एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम

(28)
  • 9
  • 0
  • 8.9k

ऑफिसनंतर आम्ही चार मित्र चहा पित बसलो होतो मी(संकेत) आणि बाकी तिघे तनय, यश आणि वेदांत. दिवसभराच्या कामाच्या थकव्यातून बाहेर पडण्यासाठी कुठे तरी एक छोटा ट्रेक आणि कॅम्प करायचा असा विचार आला. चहाच्या वाफा हवेत मिसळत होत्या, आणि त्या क्षणी आमच्या मनात हा नवा विचार आला. "या आठवड्यात आपण बाहेर ट्रेक ला जायचं का?" मी विचारलं. "विसापूर कसा वाटतो?" तनयनि सुचवलं. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह उमटला, फिरायला तर तस सगळ्यांना आवडायचं. ठरलं, मग काय! विसापूर किल्ल्यावर जायचं. लगेचच आम्ही प्रवासाची योजना आखली शुक्रवारी सकाळी निघायचं आप आपल्या बाईक घेऊन. कसे जायचे, काय न्यावे लागेल, आणि कोणते मार्ग निवडायचे, या सर्व गोष्टींची चर्चा झाली. योजनेंत आम्ही काही महत्वाच्या गोष्टी ठरविल्या.

1

एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 1

ऑफिसनंतर आम्ही चार मित्र चहा पित बसलो होतो मी(संकेत) आणि बाकी तिघे तनय, यश आणि वेदांत. दिवसभराच्या कामाच्या थकव्यातून पडण्यासाठी कुठे तरी एक छोटा ट्रेक आणि कॅम्प करायचा असा विचार आला. चहाच्या वाफा हवेत मिसळत होत्या, आणि त्या क्षणी आमच्या मनात हा नवा विचार आला. या आठवड्यात आपण बाहेर ट्रेक ला जायचं का? मी विचारलं. विसापूर कसा वाटतो? तनयनि सुचवलं. सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह उमटला, फिरायला तर तस सगळ्यांना आवडायचं. ठरलं, मग काय! विसापूर किल्ल्यावर जायचं. ...अजून वाचा

2

एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2

नवी सुरुवात राजमाचीहून परत आल्यावर तीन-चार दिवस अगदी सुट्टीतल्या धुंदीत गेले. गाडीतून येताना खिडकीबाहेर मागे पडणारे डोंगर बघत होतो, मन मात्र अजून त्या शेकोटीजवळच रेंगाळत होतं. डोळे बंद केले की अजूनही तो धबधब्याचा आवाज कानात घुमायचा, ओल्या मातीचा तो वास नाकात रेंगाळायचा, आणि अन्वीचा तो शेकोटीजवळचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा. घरी पोचल्यावर आईने विचारलं, काय रे, कसा झाला ट्रिप? इतका खुश का दिसतोयस? मी नुसतंच हसून छान झाला म्हणालो. मनातलं सगळं सांगायची अजून वेळ आली नव्हती. सोमवारी परत ऑफिसला जायचं म्हणून मन काही केल्या तयार होत नव्हतं. सुट्टीचा शेवटचा दिवस, रविवारी संध्याकाळी, यशचा फोन आला. काय रे, कसं वाटतंय ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय