पत्रसुमने.. तुझे बागकाम

(0)
  • 6
  • 0
  • 2.6k

प्रिय सोना बागकाम हा तुझा आवडीचा प्रांत होता आपण घर घेतानाच थोडे महाग असले तरी चालेल पण बाहेर बाग हवी असा तुझा आग्रह होता त्यामुळे त्या काळी आपल्या बजेट च्या आटोक्याबाहेर असलेला छोटा बंगला आपण घेतला होता आपला नवीन संसार, तुझा नवीन दवाखाना.. त्यात आपण तसे परिस्थितीने मध्यमवर्गीय माझी नोकरी होती पण साठवलेला पैसा काहीच नव्हता

1

पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग १

प्रिय सोनाबागकाम हा तुझा आवडीचा प्रांत होता आपण घर घेतानाच थोडे महाग असले तरी चालेल पण बाहेर बाग हवी तुझा आग्रह होता त्यामुळे त्या काळी आपल्या बजेट च्या आटोक्याबाहेर असलेला छोटा बंगला आपण घेतला होताआपला नवीन संसार, तुझा नवीन दवाखाना.. त्यात आपण तसे परिस्थितीने मध्यमवर्गीयमाझी नोकरी होती पण साठवलेला पैसा काहीच नव्हता..त्यामुळे बरीच कर्जे उधार उसनवार करून हा बंगला घेतला होता हा बंगला घेताना आणि नंतर चार पाच वर्षे आपली खूप ओढाताण झाली होती पण आपल्या आवडीच्या घराच्या प्राप्ती पुढे ती काहीच वाटली नाहीआपल्या घरासमोर मोकळी जागा बरीच होती त्यासाठी आधी तुझ्या दवाखान्याच्या गावातून शेतीची लाल माती ट्रॉली भरून ...अजून वाचा

2

पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग २

प्रिय सोनातुझ्या बागकामाचे आणखी एक विशेष म्हणजे आपल्या या विस्तृत बागेला पाणी देण्यासाठी तू एक मोठी पाईप ठेवली होती एक कनेक्शन बाथरूम मधील कॉर्पोरेशन च्या पाण्याच्या नळाला जोडले होते.जेणेकरून बागेला कॉर्पोरेशन चे पाणी मिळावे आणि साठवणीच्या टाक्या रिकाम्या होऊ नयेत तुझ्या प्रत्येक कामात दूरदृष्टी असे आवळ्याच्या बहराच्या काळात पहिले काही वर्षे मी जिथे जिथे मित्र मैत्रिणींना भेटायला जात असे तिथे आवळे घेऊन जात असे आपल्या सर्व नातेवाईकांच्या घरोघरी आपण आवळे पोचवत होतो त्या काळात पुण्यात गेलो तर तिकडे पण आपण सर्वांसाठी आवळे न्यायचो एक दोन वेळा आमचा फेसबुक मेळावा पुणे, मुंबई इथे भरला होता तिथेसुद्धा वीस पंचवीस लोकांसाठी प्रत्येक ...अजून वाचा

3

पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग ३

प्रिय सोनाबाकी सर्व झाडांची वेळोवेळी छाटणी, वाफ्यातील माती सारखी करणे, मधले तण काढणे या गोष्टी तू स्वतःच करायचा काही एकदा माझ्या बघण्यात कमळ आले मी इच्छा व्यक्त करताच तू गुलाबी रंगाचे कमळ असलेली रोपे विकत आणली एक मोठा मातीचा कमळ पॉट विकत आणलात्यात माती शेण वाळू वगैरे घालून बेड तयार केला आणि वर पाणी भरून पॉट तयार केला त्यात हे कमळाचे वेल सोडून दिले थोडेच दिवसात त्याला छान देखणी गुलाबी कमळ लागली येणारा जाणारा कौतुकाने पहायचा कारण आपल्या भागात कमळ कोणा कडेच नव्हते त्यातच वॉटर लिली नावाची छोटी कमळ पण आपण सोडली होतीbकाही दिवसाने हे कमळ चांगलेच फोफावले वॉटर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय