भाग - १ रात्रीचे नेमके दोन वाजून सतरा मिनिटे. भिंतीवरच्या जुन्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. प्रत्येक टिक... टिक... टिक... त्या घराच्या शांततेला जखम करत होती. पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीबाहेरून ओलसर वाऱ्याची झुळूक आत येत होती. घरभर मातीचा गंध पसरला होता. दूरवर एखादा कुत्रा अधूनमधून भुंकत होता आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरत होती. आर्यनला झोप लागत नव्हती. गेल्या सात दिवसांपासून त्याची झोप हरवली होती. तो पुन्हा एकदा उठला. स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास भरला. थंड पाणी घशातून खाली उतरलं, पण मनात उसळणारी अस्वस्थता काही कमी झाली नाही.
शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 1
शापित गर्भ : जन्म की मृत्यूलेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे : एक अश्वस्थामाभाग - १रात्रीचे दोन वाजून सतरा मिनिटे.भिंतीवरच्या जुन्या घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. प्रत्येक टिक... टिक... टिक... त्या घराच्या शांततेला जखम करत होती.पाऊस नुकताच थांबला होता. खिडकीबाहेरून ओलसर वाऱ्याची झुळूक आत येत होती. घरभर मातीचा गंध पसरला होता. दूरवर एखादा कुत्रा अधूनमधून भुंकत होता आणि पुन्हा सगळीकडे शांतता पसरत होती.आर्यनला झोप लागत नव्हती.गेल्या सात दिवसांपासून त्याची झोप हरवली होती.तो पुन्हा एकदा उठला. स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास भरला. थंड पाणी घशातून खाली उतरलं, पण मनात उसळणारी अस्वस्थता काही कमी झाली नाही."हे फक्त तुझ्या मनाचे ...अजून वाचा
शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 2
शापित गर्भ : जन्म की मृत्यू लेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे : अश्वस्थामा ----------------------------------------- भाग २ : आरशाच्या पलीकडचं सत्यमागील भागात...जुन्या बंगल्यात पहिली रात्र घालवत असताना आर्यनला आरशात स्वतःचं प्रतिबिंब वेगळं वागताना दिसलं. वरचा मजलाच नसलेल्या घरातून लहान मुलाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. एका जुन्या छायाचित्रामागे लिहिलेला इशारा त्याच्या मनात घर करून बसला, "त्याला कधीही आरशासमोर एकटं सोडू नका." आणि शेवटी... आरशात एक अनोळखी गर्भवती स्त्री दिसली. त्याच क्षणी मोबाईलवर संदेश आला—"तुझी पत्नी तीन तासांपूर्वी या पत्त्यावर आली आहे..."-----------------------------------------आर्यनचा श्वास जणू छातीतच अडकला.मोबाईलच्या स्क्रीनवर तो संदेश अजूनही चमकत होता."तुझी पत्नी ...अजून वाचा
शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 3
शापित गर्भ : जन्म की मृत्यूलेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळे: एक अस्वस्थमाभाग – ३क्रमशः....रात्रीचा तो अंधार आता फक्त चार भिंतींमध्ये उरला नव्हता... तो जणू आर्यनच्या श्वासात मिसळला होता.या आधी जे काही घडलं होतं, त्यानंतर आर्यनच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उठत होता..अन्वी नेमकी कुठे होती?आणि त्याहून भयंकर प्रश्न असा होता की...आरशात दिसणारी ती गर्भवती स्त्री नेमकी कोण होती?आर्यन काही क्षण तिथेच उभा राहिला.समोर अंधार होता.भिंतीवरचं घड्याळ मात्र अजूनही चालू होतं.टक... टक... टक...प्रत्येक आवाजासोबत त्याचं हृदय जणू छातीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं.त्याने हळूच मागे वळून पाहिलं.दार बंद होतं.खिडकी बंद होती.पण खोलीत हवा नव्हती.तरीही...पडद्याचा एक कोपरा हळूहळू हलत होता.आर्यनच्या ...अजून वाचा
शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 4
शापित गर्भ : जन्म की मृत्यूभाग : ४लेखन : अविनाश शांताबाई भिमराव ढळेएक अश्वस्थामा_____________________________________________Copyright ©️ all Rights are reserved copyright act_____________________________________________क्रमशः मागील भागातून पुढे.....आर्यनच्या कानात अजूनही अन्वीची किंकाळी घुमत होती.“आर्यऽऽऽन!”त्याने क्षणभर डोळे घट्ट मिटले. अंगावर आलेली शहारे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बोटांपासून मानेपर्यंत एक थंड लहर पसरत गेली.समोर तीच खोली होती.ज्या खोलीच्या दरवाजावर आतून नव्हे, तर बाहेरून कुणीतरी खोलवर ओरखडे काढून एकच शब्द लिहिला होता.“आई”आर्यनने हात पुढे केला.दरवाज्याच्या लाकडाला स्पर्श होताच त्याच्या बोटांना बर्फासारखी थंडी जाणवली.पण त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे...दरवाज्याच्या आतून कुणीतरी त्याचा हात पकडला.आर्यनने दचकून हात मागे ओढला.“अन्वी?”उत्तर आले नाही.त्याने पुन्हा दरवाजावर हात ठेवला.यावेळी आतून एक अतिशय ...अजून वाचा