प्रेरणादायी चरित्रे.

(38)
  • 192.4k
  • 11
  • 60.2k

'आई, तुझा मुलगा खूप शिकला आहे. आता त्याला चांगल्या पगाराची नौकरी मिळेल असं तुला वाटत असेल. पण आई, मी तुला आताच सांगतो, मी पोटापूरता पैसा कमविणार असून सर्व पैसा लोकहितार्थ खर्च करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मी देशसेवा करणार आहे.'..... प्रसिद्ध समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी एम. ए.ची पदवी प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आईस लिहिलेल्या पत्रातील एक वाक्य!

Full Novel

1

समाज सुधारक - आगरकर

'आई, तुझा मुलगा खूप शिकला आहे. आता त्याला चांगल्या पगाराची नौकरी मिळेल असं तुला वाटत असेल. पण आई, मी आताच सांगतो, मी पोटापूरता पैसा कमविणार असून सर्व पैसा लोकहितार्थ खर्च करणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मी देशसेवा करणार आहे.'..... प्रसिद्ध समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी एम. ए.ची पदवी प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या आईस लिहिलेल्या पत्रातील एक वाक्य! ...अजून वाचा

2

भारत जोडो अभियानाचे जनक : बाबा आमटे

'मी देवाच्या शोधाला गेलो. देव मला सापडला नाही. मी आत्म्याच्या शोधाला गेलो. आत्मा मला सापडला नाही. मग मी माझ्या सेवेला गेलो. तेथे मला देवही दिसला नि आत्माही मिळाला.' हे विचार मांडणारी व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांचे तारणहार असणारे बाबा आमटे! ...अजून वाचा

3

स्त्री शिक्षणाचे शिल्पकार : महर्षी कर्वे !

'महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिमंत साक्षीदार आहेत. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक शिल्पकार होते......' (प्रल्हाद केशव अत्रे) मुरुड हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव. या गावात केशवपंत कर्वे या नावाचे सद्गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते. लक्ष्मीबाईंचे माहेर शेरवली हे गाव. कर्वे कुटुंब तसे गरीब होते. दोघांचाही स्वभाव स्वाभिमानी होता. ...अजून वाचा

4

गीतरामायणाचे जनक - गदिमा

गीतरामायण हा सर्वकालीन रसिकांचा आवडता असा गीतसंग्रह ! घरी, कार्यालयात, कुठल्याही कार्यक्रमात अगदी रस्त्याने जाताना कुठेही गीतरामायणाचे शब्द कानी की, मानव अगदी भान हरपून त्यात रंगून जातो. बाबुजींच्या अविस्मरणीय आवाजात स्वतःही ते शब्द, ते गीत गुणगुणायला लागतो. अनेक घराघरातून होणारी सकाळ गीतरामायणाच्या गीतातून होते हे या गीताचे वैशिष्ट्य! ...अजून वाचा

5

आमची जिजाऊ

सिंदखेडराजा! बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव! या गावात फार फार वर्षांपूर्वी जाधव घराणे राहात होते. लखुजीराव जाधव हे त्या घराण्याचे अतिशय हुशार आणि पराक्रमी अशी लखुजीराव यांची सर्वदूर ख्याती होती. तो काळ अत्यंत धामधुमीचा होता. त्यावेळी महाराष्ट्रावर परकिय सत्तांचे जाळे पसरले होते. आपले मराठे सरदार अतिशय पराक्रमी असले तरीही त्यांचे स्वतःचे असे राज्य नव्हते. परकीय सत्ताधारी राजांच्या हाताखाली नोकरी करताना ही मंडळी समाधान मानत असे. लखुजीराव जाधव त्याकाळात निजामशहाकडे काम करत होते. ...अजून वाचा

6

पोलादी पुरुष : सरदार पटेल!

गुजरात राज्यातील करमसद या गावात जव्हेरभाई पटेल हे गृहस्थ राहात होते. त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. जव्हेरभाई यांच्या नाव लाडाबाई होते. लाडाबाईंचा स्वभाव प्रेमळ, परोपकारी होता. घरातील कामे सांभाळून त्या शेतीच्या कामातही लक्ष देत असत. त्या दोघांना चार मुले आणि एक मुलगी होती. ३१ ऑक्टोबर १८७५ यादिवशी या कुटुंबात अजून एक पुत्ररत्न जन्माला आले. या बाळाचे नाव वल्लभभाई असे ठेवण्यात आले. करमसद याच गावी वल्लभभाईंचे बालपण फुलले. शाळेत शिकताना त्यांना शेतात जाऊन काम करायला आवडू लागले. ...अजून वाचा

7

शाहू महाराज

'शिक्षण हे एक साधन आहे, साध्य नव्हे. दु:खाच्या दुष्ट चक्रातून सुटका करून घेण्याचे शिक्षण हे प्रभावी साधन आहे. शिक्षण केवळ ज्ञान मिळविणे नव्हे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून सुटका करून घेणे आणि सर्व लोकांच्या भल्यासाठी उपयोगी पडणारे ज्ञान मिळविणे, यातच खऱ्या शिक्षणाचे महत्त्व सामावलेले आहे. शिक्षणातून शरीर, बुद्धी आणि ह्रदय यांचा समतोल विकास झाला पाहिजे. ' ...अजून वाचा

8

अष्टपैलू व्यक्तित्वाचे धनी : सावरकर

'देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूस मारिता मारिता मरेतो झुंजेन...जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या अभिषेक तिच्या चरणांवर घडेल......' असे स्फूर्तिदायी, ह्रदयस्पर्शी आणि मातृभूमीबाबत नितांत आदर व्यक्त करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत..... विनायक दामोदर सावरकर! ...अजून वाचा

9

फुल्यांची सावित्रीबाई

'सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार-मांग नीच म्हणून स्पृश्य-अस्पृश्यता मानणे मूर्खपणाचे आहे. जे लोक असे मानतात व तिचे देव्हारे माजवितात. त्यांना ईश्वराचे सत्यस्वरुप कधीच ओळखता येणार नाही. ...अजून वाचा

10

भारतरत्न : विनोबा भावे

कोकण प्रदेशातील रायगड जिल्हा! रायगड जिल्ह्यातील गागोदे या नावाचे गाव. गागोदे गावात नरहरी भावे या नावाचे एक गृहस्थ राहात त्यांच्या पत्नीचे नाव रुक्मिणीबाई होते. नरहरी भावे हे बडोदा येथील संस्थानात नोकरीस होते. नरहरी-रुक्मिणीबाई यांना चार मुले होती. त्यापैकी एक मुलगा म्हणजे विनायक! विनायकचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ यादिवशी गागोदे येथे झाला. विनायकला बालकृष्ण, शिवाजी, दत्तात्रेय हे तीन भाऊ होते. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय