पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग ३

प्रिय सोना 
बाकी सर्व झाडांची वेळोवेळी छाटणी, वाफ्यातील माती सारखी करणे, मधले तण काढणे या गोष्टी तू स्वतःच करायचा
काही वर्षापूर्वी एकदा माझ्या बघण्यात कमळ आले मी इच्छा व्यक्त करताच तू गुलाबी रंगाचे कमळ असलेली रोपे विकत आणली एक मोठा मातीचा कमळ पॉट विकत आणलात्यात माती शेण वाळू वगैरे घालून बेड तयार केला आणि वर पाणी भरून पॉट तयार केला त्यात हे कमळाचे वेल सोडून दिले थोडेच दिवसात त्याला छान देखणी गुलाबी कमळ लागली येणारा जाणारा कौतुकाने पहायचा कारण आपल्या भागात कमळ कोणा कडेच नव्हते त्यातच वॉटर लिली नावाची छोटी कमळ पण आपण सोडली होतीbकाही दिवसाने हे कमळ चांगलेच फोफावले वॉटर लिली पण हातपाय पसरू लागली मग माझ्या डोक्यात कमळ तळ्याची कल्पना आलीआणि तूही ती उचलून धरली बागेत एके ठिकाणी आपण चार बाय चार फुटाचे खोल असे कमळ तळे बांधून घेतले त्यात नेहेमी प्रमाणे माती शेण घालून पाणी भरले व थोडे कमळाचे बीज त्यात सोडलेआता कमळाला चांगलाच वाव मिळाला ते मस्त वाढू लागलेसोबत वॉटर लिली पण छान टपोरी होऊ लागलीबागेत तळे दिसल्यावर कॉर्पोरेशन च्या लोकांनी त्यात छोटे छोटे गप्पी मासे आणून सोडलेजे डासांची अंडी खातात
ते पण थोड्याच अवधीत भरपूर वाढून तळ्यात आनंदाने बागडायला लागले तळे खऱ्या अर्थाने देखणे दिसू लागले कधी कधी आजुबाजुची लहान मुले या तळ्यातील छोट्या माशांना चुरमुरे बिस्कीट वगैरे घालायला येत... त्यांना खूप अप्रूप वाटत असे,.
तळ्याच्या कडेला आपण पांढरी संगमरवरी फरशी घातली होतीत्यावर बसून कधी आपण गप्पा मारीत असू चहा घेत असू आपल्याकडे येणारे पण हौसेन या तळ्याकाठी फोटो सेशन करीत माझे तर असंख्य वेग वेगळ्या कपड्या तील फोटो तू कमळा सोबत काढलेसआणि हो मी पण तुझे काढले होते दिवाळीत तळ्याच्या कडेने दिवे ठेवून मी तळ्यात सुद्धा दिवे सोडत असे रात्रीच्या वेळी आपले तळे अतिशय देखणे दिसत असे काही वर्षांपूर्वी आपण कुर्गला गेलो असताना तिथे एक अबोली रंगाचे कमळ मी एका मसाल्याच्या बागेत बघितले त्या गृहस्थाना जेव्हा मी आपल्याकडील मोबाईल गॅलरी मधे असलेले कमळाचे फोटो दाखवले तेव्हात्यांना ते खूप आवडलेआणि आपले कौतुक वाटले त्यांनीअगदी न मागता मला त्यांच्याकडचे कमळ वेल एका प्लास्टिक पिशवीत पाणी घालून प्रेमाने दिलेआणि तुमच्या तळ्यात सोडा असे सांगितलेआपल्याला खुप आनंद वाटला
दोन दिवसाच्या रेल्वे प्रवासानंतर आपण अलगद ते कमळ आपल्या तळ्यात सोडले.एक दोन वर्षे त्याला काहीच लागले नाही पण नंतर एक दिवशी अचानक एक अबोली देखणे कमळ लागले..तळ्याची शोभा आणखीन वाढली यानंतर त्याला अगदी दोन दोन दिवसांनी कमळ लागू लागली अनेक कमळ लागली
या कमळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तीन दिवस टिकत असे रोज सकाळी उमलत असे संध्याकाळी मावळत असे या कमळाचे सुद्धा आपण अनेक फोटो  काढले आणि  याच्या सोबत सुद्धा काढले
तुला तर ते कमळ एवढे आवडले की मोबाइल स्क्रीन लॉक वर तू त्याचा फोटो ठेवला होतास
मधल्या काळात आणखी एक गंमत बागेत घडली समोरच्या एका व्रात्य मुलाने एक मोठा मासा आणून आपल्या तळ्यात सोडता खरेतर हे आपल्याला आवडले नव्हते पण आता त्याला बाहेर ही काढता येणार नव्हते तसा त्याचा त्रास काहीच नव्हता
तो शेवाळे खाऊन जगत होता अगदी तळ्यातले छोटे मासे सुध्दा तो कधी खात नव्हता तळ्यात खाली पोहत असायचा त्याला ब्रेड बिस्कीट खूप आवडायचे कधी त्याचे तुकडे घातले तर लगेच ते तुकडे पटकन वर येऊन घेऊन जायचा पुन्हा गडप. व्हायचा मी त्याचे अगदी चपळाईने व्हिडिओ सुद्धा घेतले होते
कधी लहान मुले घरी आली की बिस्कीट तुकडा घालून मी त्याला वर बोलवायचेआणि मुलांना दाखवायचे त्यामुळे त्यांना सुद्धा मजा यायची
खुप वर्षे  आपल्या घराचा.. बागेचा तो मासा एक भाग होऊन गेला होता कधीतरी तळे साफ करताना सुद्धा आपण त्याला अलगद काढून एका मोठ्या भांड्यात सोडले होते आणि तळे साफ झाल्यावर परत तळ्यात टाकले काही वर्षांनी अचानक तो मेला आणि त्याचे अचेतन शरीर वर आले आपल्याला खुप वाईट वाटले तू त्याला एका पिशवीत घालून पाण्यात विसर्जन करून आला होतास
कमळ तळे असलेली आपली बाग येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे एक आकर्षण होते पंचक्रोशीत कुठेच असे तळे असलेली बाग नव्हती
मात्र अनेक वर्षांनंतर आता या बागेचा मोठा व्याप आपल्याला कठीण वाटू लागला घरच्या कोणालाच आपल्या बागेत कोणताच इंटरेस्ट नव्हता सुटीला घरचे लोक आले तरी कोणी एक तांब्याभर पाणी सुद्धा कुठल्या झाडाला हौसेने घालत नव्हते
सगळ्या गावाला आपली बाग छान वाटत असली तरीही घरच्या लोकांना त्याची काही अपूर्वाई नव्हतीच..ना त्यातील फुलांचे कौतुक होते ना फळांचे...नाही म्हणता आपल्या नातीला मात्र आपली बाग खूप आवडायची त्यातील फुले काढून गजरे करणे बागेला पाणी घालणं ..ही कामे ती सुट्टीला आली की अगदी हौसेने करायची बागेतील वेगवेगळी फुले सकाळी देवा साठी काढायला तिला फार आवडायचे त्यासाठी ती लवकर उठायची
सुट्टीनंतर ती परत गेली तरी व्हिडिओ कॉल वर बाग दाखव म्हणायची हळू हळु बाग थोडीकमी करण्याकडे आपला कल होऊ लागला तो व्याप आवरेना बाहेरगावी कुठ गेले तर पाणी घालायचा प्रॉब्लेम होऊ लागला
कमळ तळे झाल्याने कमळ पॉट एका वृद्धाश्रमाला देऊन टाकला 
मग तू सुद्धा हवी ती रोपे काढून दोन वाफ्यात एकत्र करु लागला उरलेल्या जागेत तू फरशी घालून घेतली काही रोप कुंड्यात टाकलीआता बाग थोडी सुटसुटीत झाली
आपल्या अनुपस्थितीत बागेला पाणी घालायला बाई ठेवली होती तरी तू गावाहून आला की आधी बागेची हालहवाल बघायचा प्रत्येक झाडाची निगुतीने काळजी घेत होता
आणि आता तुझ्या जाण्यानेबागेचा पालक मंत्री हरवला आहे बाग सुद्धा उदास झालेय ..
मी माझ्या परीने  देखभाल करते आहे
पण त्यात तुझी निगुती नाहीये
झाडे, प्राणी यांना आपल्या मालकाचे सुख दुखः कळते म्हणतात
याची प्रचिती आलीय मलासुद्धा
कारण तुला माहित आहे का तू गेल्यावर काय काय घडले ते..
ज्या आंब्याच्या झाडानी एक वेळेस डझनानी आंबे दिले त्यांना आता कसेतरी दोन तीन डझन आंबे लागले होते
ज्या आवळ्याचा बहर वर्षातून तीन चार वेळेस होता त्याला गेले कित्येक दिवसात एक सुद्धा फुल लागलेले नाही
एकेकाळी गळलेल्या आवळ्याच्या फुलांचा सडा पडत असे रोज झाडायला लागत असेआता तो नजारा गेला..
मी पण आता मोठी झाडे त्यांच्या उपकाराचे आभार मानून आणि त्यांची क्षमा मागून छाटली  आहेत
तो व्याप माझ्याकडून होणार नाही आणि तू नसल्याने त्या फळातील गोडी आणि माझी रुची सुद्धा गेलीय
तरीपण माझ्याकडून मी बागेवर प्रेम करते आहे
तिची काळजी घेते आहे रे...
भूल चूक मला माफ कर सोना🙏