कोंढाजी फर्जंद

(12)
  • 22.5k
  • 5
  • 6.7k

कोंढाजी फर्जंद सिद्दी खैरत खानने किल्ले जंजिराच्या अभेद्य तटावरून...किनाऱ्यावर अगदी तुच्छपणे नजर टाकली..मोठ्या डौलाने फडकणारा भगवा त्याच्या नजरेला पडत होता आणि आसपास जंजिऱ्यावर चढाईसाठी तयार असणारे मावळे...समोरच्या धावपळीवरून त्याला स्पष्ट जाणवत होते..कोणीतरी मोठा मराठा सरदार जंजिरा गिळायला पुन्हा आला होता..पण कोणीही असो त्याला काही फरक पडत नव्हता...अजिंक्य आणि अभेद्य असा जंजिरा किनाऱ्यावरून पहिले तरी किल्ले जंजिराचे महाद्वार अजिबात नजरेत पडत नव्हते...आणि त्याचा जोडीला होता हा खळाळणारा तुफान दर्या.. आणि कलालबांगडी, लांडाकासम आणि चावरी या तोफा.. पण मराठे म्हणावें तसे अजुन लढा देत नव्हते...किल्यावर असलेल्या तोफांच्या माऱ्याबाहेर मराठांच्या तळ पडला होता...गलबत,

Full Novel

1

कोंढाजी फर्जंद - भाग १

कोंढाजी फर्जंद सिद्दी खैरत खानने किल्ले जंजिराच्या अभेद्य अगदी तुच्छपणे नजर टाकली..मोठ्या डौलाने फडकणारा भगवा त्याच्या नजरेला पडत होता आणि आसपास जंजिऱ्यावर चढाईसाठी तयार असणारे मावळे...समोरच्या धावपळीवरून त्याला स्पष्ट जाणवत होते..कोणीतरी मोठा मराठा सरदार जंजिरा गिळायला पुन्हा आला होता..पण कोणीही असो त्याला काही फरक पडत नव्हता...अजिंक्य आणि अभेद्य असा जंजिरा किनाऱ्यावरून पहिले तरी किल्ले जंजिराचे महाद्वार अजिबात नजरेत पडत नव्हते...आणि त्याचा जोडीला होता हा खळाळणारा तुफान दर्या.. आणि कलालबांगडी, लांडाकासम आणि चावरी या तोफा.. पण मराठे म्हणावें तसे अजुन लढा देत नव्हते...किल्यावर असलेल्या तोफांच्या माऱ्याबाहेर मराठांच्या तळ पडला होता...गलबत, ...अजून वाचा

2

कोंढाजी फर्जंद - भाग २

शंभू राजे काही न बोलता तडक आपल्या शामियान्यात निघून आले..झालेल्या प्रकाराने ते पार दुःखी झाले होते त्या दिवशी त्यांनी जेवण पण नाही घेतले..दिवस जात होते पण शंभू राजे ना धड मोहिमेवर लक्ष देत होते..ना जंजिऱ्यावर हल्ला करायचा आदेश देत होते..आणि तिथे कोंढाजी बाबा मात्र जंजिऱ्यावर सिद्दी खैरतचा पाहुणचार झोडत होते..सकाळ संध्याकाळ जंजिऱ्यावर फेरफटका मारत होते..आणि रात्री नाच गाण्यात आणि मुजऱ्यात जात होत्या..सिद्दी खैरत पण खुश होता एक मोठा मराठा सरदार त्यांच्या आश्रयाला आला होता आता काही दिवस मग हा वेढा उठणार होता आणि पुन्हा एकदा तिथल्या बाया मुलांना गुलाम म्हणुन विकून बक्कळ पैसा मिळवता येणार होता... ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय