"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत." आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली. टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः पसारा झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता.
सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1
भाग १"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत."आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली.टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता."गुन्हा, शिक्षा आणि अपराधभाव : एक मानसशास्त्रीय अभ्यास"शर्वाणीने कपाळ चोळलं."हो आई... पाच मिनिटं."आई तिच्या खोलीत आली. टेबलवरचे कागद बघितले आणि नेहमीसारखीच हसली."हे पाच मिनिटं मागच्या दोन तासांपासून ऐकतेय मी."शर्वाणी हसली."उद्या जेलमध्ये जायचं आहे. पहिल्यांदाच "आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला."झोप आता. उद्या फ्रेश डोक्याने जा."शर्वाणीने मान हलवली. आई आत गेली. पण तिची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. तिने दस्तऐवज बंद केला आणि बाजूला ठेवलेल्या फाईलकडे हात वाढवला. उद्या भेटायच्या ...अजून वाचा
सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 2
भाग २रात्रीचे साडेअकरा वाजले होते.खोलीत फक्त टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश होता. शर्वाणी लॅपटॉपसमोर बसली होती. स्क्रीनवर कालच्या निरीक्षणांच्या नोट्स एक कैद्यांची नावं. त्यांच्याबद्दलच्या नोंदी.वागणं.बोलणं.प्रतिक्रिया.सगळं व्यवस्थित.तिची नजर खाली सरकत गेली. आणि एका नावापाशी येऊन थांबली.कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंगपानावर फारसं काही नव्हतं. तीच गोष्ट तिला खटकत होती.दिवसभरात तिने दहा-बारा कैद्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.पण सर्वात जास्त वेळ तिच्या डोक्यात कोण राहिला होता?तो.....जो एक शब्दही बोलला नव्हता.शर्वाणी खुर्चीत मागे रेलली. ज्याच्याशी एक वाक्यही बोलणं झालेलं नाही...त्याच्याबद्दल एवढा विचार का करायचा? तिने लॅपटॉप बंद केला.पण झोपायला गेल्यावरही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तेच दृश्य आलं.खिडकीतून येणारा उजेड.पुस्तक धरलेला हात.आणि काही क्षणांसाठी सावलीतून बाहेर आलेली ...अजून वाचा
सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 3

सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 4
भाग ४रात्रीचे साडेबारा वाजले होते. घरात सगळीकडे शांतता होती.शर्वाणीच्या खोलीत मात्र अजूनही दिवा चालू होता. टेबलवर नोटबुक, संदर्भग्रंथ, फाईल्स लॅपटॉपचा पसारा होता. तिने एकामागून एक निरीक्षणं वाचायला सुरुवात केली.काहींच्या बोलण्यात पश्चात्ताप होता.काहींच्या बोलण्यात राग.काहींच्या डोळ्यांत भिती.काहींच्या चेहऱ्यावर बिनधास्तपणा.पण सरताज...तिने त्याचं पान उघडलं....ते जवळजवळ पानच रिकामं होतं.काही निरीक्षणं. काही नोंदी. आणि उत्तरं नसलेले बरेच प्रश्न.शर्वाणी खुर्चीला टेकली. विचार करत राहिली.तो बोलत नव्हता. हे ठीक होतं.पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे...तो स्वतःला वाचवण्याचाही प्रयत्न करत नव्हता.स्वतःची बाजू मांडत नव्हता. स्वतःला निर्दोष म्हणत नव्हता.जसं त्याला कुणाच्याच मताशी काही देणंघेणं उरलं नव्हतं.तिने फाईल बंद केली. पण त्या रात्री झोपेपर्यंत तिच्या डोक्यातएकच प्रश्न फिरत राहिला."हा ...अजून वाचा