नियती पुन्हा हाक देईपर्यंत..

(2)
  • 3
  • 0
  • 1.6k

"प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात 'I Love You' ने होत नाही... काही प्रेमकथा फक्त एका नजरेने सुरू होतात." २०२१. तो दिवस माझ्यासाठी इतर दिवसांसारखाच सुरू झाला होता. एका लग्नाची लगबग, गोंधळ, नातेवाईकांची धावपळ, हसणारे चेहरे आणि आनंदाचं वातावरण. मीही त्या गर्दीचा एक भाग होते. मला मुळीच कल्पना नव्हती की काही क्षणांत माझं आयुष्य एका अनोळखी व्यक्तीच्या एका नजरेमुळे कायमचं बदलणार आहे. त्या गर्दीत अचानक माझी नजर एका मुलावर जाऊन थांबली. तो माझ्याकडे पाहत होता की नाही, हेही मला आठवत नाही. आमच्यात एकही शब्द झाला नाही.

1

नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 1

प्रस्तावना"प्रत्येक प्रेमकथेची सुरुवात 'I Love You' ने होत नाही... काही प्रेमकथा फक्त एका नजरेने सुरू होतात."२०२१.तो दिवस माझ्यासाठी इतर सुरू झाला होता. एका लग्नाची लगबग, गोंधळ, नातेवाईकांची धावपळ, हसणारे चेहरे आणि आनंदाचं वातावरण. मीही त्या गर्दीचा एक भाग होते. मला मुळीच कल्पना नव्हती की काही क्षणांत माझं आयुष्य एका अनोळखी व्यक्तीच्या एका नजरेमुळे कायमचं बदलणार आहे.त्या गर्दीत अचानक माझी नजर एका मुलावर जाऊन थांबली.तो माझ्याकडे पाहत होता की नाही, हेही मला आठवत नाही.आमच्यात एकही शब्द ...अजून वाचा

2

नियती पुन्हा हाक देईपर्यंत.. - 2

Chapter 2 : सहा वर्षांनंतरही...लोक म्हणतात, वेळ प्रत्येक जखम भरून काढतो.कदाचित ते खरंही असेल.पण काही जखमा अशा असतात, ज्या थांबवतात... मात्र कधीच मिटत नाहीत.आज त्या दिवसाला सहा वर्षे पूर्ण झाली होती.सकाळी डोळे उघडताच माझी नजर भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरवर गेली. तारीख पाहताच मन नकळत सहा वर्षे मागे गेलं.तो दिवस...ते काही क्षण...आणि तो अनोळखी चेहरा...सगळं पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभं राहिलं.मी पलंगावर बसून काही वेळ शांत राहिले.स्वतःलाच एक प्रश्न विचारला..."तू अजूनही त्याची वाट का पाहतेयस?"उत्तर मात्र आजही बदललं नव्हतं.कारण मी त्याची वाट पाहत नव्हते...मी त्या अपूर्ण क्षणाच्या पूर्ण होण्याची वाट पाहत होते.आईने स्वयंपाकघरातून हाक मारली."तारा, चहा थंड होतोय."मी पटकन वास्तवात आले."येते आई."चेहऱ्यावर ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय