भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा पांढराशुभ्र उजेड आणि इंजिनांचा घुमणारा आवाज वातावरण दणाणून सोडत होता.एक-दोन नाही...पंधरा-वीस सुपरबाईक्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या.त्यांच्या आसपास जमलेले रायडर्स. कोणी हेल्मेट अॅडजस्ट करत होतं, कोणी ग्लोव्हज चढवत होतं, तर कोणी रेसच्या आधीचा अॅड्रेनालिन रश एन्जॉय करत होतं."आज दमनला हरवायचं आहे."कोणीतरी आत्मविश्वासाने म्हटलं.आजूबाजूचे सगळे हसले."स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत रे."त्यावर दुसऱ्याने टोला मारला. त्याचवेळी गर्दीत अचानक शांतता पसरली.दूरवरून एका बाईकचा आवाज जवळ येऊ लागला.... गडगडाटासारखा.क्षणाक्षणाला वाढत जाणारा. पुढच्याच क्षणी काळ्या रंगाची स्पोर्ट्स बाईक तिथे येऊन थांबली.कावसकी निन्जा एच 2बाईकवरून उतरला तो.सहा
मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 1
भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या पांढराशुभ्र उजेड आणि इंजिनांचा घुमणारा आवाज वातावरण दणाणून सोडत होता.एक-दोन नाही...पंधरा-वीस सुपरबाईक्स रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या.त्यांच्या आसपास जमलेले रायडर्स. कोणी हेल्मेट अॅडजस्ट करत होतं, कोणी ग्लोव्हज चढवत होतं, तर कोणी रेसच्या आधीचा अॅड्रेनालिन रश एन्जॉय करत होतं."आज दमनला हरवायचं आहे."कोणीतरी आत्मविश्वासाने म्हटलं.आजूबाजूचे सगळे हसले. ...अजून वाचा
मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 2
भाग २पावसाने शहराला पुन्हा एकदा वेढलं होतं. रस्त्यावर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि गाड्यांच्या हेडलाईट्स ओल्या रस्त्यावर चमकत होत्या. काळी सुपरबाईक सिग्नलकडे येऊन थांबली. लाल दिवा लागला होता. त्याने ब्रेक दाबला. इंजिनचा आवाज अजूनही मंदपणे घुमत होता. हेल्मेटच्या व्हायझरवर पावसाचे थेंब जमा झाले होते. त्याने ग्लोव्ज घातलेल्या हाताने ते पुसले. आजूबाजूला गाड्यांची गर्दी होती. कोणीतरी घरी जाण्याच्या घाईत, तर कोणीतरी उशिरा निघाल्याच्या वैतागात. दमन मात्र निवांत उभा होता, सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत.तेवढ्यात त्याची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका कॅबवर गेली. सहज. कसलाही हेतू नसताना. कॅबची काच अर्धी खाली होती. आत एक स्त्री बसली होती. तिच्या एका हातात फोन ...अजून वाचा