवळ पोहचली.मंदिर सुरेख होत.आजूबाजूला फुलांची झाडे लावलीहोती.त्यात पांढरा व लाल चाफा...लाल बोगनवेल ...तुळशी दिसत होत्या.चाफे बहरले होते... बोगनवेल लाल तु-यांनी सजली होती. सर्वांनी देवाचे दर्शन घेतले.थोडा वेळ मुलं देवळात बसली.मनस्वीने फुलांचे फोटो घेतले.नासीर कुणी गावकरी दिसतो का ते बघत होता.तेवढ्यात समोरच्या शेतात एक प्रौढ स्त्री काम करतानादिसली." आजी...वज्रासखल धबधब्यावर कसं जायचं?"त्या बाईने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले." ता कोसमाचा मोठा झाड दिसता मा तिकडसून पायवाट आसा."" गाडी जाईल?"" त्या झाडापर्यंत जाता. पोरांनू जपान जाया...जंगलातजनावरा असतत...बरोबर कोण जाणतो नाय? पाणीआणल्यास मा!" नासीर हसला.मोठा माणूस बरोबरच असला तर मग सहलीत मजा काय?  पण त्या बाईने जबरदस्तीने आपल्या जवळची पाण्याची बाटली त्यांना दिली." वर वाळवंटी नदी आसा गोड पाणी असता. पण काळजी घ्या बाबांनू ! तासभर चलाचा लागतला."पाचही जणांनी आजी सोबत सेल्फी घेतली.  सगळी मंडळी पाच एक मिनिटातच त्या झाडाजवळ पोहचली. गाड्या झाडाखाली लावून ती समोरचा उंचवटासर करायला तयार झाली.--------******---------*****-------******-रानभूल भाग २

सुरुवातीला हलका चढ होता. एप्रिल महिना असूनही सभोवताली ब-यापैकी हिरवाई होती. गवतात मळलेली पायवाट दिसते होती.थोड पुढे गेल्यावर चढ वाढला.वाट दगडांनी भरलेली व निसरडी होती. वाटेवर त्यांना काही काठ्या गठ्ठा करून ठेवलेल्या दिसल्या. कदाचीत या अगोदरच्या पर्यटकांनी त्या ठेवल्या असाव्यात.पाचही जणांनी एक एक काठी उचलली. चढ चढताना त्याचा उपयोग होणार होता. दहा मिनिटांनंतर ते एक टेकडीवजा उंचवट्यावर पोहचले.इथून खालचं गाव सहज दिसत होत.सुमारे वीस घरांची छप्परे गर्द झाडीतून डोकावताना दिसत होती.सगळ्यांना थोडी धाप लागली होती.आजीने दिलेले पाणी प्रत्येकाने घोट घोट पिऊन घेतले." अरे, आणखी वॉटर बॉटल सोबत घेवून आल पाहिजे होते."उदय बडबडला." आजीनं सांगलाहा वर नदी हा म्हणान." मनवेल म्हणाला."यस्, पण नदी खयच दिसाना झाली." मनस्वी म्हणाली.थोडी विश्रांती घेऊन मंडळी पुढे चालू लागली.आता पायवाट अधीक अरुंद होत चालली होती. सगळीकडे उंच झाडांची गर्दी दिसत होती.दाट पर्णराजीतून सूर्यकिरणे मुश्कीलीने खाली येत होती.झाडावर काही पक्षी कलकलाट करत होते." पाण्याचा आवाज येतोय..." उदय खुश होत म्हणाला." हा नदीच्या पाण्याचा आवाज आहे." रोशन म्हणाला. अगदी जवळून खळ खळ असा आवाज येत होता.वाटेतल्या दगडांना आपटत पाणी खाली येत असावं.सगळे त्या आवाजाच्या रोखाने निघाले.सगळे घामाघूम झाले होते.त्यांना पाण्याची गरज होती. कंठ कोरडा पडला होता." ती बघ ,किती सुंदर फुले." मनस्वी समोर बोट दाखवून म्हणाली.समोर डाव्या बाजूला चढतीवर लिलीच्या कुळातली सुंदर निळसर फुले होती.  " ही भाग्याची फुला आसत. एका मासिकात मी आर्टिकल वाचलं होतं."मनस्वीने माहिती पुरवली.आजुबाजूच्या झुडपाच्या आधार घेत ती वर चढली.दोन फुले तोडून घेतली.वितभर लांब पाच पाकळ्या व लांब देठ असलेली निळसर -जांभळी फुल सुंदर दिसत होती.शिवाय त्या फुलांना एक मंद असा गंध येत होता." अगो गेलसच वर तर सगळी फुला तोडून आण."नासीरने सुचवले." नको रे, फुला तर झाडारच बरी दिसतात न्हू. सगळी फुला काढपाची ना एकतरी फुल डवरुक जाय."मनस्वी खाली उतरली." अरे,माझा फुलांसोबत फोटो काढा.'रोशनने मनस्वीचे चार पाच फोटो मारले. त्यानंतर गप्पा गोष्टी करत ती पुढे सरकली." मनस्वी, तुका जाणा...हयसर जंगलान टायगर...बीअरकिंग कोब्रा...कोळसुंदे...अजगर आसले."नासीर मनस्वीला चिडवत म्हणाला." माय, माय...आता कितें करपाचे ?"" सुशेगाद राव गो..." मनवेलने मनस्वीला धिर दिला.     आता उंचावरून पाणी कोसळण्याचा आवाज आला." माका,दिसता वॉटर फॉल आयलो." उदय आनंदाने म्हणाला.  आता ते सपाट जागेवर आले होते. थोडं पुढे गेल्यावर समोर एक अद्भुत दृष्य दिसले. दिडशे ते दोनशे फूट उंचावरून पाण्याचा एक स्तंभ निरंतर खाली एका निळ्याशार डोहात कोसळत होता. डोहाच्या सभोवार लव्हाळी आणि नेच्यांची गर्दी दिसत होती .धबधब्यांची एक धार एका काळेथर दगडावर कोसळून पांढरे शुभ्र तुषार वर उडत होते." अप्रतिम...सुंदर......!" सारे एकाच वेळी ओरडले.डावीकडे असलेल्या अर्जून वृक्षाखाली सगळ्यांनी आपल्या पाठीवरच्या सॅक फेकल्या.उदय,मनवेल,नासीर आणि रोशनने झटपट आपली शर्टस्....टि शर्टस् काढली आणखी पाण्यात धडाधड उड्या मारल्या. दगडांच्या कपारीवर बसलेल्या दोंन खंड्या पक्षांनी झर्रकन आकाशात झेप घेतली.मनस्वी उड्या मारत अर्जुन वृक्षाजवळ पोहचली.या गडबडीत तिचा पाय गुळगुळीत दगडावरूनघसरला.तिच्या हातातली भाग्याची फुले अर्जुन वृक्षाच्या मुळात पडली.तिच डोकं व हात खोडाला धडकल.कसंबसं स्वतः ला सावरत ती उठली. त्याचवेळी एक गूढ पण प्रसन्न हसू वार्यावर तरंगत सा-यारानभर पसरलं. मनस्वी आपलं सामान तिथे ठेवून उजवीकडे पाण्यावर डोकावणाऱ्या खडकावर पाण्यात पाय बुडवून बसली.हातातल्या मोबाईलने ती तो सुंदर निसर्ग कॅमे-यात बंदिस्त करु लागली. पायान ती आपल्या मित्रांवर पाणी उडवत होती सुमारे तासभर सगळे पाण्यात डुंबत होते.आता दुपार उलटून गेली होती.ऊन तिरप होत चाललं होतं.त्या थंडगार निळ्याशार पाण्यातून बाहेर पडू नये असंच त्यांना वाटत होते." अरे,तीन वाजान गेले."मनस्वीने सगळ्यांना भानावर आणलं." राव गो जरा, मस्त गारेगार वाटता." उदय म्हणाला." चला . रिटर्न जायचं आहे ना ?"तरीही चौघेही काही वेळ पाण्यातच राहिले.तो पर्यंत मनस्वी झाडांचे... फुलांनी भरलेल्या वेलींचे फोटो मारत राहिली. काही वेळाने सारे पाण्या बाहेर आले.गप्पा गोष्टी करत त्यांनी कपडे बदलले. पुन्हा आपापले फोन सॅक मधून काढत सेल्फी... व फोटो काढले.तोपर्यंत साडेचार वाजले होते.तेवढ्यात एक कोतवाल पक्षी ओरडत बाजूच्या अर्जुन वृक्षावर येऊन बसला.आपली दुभंगलेली शेपटी हलवत तो या अनाहुत पाहुण्यांकडे कुतुहलाने पाहू लागला." चला, निघूया...हा कोतवाल आपल्याला निघा म्हणतोय."रोशन म्हणाला. त्याला पशू..पक्षी यांच्या अभ्यासात खूपच रस होता." कोतवाल ओरडून संकटाची जाणीव करून देतो. सावधकरतो. चला लवकर."" सामको फोकांड तू. भिववता मेलो."मनवेल करवादलो.पण लवकरच सगळ्यांनी सॅक पाठीला लावल्या व परतीच्या प्रवासाला निघाले." मनस्वी बाय, तूझी भाग्याची फुलां रवली मगो."नासीरने आठवण केली." रवांदे, झाडाच्या मुळांन शोभान दिसतत."मनस्वी मागे वळून बघत म्हणाली.******----------******-------*****----****मनस्वीने ज्या अर्जुन वृक्षाला धडकून साष्टांग नमस्कार घातला होता व ज्याच्या मुळात ती भाग्याची फुले पडली होती त्या वृक्षावर एक वनदेवी विश्रांती घेत होती.तिला ती फुले खूप आवडायची.रानात भटकत असताना वनदेवी ह्या फूलांच्या जवळ जाऊन हाताने कुरवाळायची  ...गंध घ्यायची.एखाद फूल ती आपल्या लांबसडक काळ्याभोर केसात खोवायची.मनस्वी धडपडल्या मुळे ती जागी झाली होती. खरंतर तिला राग आला होता.पण समोरची कोवळी मुलं आणि अनवधानाने मनस्वीने अर्पण केलेली भाग्याची फुले पाहून ती शांत झाली.      तेवढ्यात कोतवाल पक्षी तिथे आला." काय रे काय झालं?" वनदेवीने त्याला विचारले." काही वराह याच बाजूला पाणी पिण्यासाठी येताहेत."" म्हणजे या मुलांच्या वाटेत ? जा त्यांना सांग ही मुलं जाईपर्यंत थांबा म्हणावं!"कोतवाल क्षणातच उडून गेला. वनदेवी हलकेच तरंगत खाली उतरली.जमिनीवर येताच ती आपल्या सगुण रुपात प्रकट झाली.हिरवी साडी...हिरवा पोलका... गळ्यात पाना फुलांच्या माळा...मनगटाभोवती फुलांचे हार.. डोक्यावर मुकूट...तिच्या मुखकमलावर  हास्य विलसत होत. तिने स्वत: भोवती एक गिरकी घेतली.तसं वा-याची गंधीत झुळूक रानभर पसरली.अर्जुन वृक्षाखालील  भाग्याची फुल उचलून तिने ती मूकूटात खोवली....एक सुरेल तान तिने दिली.वा-याने ती तान अलगद झेलली आणि रानभर पसरवली.--------******-------******-----*****--------भाग २ समाप्त