राणवाडीच अधुरं प्रेम

(4)
  • 18
  • 0
  • 5.1k

रानवाडीचं अधूरं प्रेम! उंचच उंच हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं आणि देखणं गाव... रानवाडी. याच रानवाडी गावात एक साधं, सुटसुटीत आणि हसतं-खेळतं लहानसं कुटुंब राहायचं. घराभोवती शेत, गोठ्यात बांधलेली गुरं आणि माणसं एकदम मायेची.याच कुटुंबाचा जीव आणि घराचा सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे आपला परश्या! स्वभावाने रगेल, बोलण्यात हुशार आणि मित्रांसाठी नेहमी आघाडीवर असणारा. परश्या आता इयत्ता १० वीच्या वर्गात नुकताच गेला होता.परश्याचे वडील शेतकरी होते,

1

राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1

रानवाडीचं अधूरं प्रेम! उंचच उंच हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं ते एक छोटंसं आणि देखणं गाव... रानवाडी. याच रानवाडी गावात साधं, सुटसुटीत आणि हसतं-खेळतं लहानसं कुटुंब राहायचं. घराभोवती शेत, गोठ्यात बांधलेली गुरं आणि माणसं एकदम मायेची.याच कुटुंबाचा जीव आणि घराचा सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे आपला परश्या! स्वभावाने रगेल, बोलण्यात हुशार आणि मित्रांसाठी नेहमी आघाडीवर असणारा. परश्या आता इयत्ता १० वीच्या वर्गात नुकताच गेला होता.परश्याचे वडील शेतकरी होते, जे दिवस-रात्र काळ्या मातीत घाम गाळून आपल्या सं ...अजून वाचा

2

राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 2

शाळेत पोहोचल्यावर परश्याने एक भलताच बेत आखला. दररोज अगदी पहिल्या बाकावर मांडी ठोकून बसणारा परश्या, आज थेट वर्गाच्या सगळ्यात बाकावर जाऊन बसला! सोबतीला त्याने गण्यालाही ओढून मागे बसवलं होतं.परश्याचा हा अवतार बघून गण्या चक्रावला. तो आजूबाजूला पाहत दबक्या आवाजात बोलला, "ए परश्या, चल की लेका पुढं! मागं कशाला बसलायस? मला तिथं बसून शिकायची सवय नाही आणि तुला बी नाही. येडा-बिडा झाला की काय रं तू? आपण कधी मागच्या बाकावर बसतो व्हय?"परश्याने आजूबाजूला पाहत गण्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, "अरं गप की जरा, तोंड बंद ठेव तुझं आजच्या दिवस!"परश्याची ही गडबड आणि सारखं समोरच्या बाकांकडे चोरून बघणं गण्याच्या हुशार ...अजून वाचा

3

राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 3

त्या अथांग दुःखातही परश्याचा तो भास तिला एका सुखाचा अनुभव देऊन गेला होता. गायत्रीने अंगणातल्या त्या मातीच्या भिंतीला डोकं आणि ती शांत होऊन बसली. आपल्या नशिबाचे खेळ आठवून तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. ती तशाच विचारत हरवून गेली असताना, तिचे वडील बडबडत घराबाहेर आले आणि अंधारात कुठेतरी निघून गेले.वडील गेल्यावर गायत्री घरात गेली. आई देवाऱ्यापाशी डोळे पुसत उभी होती. आईला पाहताच गायत्रीचा बांध फुटला आणि त्या दोघी माय-लेकी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. शेवटी आईनेच स्वतःला सावरलं आणि गायत्रीचे आसू पुसत ती मायेने म्हणाली, "राडू नकोस माझ्या बाळा... मी आहे ना तुझ्या पाठीशी! तू या सगळ्याचा जास्त विचार करू ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय